• Mon. Aug 31st, 2026

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटलांना 35 दिवस बसवून ठेवू नका, तातडीने तोडगा काढा; अभिजीत दिपके यांची सरकारकडे मागणी

मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला कॉक्रोच जनता पार्टीचे प्रमुख अभिजीत दिपके यांनी समर्थन दिलं आहे. सरकारने मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर तातडीने तोडगा काढावा, अशी मागणी अभिजीत दिपके यांनी केली आहे.

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर : सरकारने विद्यार्थ्यांचे प्रश्न वेळेवर न सोडवल्यामुळे आज तरुणांवर रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे. जंतर-मंतरवर आम्हाला जसे ३५ दिवस बसवून ठेवले होते, तसा प्रकार मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत करू नका. त्यांच्याशी तात्काळ चर्चा करून मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली काढा, अशी रोखठोक मागणी कॉक्रोच जनता पार्टीचे प्रमुख अभिजीत दिपके यांनी पत्रकार परिषदेत केली. यावेळी त्यांनी लवकरच जालन्यात जाऊन मनोज जरांगे यांची वैयक्तिक भेट घेणार असल्याचे स्पष्ट केले.

छत्रपती संभाजीनगर येथील निवासस्थानी अभिजीत दिपके यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना दिपके म्हणाले की, बॉम्बे हायकोर्टाच्या टायपिंग परीक्षेत की-बोर्ड आणि सर्वरच्या तांत्रिक अडचणींमुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले होते. ही परीक्षा रद्द करून नव्याने घ्यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी लावून धरली होती. ही मागणी मान्य करत परीक्षा रद्द करण्यात आली आहे. ज्या सेंटरवर गोंधळ झाला, तिथे पुन्हा परीक्षा घेऊ नये , अशी मागणी दिपके यांनी केली.

Maharashtra TimesEknath Shinde : भाषणावेळी मराठा आंदोलकांची घोषणाबाजी, एकनाथ शिंदे यांचं जरांगेंचा उल्लेख करत भावनिक भाष्य

अभिजीत दिपके यांचा पुन्हा आंदोलनाचा इशारा

विद्यार्थ्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याबाबत सरकारने कोर्टाचे कारण पुढे केले आहे. मात्र, कोर्टाने हिरवा कंदील देऊनही सरकार विद्यार्थ्यांची यादी सादर करत नसल्याचा आरोप दिपके यांनी केला. या अन्यायाविरोधात ५ तारखेला दिल्लीतील जंतर-मंतरवर देशभरातील विद्यार्थ्यांचे आतापर्यंतचे सर्वात मोठे आंदोलन उभारले जाईल, असा इशारा त्यांनी दिला.

जरांगे पाटील काही चुकीचं मागत नाहीत

मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत दिपके म्हणाले, जेव्हा सरकार शिक्षण आणि रोजगाराच्या संधी देण्यात अपयशी ठरते, तेव्हाच एखाद्याला आंदोलनाचा मार्ग निवडावा लागतो. जरांगे पाटील मराठा समाजाच्या मुलांसाठी शिक्षण आणि रोजगाराचा मूलभूत हक्क मागत आहेत, यात काहीही चुकीचे नाही. जरांगे सर स्वतः दिल्लीत आंदोलनाला आले होते, त्यामुळे मी नक्कीच त्यांची भेट घेऊन पाठिंबा देणार आहे.

Maharashtra TimesBaramati News : पोलीस बनून समाजाला प्रेरणा दिली, स्वप्न साकार करणाऱ्या संगीता यांचं डोंबिवलीत टोकाचं पाऊल, बारामतीकर सुन्न

सोनम वांगचुक यांच्या व्हिडीओवर अभिजीत दिपके यांची प्रतिक्रिया

यावेळी सोनम वांगचुक यांनी विद्यार्थ्यांवर अविश्वास दाखवल्याच्या चर्चेचा दिपके यांनी इन्कार केला. वांगचुक यांच्या व्हिडिओचा चुकीचा अर्थ काढला जात आहे. सध्याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या राजकारण्यांपेक्षा ही शिकलेली तरुण मुले खूप चांगली आहेत, असेच ते म्हणाले आहेत. त्यामुळे माझ्या मनात त्यांच्याविषयी कोणताही राग नाही, असे त्यांनी नमूद केले.