• Sun. Sep 20th, 2026

Nashik Politics : एकनाथ शिंदेंची शिवसेना तालुकाप्रमुखांना देणार 14 बुलेरो गाड्या, पदाधिकाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आपल्या पक्षातील तालुकाप्रमुख आणि इतर पदाधिकाऱ्यांना 14 बुलेरो गाड्या देणार आहे. त्यामुळे शिवसेनेच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये देखील आनंदाचे वातावरण आहे. पक्षाच्या संघटनात्मक वाढीसाठी या गाड्या दिल्या जाणार आहेत.

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
नाशिक : आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पाश्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिनसेना पक्षाने संघटनात्मक बांधणीवर भर दिला आहे. पक्षवाड आणि ग्रामीण भागातील संपर्क वाढवण्यासाठी तालुकाप्रमुख आणि पदाधिकाऱ्यांना 14 नव्या बोलेरो गाड्या दिल्या जाणार आहेत. पुढील आठवड्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते या वाहनांचे वाटप होणार असल्याची माहिती शिवसेना शिंदे गटाचे संपर्कप्रमुख आणि आमदार सुहास कांदे यांनी दिली.

तालुक्याप्रमुख आणि इतर कार्यकर्त्यांना गाड्या का देणार?

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. आमदार सुहास कांदे यांच्या पुढाकाराने या 14 गाड्यांची खरेदी करण्यात आली आहे. ग्रामीण भागात पक्षाचे काम अधिक प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी, गावोगावी दौरे करण्यासाठी आणि कार्यकत्यांशी संपर्क वाढवण्यासाठी या वाहनांचा वापर केला जाणार आहे. या गाड्यांवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांची छायाचित्रे लावण्यात आली आहेत.

Maharashtra TimesMaharashtra Rain : अचानक वातावरणात बदल होणार, यंदाच्या पावसाळ्यातील सर्वात मोठा पाऊस पडणार, पंजाबराव डख यांचा अंदाज

वाहनांच्या वापराचा अहवाल घेतला जाणार

‘शिवसेना आपल्या दारी’ या अभियानांतर्गत पदाधिकारी गावागावांत संपर्क साधणार आहेत. तालुकाध्यक्षांवर घरोघरी पक्ष पोहोचवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली असून, वाहनांच्या वापराचा दैनंदिन अहवालही घेतला जाणार असल्याची माहिती देण्यात आली. पक्षाने वाहन सुविधा उपलब्ध करून दिल्याने पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. बुथप्रमुखांपासून तालुकास्तरावरील कार्यकर्त्यांपर्यंत पक्षाचा प्रचार-प्रसार वाढवण्यासाठी या वाहनांचा उपयोग होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

शिवसेना संपर्कप्रमुखांची प्रतिक्रिया

जिल्ह्यात पक्ष संघटना वाढवण्यासाठी 14 वाहने दिली जात आहेत. बूथप्रमुखांपासून तालुकास्तरावरील कार्यकर्ते या गाड्यांचा वापर करून पक्षाचा प्रचार आणि प्रसार करणार आहेत. पुढील आठवड्यात या वाहनांचे वाटप केले जाणार आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना संपर्कप्रमुखांनी दिली आहे.

Maharashtra TimesSatara News : संचालकांना थेट चप्पला आणि लाडू फेकून मारलेले, सह्याद्री कारखान्यातील 28 वर्षांपूर्वीची घटना चर्चेत

संघटनात्मक पक्षवाढ महत्त्वाची

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसाठी पक्षाची संघटनात्मक वाढ ही महत्त्वाची असणार आहे. कारण आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. यासोबतच 2029 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये सर्वाधिक लोकप्रतिनिधी निवडून यावेत यासाठी पक्षाची संघटना मजबूत करणं महत्त्वाचं आहे. शिंदेंची शिवसेना पक्षात असली तरी महायुतीमधील अंतर्गत राजकारण, मतभेद या पाहता स्वपक्षाचं सामर्थ्य बळकट करणं हा पक्षापुढील महत्त्वाचा पर्याय आहे. यामुळे एकनाथ शिंदे यांच्याकडून पदाधिकाऱ्यांना पक्षवाढीसाठी वाहनांची सुविधा करण्यात आली आहे.