• Fri. Sep 4th, 2026

मुंबई शहरमध्ये ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ-महाराष्ट्र’ अंतर्गत १० ठिकाणी भव्य मेळावे – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Sep 4, 2026

मुंबई, दि.४: बेरोजगार तरुण-तरुणींना थेट नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई शहर यांच्या वतीने पंडित दीनदयाळ उपाध्याय विश्वविक्रमी ‘रोजगार महाकुंभ-महाराष्ट्र’ चे आयोजन दि. २९ सप्टेंबर २०२६ करण्यात आले आहे. याअंतर्गत जिल्ह्यातील एकूण १० ठिकाणी हे रोजगार मेळावे पार पडणार आहेत. मुंबईतील अधिकाधिक उमेदवारांनी या कार्यक्रमासाठी नाव नोंदणी करण्याचे आवाहन सहायक आयुक्त सुनिल पवार, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता यांनी केले आहे.

रोजगार मेळाव्यासाठी निवडलेली केंद्रे प्रमुख क्षेत्र पुढीलप्रमाणे आहेत  १)सेंट झेविअर्स टेक्निकल इन्स्टिट्यूट, माहीम येथे इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी विषय  २) अंजुमन-इ-इस्लाम  भायखळा येथे इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स, रिटेल, हॉस्पिटॅलिटी, आयटी, ऑटोमोबाईल, सिव्हिल, मेकॅनिकल, होम सायन्स या हे विषय ३) सिद्धार्थ कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स फोर्ट येथे बँकिंग, फायनान्स हे विषय ४) श्रीमती मणीबेन एम. पी. शाह महिला महाविद्यालय माटुंगा येथे बँकिंग, अकाऊंटन्सी, फायनान्स, इन्शुरन्स, लॉजिस्टिक्स, शिपिंग, आयटी, रिटेल, ई-कॉमर्स हे विषय ५) जय हिंद कॉलेज,फोर्ट येथे आयटी, बँकिंग, रिटेल, ई-कॉमर्स, टुरिझम, हॉस्पिटॅलिटी, कॉर्पोरेट्स,स्टार्टअप्स व शासकीय संस्था हे विषय ६) गुरु नानक खालसा महाविद्यालय माटुंगा येथे बँकिंग, फायनान्स, ई-कॉमर्स, टुरिझम आणि हॉस्पिटॅलिटी हे विषय ७) अंजुमन-इ-इस्लाम इन्स्टिट्यूट ऑफ हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट येथे फोर्ट बँकिंग, फायनान्स, ई-कॉमर्स, टुरिझम आणि हॉस्पिटॅलिटी हे विषय ८) ऑल इंडिया असोसिएशन ऑफ इंडस्ट्रीज फोर्ट येथे सर्व क्षेत्रे आणि एमएसएमई हे विषय  ९) बॉम्बे टेक्निकल स्कूल ऑफ इंजिनिअरिंग गिरगाव येथे इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी हे विषय  १०) एमव्हीआयआरडीसी वर्ल्ड ट्रेड सेंटर फोर्ट सर्व क्षेत्र आणि एमएसएमई या विषयासंदर्भाती रोजगार मेळावे आयोजित केले आहेत.

इयत्ता १० वी, १२ वी, पदवीधर, पदव्युत्तर, आयटीआय, डिप्लोमा आणि इतर व्यावसायिक कौशल्य असणारे सर्व पात्र उमेदवार या मेळाव्यात व प्रशिक्षणात सहभागी होऊ शकतात. उमेदवारांनी https://forms.gle/vBTzRQKYBBuBT4em7  या लिंकवर जाऊन पूर्व-नोंदणी पूर्ण करावी, जेणेकरून त्यांना मोफत प्रशिक्षणाचा लाभ घेता येईल. या प्रशिक्षणासाठी उमेदवारांकडून कोणतेही शुल्क घेतले जाणार नाही. मुलाखतीची तयारी, संवाद कौशल्य, व्यक्तिमत्त्व विकास आणि सॉफ्ट स्किल्स या बाबतीत उमेदवारांना नोकरीपूर्व प्रशिक्षण दिले जाईल. मुंबई शहर व परिसरातील सर्व खासगी कंपन्या, कॉर्पोरेट संस्था, बँकिंग, रिटेल, आयटी, मॅन्युफॅक्चरिंग आणि सेवा क्षेत्रातील उद्योजकांनी  आपल्या आस्थापनेवरील सर्व रिक्त पदांची माहिती (https://forms.gle/Mrz8Gc3ofqq37wwr6)   या लिंकवर नोंदवावी. मुंबई शहर मधील सर्व उद्योजकांनी आणि बेरोजगार युवक-युवतींनी ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय विश्वविक्रमी रोजगार महाकुंभ’ मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

०००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed