• Tue. Sep 1st, 2026

मुंबई : नेपाळ-तिबेट सीमेवरील विनाशकारी पुरामुळे मृतांचा आकडा वाढत असतानाच एका मुलाने आपल्या बेपत्ता आई वडिलांच्या शोधासाठी थेट ॲपलकडे जाहीर आवाहन केल्यामुळे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे. शोधाचे इतर सर्व मार्ग खुंटले असताना हरवलेल्या व्यक्तीच्या आयफोनमधील ‘लोकेशन डेटा’त्यांना शोधण्यात मदत करू शकतो का? असा प्रश्न विचारला जात आहे. पाटणकर दाम्पत्य हे मुंबईतील डॉक्टर मिलिंद चितळे यांच्या ‘हिल्स अँड ट्रेल्स’ ग्रुपसोबत नेपाळला गेले आहेत.

पाटणकरांच्या मुलाचे ॲपलला जाहीर आवाहन

‘पालँटिर’मधील फ्रंट-एंड इंजिनिअर अंकुर पाटणकर यांनी लिंक्डइनवर एक कळकळीचे आवाहन केले. त्यांनी म्हटले आहे की, नेपाळ-तिबेट सीमेवरील तिमुरे आणि रसुवागढी भागात आलेल्या पुरामुळे त्यांचे आई-वडील, सतीश विनायक पाटणकर आणि रेखा सतीश पाटणकर, २६ ऑगस्टपासून बेपत्ता आहेत. ते कैलास मानसरोवर यात्रेवर असताना रसुवागढी-ग्यिरोंग सीमा ओलांडून पुढे जात असताना ही दुर्घटना घडली. तेव्हापासून आई वडिलांशी त्यांचा कोणताही संपर्क झालेला नाही.

ही पोस्ट विशेष ठरण्याचे कारण म्हणजे त्यातील ॲपलला केलेले तांत्रिक स्वरुपाचे आवाहन. पाटणकर यांनी लिहिले की, त्यांच्या आई-वडिलांकडे आयफोन आहेत. ते ॲपलला कंपनीची स्वतःची गोपनीयता धोरणे (प्रायव्हसी प्रोटेक्शन्स) मोडण्यास किंवा ग्राहकाची खाजगी माहिती थेट त्यांना देण्यास सांगत नाहीत. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या भारतीय आणि नेपाळी अधिकाऱ्यांशी ॲपलने तातडीने संपर्क साधावा आणि त्यांच्या आई-वडिलांची डिव्हाईसेस किंवा ॲपल सेवांशी संबंधित अशी कोणतीही कायदेशीररित्या उपलब्ध माहिती त्यांच्या ठावठिकाण्याबाबत काही सुगावा देऊ शकते का, हे तपासावे. डिव्हाईसचे शेवटचे ‘कनेक्शन’ किंवा ॲपलला अधिकाऱ्यांसोबत शेअर करण्याची कायदेशीर परवानगी असलेला इतर कोणताही डेटा, शोधाचे प्रचंड विस्तारित क्षेत्र मर्यादित करण्यास मदतीचा ठरु शकतो, असं अंकुर पाटणकर म्हणतात.

Priyanka Satra : कारच्या धडकेत मुंबईकर विवाहितेचा मृत्यू, अंत्यदर्शनाला पती व्हिलचेअरवर आला, चिमुरड्या लेकरांचा टाहो, उपस्थितांच्या काळजाचं पाणी

आई-वडिलांचे ॲपल डिव्हाईस

त्यांच्याकडे आई-वडिलांच्या ॲपल अकाऊण्टची माहिती, आयएमईआय नंबर किंवा सिरीअल नंबर्स नाहीत; मात्र त्यांच्याकडे त्यांची नावे, भारतीय मोबाईल क्रमांक, पासपोर्टचे तपशील आणि इतर ओळख पटवणारी माहिती उपलब्ध आहे, जी ते खाजगीरित्या देऊ शकतात. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये ॲपलचे अधिकारी टिम कूक, क्रेग फेडेरिघी, एडी क्यू आणि जॉन टर्नस यांची नावे नमूद करत विनंती केली की, ही पोस्ट त्यांच्यापैकी कोणापर्यंतही पोहोचल्यास ती ॲपलच्या ‘आपत्कालीन’ किंवा ‘लाईफ सेफ्टी’ विभागापर्यंत पोहोचवली जावी.

पाटणकर कुटुंबाची ही परिस्थिती पुराच्या पार्श्वभूमीवर अनेक देशांमध्ये दिसून येणाऱ्या एका विशिष्ट परिस्थितीचे प्रतिबिंब आहे. अमेरिकेतही, बेपत्ता नागरिकांच्या कुटुंबीयांनी ‘ॲपल फाइंड माय’ ॲपचा उल्लेख केला आहे; ठोस सुगावा देणाऱ्या मोजक्या साधनांपैकी हे एक साधन असल्याचे त्यांनी सांगितले आहे. एनबीसीने दिलेल्या एका वृत्तानुसार, पूरपरिस्थितीपासून बेपत्ता असलेल्या ५० वर्षीय अमेरिकन नागरिक ‘जीवन ज्योती’ यांच्या एका मित्राने सांगितले की, त्यांचे लोकेशन ‘फाईण्ड माय आयफोन’ द्वारे बाधित क्षेत्रातील एका हॉटेलमध्ये शेवटचे नोंदवले गेले होते; नंतर हे हॉटेल पूर्णपणे नष्ट झाल्याचे स्पष्ट झाले.

या आपत्तीची व्याप्ती पाहता, शोधकार्यात डिव्हाइस डेटा किती महत्त्वाचा ठरत आहे, हे समजून येते. नेपाळी प्रशासनाने शेकडो जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली असून, बाधित सीमावर्ती भागात २००० हून अधिक जण बेपत्ता आहेत. या आठवड्यापर्यंतच्या वृत्तांनुसार, बेपत्ता असलेल्यांमध्ये किमान ८५ अमेरिकन नागरिकांचाही समावेश आहे. नेपाळ-चीन सीमेवरील विस्तीर्ण आणि दुर्गम भागात अधिकृत शोध मोहिमा राबवल्या जात असताना, बेपत्ता नातेवाईकांनी मागे सोडलेल्या कोणत्याही डिजिटल ट्रेल्सचा आधार घेण्याकडे कुटुंबे वळत आहेत.

Ankur Patankar

या परिस्थितीत ॲपल कायदेशीररीत्या काय करू शकते?

अनौपचारिक विनंतीवरुन (अगदी कुटुंबातील सदस्यांकडून आलेल्या विनंतीवरूनही) युजरचा डेटा उघड न करण्याबाबत ॲपलची धोरणे अत्यंत कडक आणि दीर्घकाळापासून अस्तित्वात आहेत. कौटुंबिक वाद किंवा बळजबरी यांसारख्या प्रकरणांमध्ये युजरच्या प्रायव्हसीचे रक्षण करणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. मात्र कायदेशीररीत्या वैध विनंत्या प्राप्त झाल्यास कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्था आणि सरकारी यंत्रणांशी विशिष्ट डेटा शेअर करण्यासाठी ॲपलकडे निश्चित कार्यपद्धती उपलब्ध आहे.

Maharashtra TimesIndian Women killed in US : दोन भारतीय महिलांना अमेरिकेत संपवलं, एकामागून एक जीव घेतला, मैत्रिणीलाच अटकपाटणकर यांची विनंती नेमक्या याच मार्गाचा अवलंब करण्याच्या उद्देशाने केली गेली आहे. त्यांच्या पोस्टमध्ये ॲपलला गोपनीयतेच्या संरक्षणाचे नियम धाब्यावर बसवण्याची कोणतीही मागणी केलेली नाही. त्याऐवजी, शोधकार्यात आधीच सहभागी असलेल्या भारतीय आणि नेपाळी अधिकाऱ्यांशी कंपनीने पुढाकार घेऊन समन्वय साधावा, अशी विनंती त्यांनी केली आहे. जेणेकरून कायदेशीररीत्या शेअर करण्यायोग्य असलेला डेटा (उदा. नेटवर्कशी झालेला शेवटचा संपर्क) योग्य मार्गाने तपास अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचू शकेल.