• Fri. Sep 4th, 2026

Mumbai Double Decker Bus: ‘उंच’ डबल डेकरला लाल सिग्नल, नव्या बसची उंची कमी ठेवण्याचे निर्देश

Mumbai AC Double Decker Bus: आता प्रवाशांच्या सेवेत येणार असलेल्या १५० नवीन डबल डेकर बसगाडीची उंची मर्यादित ठेवा, असे निर्देश गुरुवारी झालेल्या बेस्ट समितीच्या बैठकीत समितीकडून बेस्ट प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
मुंबई : वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) ते कुर्ला रेल्वे स्थानक मार्गावर धावणाऱ्या एसी डबल डेकर बस सेवेला तूर्तास ब्रेक लागला आहे. डबल डेकर बसगाडीच्या उंचीमुळे या मार्गावरील सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोड पुलाखालून जाताना तांत्रिक समस्या, सुरक्षिततेचा प्रश्न येऊ लागल्याने, डबल डेकरऐवजी सिंगल डेकर बसगाडी चालवण्याची वेळ बेस्ट उपक्रमावर आली आहे.

‘बेस्ट’च्या आयुर्मान संपलेल्या विनावातानुकूलित डबल डेकर बसगाड्या ताफ्यातून हद्दपार झाल्यानंतर, भाडेतत्त्वावर इलेक्ट्रिक एसी बस दाखल करण्यास सुरुवात झाली. ‘बेस्ट’ उपक्रमाने अशा २०० बस ‘स्वीच मोबिलिटी’ कंपनीकडून भाडेतत्त्वावर घेण्यास सुरुवात केली. पहिल्या डबल डेकर एसी बसगाडीला ऑगस्ट २०२२मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आला होता. त्यानंतर उपक्रमाने फेब्रुवारी २०२३पासून पर्यावरणपूरक एसी इलेक्ट्रिक डबल डेकर बसगाडी चालवण्यास सुरुवात केली.

Maharashtra TimesTukaram Mundhe : इट्स डन सिस! वांद्य्रातील कॅफेत तुकाराम मुंढेंना पाठवेन, सलमान खानची मैत्रिणीला प्रेमळ तंबीया २०० पैकी आतापर्यंत ५० बसगाड्या दाखल झाल्या आहेत. उर्वरित बसगाड्या मार्च २०२४ पर्यंत येणे अपेक्षित होते. मात्र या बसगाड्यांना विविध कारणांमुळे विलंब झाला आहे. बेस्ट समितीच्या बैठकीत सर्वानुमते १५० एसी डबल डेकर बसगाड्या घेण्याचा प्रस्ताव नुकताच मंजूर करण्यात आला आहे. मात्र सध्या सेवेत असलेल्या ५० पैकी काही डबल डेकर बसगाड्यांची उंची जास्त आहे. त्यामुळे पुलाखालून जाताना या बसला समस्या येत आहेत.

सध्या सेवेत असलेल्या डबलडेकर बसगाड्यांची उंची ४५८ सेंमी आहे. यामुळे विशेषतः चेंबूर-सांताक्रूझ जोडरस्त्यावरून आणि बीकेसी-कुर्ला परिसरातून बस चालविताना उंचीचा प्रश्न निर्माण होत आहे. पुलाखालून बस सुरक्षित जाऊ शकत नसल्याने या बस वांद्रे एमटीएनएल कार्यालय ते वांद्रे टर्मिनस अशा चालवण्यात येत आहेत. तर बीकेसी ते कुर्ला रेल्वे स्थानक मार्गावर डबल डेकर बसऐवजी सिंगल डेकर बस चालवल्या जात आहेत. यापुढे ताफ्यात येणार असलेल्या नव्या १५० डबल डेकर बसची उंची ४७५ सेंमी आहे. त्यामुळे या बसची उंची कमी ठेवा, असे निर्देश गुरुवारी झालेल्या बेस्ट समितीच्या बैठकीत प्रशासनाला देण्यात आले.

Maharashtra TimesRahul Gandhi: ‘छात्रों की गूंज’चा पुढचा टप्पा संघभूमीत; पुण्यानंतर राहुल गांधींचा आता नागपूरकडे मोर्चापाच बसगाड्या ‘ओपन डेक’
ताफ्यात येणार असलेल्या १५० डबलडेकर बसांपैकी पाच बस ओपन डेक प्रकारातील असणार आहेत. दक्षिण मुंबईतील पर्यटनस्थळांची सफर घडविण्यासाठी या बसचा वापर करण्यात येणार आहे.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा