• Mon. Jun 15th, 2026

    आशिष चांदोरकर यांना उपमुख्यमंत्र्यांकडून श्रद्धांजली

    ByMH LIVE NEWS

    Sep 21, 2022
    आशिष चांदोरकर यांना उपमुख्यमंत्र्यांकडून श्रद्धांजली

    मुंबई, दि. 21 : ज्येष्ठ पत्रकार आशिष चांदोरकर यांच्या अकस्मात निधनाची बातमी ऐकून धक्का बसला. त्यांच्या निधनाने एक चांगला पत्रकार, संशोधक आणि अभ्यासू व्यक्तिमत्त्व आपल्यातून हिरावले आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

    उपमुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतात, आशिष चांदोरकर यांनी ‘मॅन ऑन मिशन महाराष्ट्र’ या नावाने पुस्तक प्रकाशित केले होते. यासाठी त्यांनी महाराष्ट्रभर प्रवास केला होता आणि त्यात 2014 पासून सरकारच्या विविध योजनांचे लाभ तळागाळापर्यंत कसे पोहोचले, त्या यशोगाथांचा संग्रह त्यांनी प्रत्यक्ष लाभार्थींना भेटून तयार केला होता. त्यांच्या निधनाने एक संशोधकवृत्तीचा पत्रकार आपण गमावला आहे. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात मी सहभागी आहे.

    ००००

    महिला प्राध्यापकांच्या नेतृत्व विकासासाठी ‘नारीदृष्टी’ उपक्रम महत्त्वपूर्ण: उच्च शिक्षणात महिलांनी प्रशासकीय व संशोधन क्षेत्रात पुढे यावे – मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील – महासंवाद
    ग्रामीण विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन कटिबद्ध – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार – महासंवाद
    माध्यम व मनोरंजन क्षेत्राची देशात अभूतपूर्व प्रगती – केंद्रीय माहिती व प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन – महासंवाद

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed