• Sat. Sep 12th, 2026

झोपडपट्टी पुनर्वसन वसाहतीमध्ये अंगणवाडीला जागा द्या – पालकमंत्री मंगलप्रभात लोढा

ByMH LIVE NEWS

Nov 14, 2022
झोपडपट्टी पुनर्वसन वसाहतीमध्ये अंगणवाडीला जागा द्या – पालकमंत्री मंगलप्रभात लोढा

मुंबई, दि. 14 :- झोपडपट्टी पुनर्वसन वसाहतीमध्ये अंगणवाडीला जागा देण्याबाबत झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने कार्यवाही करावी, असे निर्देश मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले.

अंधेरी पूर्व येथील के पूर्व वॉर्ड येथे झालेल्या ‘पालकमंत्री आपल्या भेटीला’ या उपक्रमात पालकमंत्री मंगलप्रभात लोढा बोलत होते. यावेळी आमदार पराग आळवणी तसेच सर्व विभागांचे अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. लोढा म्हणाले की, या विभागातील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पातील इमारतीच्या भितींच्या पुनर्बांधणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने निधी उपलब्ध करून द्यावा. रस्ता बांधकामावेळी ज्यांचे घर तोडले जात असेल, त्यांच्या पुनर्वसनासंदर्भात नियमाप्रमाणे कार्यवाही करावी. शासनामार्फत अधिग्रहित करण्यात येणाऱ्या जमिनींच्या तक्रारीवर तातडीने निर्णय घ्यावा. शासकीय सामुग्रीची चोरी होत असलेल्या भागात सीसीटीव्ही बसवावेत व नुकसानग्रस्त भागाची दुरूस्ती करावी, असे निर्देश पालकमंत्री श्री.लोढा यांनी बैठकीत दिले.

नागरिकांच्या विविध 346 विषयासंदर्भात प्राप्त तक्रारींच्या अनुषंगाने अधिकाऱ्‍यांना तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना पालकमंत्री यांनी यावेळी दिल्या.

‘पालकमंत्री आपल्या भेटीला’ हा उपक्रमामध्ये नागरिकांना ऑनलाईन पद्धतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करण्यासाठी https://mumbaisuburban.gov.in तसेच, बृहन्मुंबई महानगरपालिका संदर्भात तक्रार करण्यासाठी portal.mcgm.gov.in या लिंकचा वापर करता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed