हा अपघात रविवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास एस.व्ही. रोड आणि मामलेदारवाडी रोडच्या चौकात घडला. मालाड पोलिसांच्या माहितीनुसार, चमणकरच्या ‘एमजी विंडसर’ कारने तीन रिक्षा आणि एका दुचाकीला धडक दिली. अपघातात जखमी झालेल्या सहा जणांमध्ये ॲडव्होकेट प्रियंका सत्रा यांचाही समावेश होता. त्या आपल्या पतीच्या दुचाकीवर मागे बसल्या होत्या. नंतर रुग्णालयात त्यांना मृत घोषित करण्यात आले.
आरोपीला व्हीआयपी ट्रीटमेंट
अपघाताची माहिती आणि चौकात जमा झालेली गर्दी याबद्दल नियंत्रण कक्षाला सूचना मिळताच पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. चमणकरला पोलीस ठाण्यात आणून अटक करण्यात आली, असे पोलिसांनी सांगितले. परंतु प्रियंका मयंक सत्रा यांच्या कुटुंबीयांनी केलेल्या दाव्यानुसार, कार चालक कृष्णा शांताराम चमणकर याला पोलीस ठाण्यात असताना मोबाईलवरुन फोन करण्याची आणि एसी खोलीत बसण्याची मुभा देण्यात आली होती.
मालाड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०६(१) (निष्काळजीपणामुळे मृत्यू), २८१ (सार्वजनिक रस्त्यावर बेदरकारपणे वाहन चालवणे) आणि १२५(A) व १२५(B) (जीव किंवा वैयक्तिक सुरक्षितता धोक्यात आणणे आणि दुखापत/गंभीर दुखापत पोहोचवणे) तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ (धोकादायक वाहन चालवणे) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी सांगितले की, त्यानंतर आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले.
Priyanka Satra : कारच्या धडकेत मुंबईकर विवाहितेचा मृत्यू, अंत्यदर्शनाला पती व्हिलचेअरवर आला, चिमुरड्या लेकरांचा टाहो, उपस्थितांच्या काळजाचं पाणी
‘आरोपीला वेगळी वागणूक का?’
हा विषय आता केवळ अपघातापुरता मर्यादित राहिलेला नाही. चमणकरला मालाड पोलीस ठाण्यात नेल्यानंतर कशा प्रकारे वागणूक दिली गेली, यावरुन सत्रा कुटुंबीयांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.
नातेवाईकांनी दावा केला की, त्या रात्री उशिरा जेव्हा ते पोलीस ठाण्यात पोहोचले, तेव्हा चमणकरला मोबाईल फोन वापरण्याची आणि बसण्यासाठी खुर्ची मिळण्याची सुविधा देण्यात आली होती. तसंच त्याला नंतर पोलीस ठाण्यातील एका एसी खोलीत नेण्यात आले, असा आरोपही त्यांनी केला. ३०-३१ ऑगस्टच्या रात्री पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही फुटेज सेव्ह करुन त्याची तपासणी करावी, अशी मागणी पीडित कुटुंबाने केली आहे. आरोपीला एखाद्या अधिकाऱ्याने विशेष वागणूक दिली होती का, हे तपासणे हा यामागचा उद्देश आहे.
प्रवीण छेडांचे गंभीर आरोप
‘मुंबई मिरर’शी बोलताना नगरसेवक प्रवीण छेडा यांनी आरोप केला की, चमणकर याचे ‘महाराष्ट्र सदन’ घोटाळ्याशी संबंध होते आणि तो एका वरिष्ठ राजकीय नेत्याशी संबंधित होता. याच संबंधांमुळे आरोपीला पोलीस ठाण्यात विशेष वागणूक मिळाली असावी, असा दावा त्यांनी केला.
Crime News : सोशल मीडियावरील मैत्रीतून लव्ह मॅरेज, पण दीड वर्षातच फिस्कटलं, मेहुणीच्या दाराला कडी घातली, 27 वर्षीय पत्नीचा जीव घेतला“कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याने आरोपीला मदत केली होती का आणि एका सामान्य आरोपीच्या तुलनेत त्याला वेगळी वागणूक का दिली गेली, याची चौकशी झाली पाहिजे” असे छेडा म्हणाले.
आरोपीच्या वैद्यकीय तपासणीसाठी अवलंबलेल्या प्रक्रियेवरही छेडा यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांनी आरोप केला की, चमणकरच्या रक्ताचा नमुना त्वरित घेण्यात आला नाही आणि सुरुवातीला केवळ वाहतूक पोलिसांमार्फत ‘ब्रेथ अॅनलायझर’ चाचणी करण्यात आली. तसेच अपघातानंतर अनेक तासांनी, म्हणजेच पहाटे ३ वाजताच्या सुमारास त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली, असा आरोपही त्यांनी केला.
आरोपीला पोलीस कर्मचाऱ्यांकडून मदत मिळाली होती, असा आरोप एका नातेवाईकाने केला आणि या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली.
विलंबाच्या दाव्यावर पोलिसांचे म्हणणे
वैद्यकीय तपासणीस विलंब झाल्याच्या आरोपाशी पोलिसांचे म्हणणे विसंगत आहे. घटनेबाबतच्या अधिकृत माहितीनुसार, मालाड पोलिसांनी सांगितले की, अपघातानंतर लगेचच चमणकरला ताब्यात घेण्यात आले आणि शताब्दी रुग्णालयात त्याची वैद्यकीय तपासणी त्वरित करण्यात आली.
आरोपीला पोलीस ठाण्यात कधी आणले, ब्रेथलायझर चाचणी कधी झाली, त्याला रुग्णालयात कधी नेले, रक्ताचे नमुने घेतले गेले का आणि मालाड पोलीस ठाण्याबाहेरील एखाद्या अधिकाऱ्याने या प्रक्रियेत हस्तक्षेप केला का, या सर्व गोष्टींचा नेमका घटनाक्रम स्पष्ट करण्यासाठी कुटुंबाला स्वतंत्र चौकशी हवी आहे.
Indian Women killed in US : दोन भारतीय महिलांना अमेरिकेत संपवलं, एकामागून एक जीव घेतला, मैत्रिणीलाच अटक“व्हीआयपी वागणूक” मिळाल्याच्या आरोपांमध्ये काही तथ्य आहे का, हे तपासण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज आणि पोलीस ठाण्यातील नोंदींची छाननी करावी, अशी मागणीही छेडा यांनी केली आहे.
