Mumbai News : मुंबईच्या उच्चभ्रू परिसरात मन हेलावणारी घटना, आठ वर्षांचा अंश रस्ता ओलांडत होता, मागेपुढे गाडी नव्हती, अचानक लक्झरी कार आली अन् होत्याचं नव्हतं
मुंबईत आठ वर्षीय चिमुकल्याला एक भरधाव कारने चिरडल्याची घटना घडली. या घटनेत चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेप्रकरणी मुंबई पोलिसांनी महिला कारचालकाला अटक केली आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : मुंबईत उच्चभ्रू परिसरात एक धक्कादायक अपघाताची घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत एका 8 वर्षाच्या निष्पाप चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. एका भरधाव लक्झरी कारने या आठ वर्षाच्या चिमुकल्याला चिरडल्याची घटना घडली. संबंधिक लक्झरी कार एक महिला चालवत होती, अशी माहिती समोर आली आहे. पोलिसांनी महिला चालकाला अटक देखील केली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. तसेच चिमुकल्याच्या मृत्यूच्या घटनेमुळे परिसरात संताप आणि हळहळदेखील व्यक्त होत आहे. या घटनेमुळे मुंबईच्या रस्त्यांवरील सर्वसामान्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
ही अपघाताची घटना रविवारी (30 ऑगस्ट) दुपारी वांद्रे पश्चिम येथील जिजामाता उद्यानासमोर घडली. आठ वर्षीय चिमुकला अंश गुप्ता हा रस्ता ओलांडत होता. याच वेळेस लक्झरी कार भरधाव वेगाने आली. या कारने अंशला धडक दिली. या घटनेत अंश गुप्ता हा चिमुकला गंभीर जखमी झाला. या अपघाताच्या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली. अपघाताच्या घटनेनंतर नागरिकांची परिसरात मोठी गर्दी जमा झाली.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, अंशला धडक देणारी इनोव्हा क्रिस्टा कार खूप जास्त वेगाने धावत होती. ही गाडी मेघा रावल नावाची महिली चालवत होती. ती प्रचंड वेगाने आणि अत्यंत निष्काळजीपणे गाडी चालवत होती. फक्त एवढेच नाही तर गाडी चालवत असताना ती मोबाईलवर बोलत होती. मेघा रावल हिने मानवी जीवितास धोका होईल, अशा स्वरुपाने गाडी चालवली आणि फोनवर बोलण्याच्या नादात रस्ता ओलांडणाऱ्या अंश गुप्ता याच्या अंगावरुन गाडी नेली.
Eknath Shinde : भाषणावेळी मराठा आंदोलकांची घोषणाबाजी, एकनाथ शिंदे यांचं जरांगेंचा उल्लेख करत भावनिक भाष्यअंश गुप्ता हा चिमुकला या अपघातात गंभीर जखमी झाला. घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी गर्दी केली. तसेच अंशला तातडीने जवळील रुग्णालयात नेण्यात आलं. त्याला हॉली फॅमिली हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी अंशला तपासले असता त्यांनी त्याचा मृत्यू झाला, असं घोषित केलं. यामुळे गुप्ता कुटुंबावर मोठा आघात घडला. त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला.
पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले
या अपघाताच्या घटनेनंतर काही प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच वांद्रे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यावेळी घटनास्थळी मोठा गोंधळ उडालेला होता. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी वाहन चालक महिलेला ताब्यात घेतलं. तसेच अपघातग्रस्त कारदेखील ताब्यात घेतली.
Baramati News : पोलीस बनून समाजाला प्रेरणा दिली, स्वप्न साकार करणाऱ्या संगीता यांचं डोंबिवलीत टोकाचं पाऊल, बारामतीकर सुन्नया घटनेनंतर मृतक अंश गुप्ता याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे. पोलिसांकडून या घटनेप्रकरणी सखोल तपास केला जात आहे. पोलिसांनी आरोपी महिला वाचन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिला अटक करण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणी सखोल तपास करुन अपघात नेमका कोणत्या करणामुळे घडला? याचा शोध घेणार आहेत. या प्रकरणी आता काय-काय कारवाई होते ते पाहणं महत्त्वाचं आहे.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा