• Wed. Sep 16th, 2026

पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे आवाहन – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Oct 22, 2022
पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे आवाहन – महासंवाद

ठाणे दि.22 (जिमाका) : राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी जिल्ह्यातील नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. जिल्ह्यातील नागरिकांचे आरोग्य चांगले रहावे, यासाठी पर्यावरण पूरक दिवाळी साजरी करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

श्री. देसाई म्हणाले की, राज्यात पर्यावरण पूरक दिवाळी साजरी करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. एकल प्लास्टिक वापर टाळणे, झाडाचे संगोपन करणे, मोठ्या आवाजाचे, प्रदुषण करणारे फटाके टाळून पर्यावरण पूरक दिवाळी साजरी करावी. पर्यावरणपोषक वातावरणात नागरिकांचे आरोग्य जोपासण्यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम या दिवाळीपासून सुरू करूयात, असे असे त्यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed