• Tue. Sep 1st, 2026

Eknath Shinde : महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे घडामोडी, एकनाथ शिंदे अचानक दिल्ली दौऱ्यावर, पत्रकारांना दिली प्रतिक्रिया

एकनाथ शिंदे आज अचानक दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. विशेष म्हणजे कॅबिनेट बैठक सोडून ते दिल्लीला गेले आहेत. दिल्लीत दाखल होताच त्यांनी पत्रकारांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी दिल्ली दौऱ्याचं कारण सांगितलं आहे.

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
नवी दिल्ली / मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. ते दिल्लीत दाखलदेखील झाले आहेत. विशेष म्हणजे आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. ही मंत्रिमंडळ बैठक सोडून एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना झाले. दिल्लीत दाखल होताच एकनाथ शिंदे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी दिल्ली दौऱ्यामागचं कारण सांगितलं. सुप्रीम कोर्टात उद्या शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणावर तसेच आमदार अपात्रता प्रकरणावर सुनावणी होणार आहे. आता शिंदेंच्या वकिलांकडून युक्तिवाद केला जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर वकिलांशी चर्चा करण्यासाठी दिल्ली दौऱ्यावर आल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच त्यांनी इतरही कारण सांगितलं.

एकनाथ शिंदे काय म्हणाले?

“मी दिल्लीला आल्यावर काही विषय पाहिजे, असं आहे का? मी दिल्लीत येत असतो. आता राज्य प्रमुखांच्या बैठका आहेत. संघटनात्मक आढावा घ्यायचा आहे. विविध राज्यांचा आढावा घ्यायचा आहे. काही ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. त्याबाबतही चर्चा करायची आहे. तसेच सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीचा आढावा, तसेच उद्यापासून शिवसेनेच्या बाजूने होणारा युक्तिवाद याबाबत चर्चा करायची आहे”, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली.

“धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याची मागणी करणं ही अतिशय दुर्दैवी आणि दुखद बाब आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना जे धनुष्यबाण प्राणाहून प्रिय होतं. ते धनुष्यबाण ते देवाऱ्यात ठेवायचे. ते गोठवण्याची मागणी हे अतिशय दुर्दैवी आहे. त्याचबरोबर बाळासाहेबांचे विचार तर त्यांनी 2019 मध्ये गोठवलेच. हिंदुत्वही गोठवलं. त्याचबरोबर महाराष्ट्रातील जनतेचं बहुमतही गोठवलं. बाळासाहेबांची घटनादेखील गोठवली”, असा आरोप शिंदेंनी केला.

Maharashtra TimesTarannum Khan : हवाई सुंदरी होण्याचं स्वप्न, पण नियतीने दुसऱ्या मार्गाला नेलं अन् ठरली मुंबईतील सर्वात प्रसिद्ध बारबाला , तेलगीने एका रात्रीत तिच्यावर 90 लाख उधळले“बाळासाहेबांची घटना बदलण्याचं काम त्यांनी केलं. आता धनुष्यबाण गोठवण्याची मागणी करत आहेत. याचाच अर्थ बाळासाहेबांचे विचार, भूमिका, धोरण, हिंदुत्वाचे विचार, राष्ट्रीयत्वाचे विचार हे सगळं पुसण्याचं काम दुर्दैवाने होत आहे. पण आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन, ज्येष्ठ दिवंगत नेते आनंद दिघे यांचे विचार घेऊन निघाले आहेत. ते लोकांनी स्वीकारलं आहे. जनतेने आशीर्वाद दिले आहेत”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

“कोर्टाच्या सुनावणीबाबत वकिलांसोबत चर्चा करणार आहोत. लोकशाहीत बहुमत असतं. त्यावरच निर्णय होत असतात. मी यावर जास्त भाष्य करु इच्छित नाही. कारण विषय न्यायप्रविष्ट आहे. आम्ही न्यायालयाचा सन्मान करणारे लोक आहोत. काही लोकं तर न्यायालयाला देखील मार्गदर्शन करतात. निवडणूक आयोगावर बेछूट आरोपदेखील करतात. तशी भूमिका आमची नाही. त्यामुळे मी विस्तीर्ण चर्चा करु इच्छित नाही. न्याय देवतेवर आमचा विश्वास आहे. जनतेच्या न्यायालयातदेखील आम्हाला भरभरुन आशीर्वाद मिळाला आहे”, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली.

मनसे-भाजप वादावर प्रतिक्रिया

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहमीच छत्रपती शिवाजी महाराज यांना दैवतासमान आदर दिलेला आहे. मोदींनी नौदलाच्या ध्वजावरही छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा प्रस्थापित केलेली आहे. यावरुन छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जो नितांत आदर नरेंद्र मोदी यांना आहे तो आपण वेळोवेळी पाहिलेला आहे”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

“देशाचा कारभार करतानादेखील छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद असं म्हणत निवडणुकीला सामोरे गेले. तसेच सरकार स्थापन करताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने सरकार स्थापन झालं असं म्हटलं. त्यामुळे शिवाजी महाराज यांच्याबद्दल नितांत आदर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आहे. कुठला फोटो कुठे लावला होता ते बघावे लागेल. छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना तर मोदींनादेखील आवडणार नाही. प्रोटोकॉलप्रमाणे राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांचे फोटो सरकारी कार्यालये आणि विमानतळ येथे पाहतो”, अशीदेखील प्रतिक्रिया त्यांनी दिली.

चेतन पाटील

लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा