Navi Mumbai News: महापौर सुजाता पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्य महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत विविध नागरी सुविधा कामांच्या प्रस्तावांना सर्वानुमे मंजुरी देण्यात आली.
प्रस्तावांना मंजुरी मिळाल्याने नागरिकांना सुविधा उपलब्ध होणार
महापौर सुजाता पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या वतीने सादर करण्यात आलेले प्रस्ताव सभागृह नेते सागर नाईक यांनी मान्यतेसाठी मांडले. या प्रस्तावांना मंजुरी मिळाल्याने नागरिकांना नागरी सुविधा उपलब्ध होणार आहेत.
डब्ल्यूबीएमचा पोहोच रस्ता तयार करण्यासही मान्यता
सेक्टर २१, नेरुळ येथील शंकराचार्य उद्यानामागील रिंग रोड आणि रेडियल रोड परिसरात सखल भागामुळे पावसाचे पाणीसाचते. त्यामुळे रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. या रस्त्याचे डांबरीकरण करून सुधारणा करण्यास मंजुरी देण्यात आली. दगडखाणीच्या जागेवर प्रस्तावित भटक्या कुत्र्यांच्या निवारा शेडपर्यंत आवश्यक भराव करून डब्ल्यूबीएमचा पोहोच रस्ता तयार करण्यासही मान्यता देण्यात आली.
Thane News: मॅरेथॉनसाठी ठाणे सज्ज; ३० हजार स्पर्धकांचा सहभाग, शहरातील वाहतुकीत बदल
पावणेगावात १,०५३ मीटरचे गटार
करावे-साईवाडी परिसरात पावसाळ्यात घरांमध्ये पाणी शिरण्याची समस्या दूर करण्यासाठी आरसीसी गटार बांधण्यास मंजुरी देण्यात आली. पावणेगावातील अरुंद गटारांमुळे पावसाळ्यात पाणी आणि सांडपाणी साचत असल्याने तेथे १,०५३ मीटर लांबीचे आणि १.१ मीटर रुंदीचे आरसीसी गटार बांधण्यात येणार आहे.
रेल्वे हद्दीलगत ७३० मीटर लांबीचे चेन-लिंक फेन्सिंग
सानपाडा सेक्टर १ मधील शिवालय कॉम्प्लेक्स ते यशवंत टॉवरदरम्यानच्या नादुरुस्त पदपथाची स्टॅम्प काँक्रीटने सुधारणा करण्यासही मंजुरी देण्यात आली. रेल्वे हद्दीलगत ७३० मीटर लांबीचे चेन-लिंक फेन्सिंग उभारण्यास मान्यता मिळाली आहे. यामुळे कचरा टाकणे, अनधिकृत रेल्वे क्रॉसिंग आणि चोरीच्या घटना रोखण्यास मदत होणार आहे.
Nepal Flood : मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? नेपाळमध्ये बेपत्ता जीवलगांच्या कुटुंबांची घालमेल, मुंबई-पुण्यातील ग्रुप संपर्काबाहेर
तुर्भे, सानपाड्यातील कामांना चालना
तुर्भे एमआयडीसी परिसरात विविध सेवा देणाऱ्या संस्थांच्या खोदकामांमुळे रस्त्यांची दुरवस्थाझाली आहे. या चरांचे डांबरीकरण करून रस्त्यांचे पुनर्पृष्ठीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. सानपाडा सेक्टर १४ मध्ये शंकर टॉवर ते पोलिस ठाण्यापर्यंतचे नादुरुस्त हेवी ड्युटी पावसाळी गटार पुनर्बांधण्यास मंजुरी देण्यात आली. यामुळे रस्त्याची रुंदी वाढून पार्किंग आणि वाहतूक कोंडीची समस्या कमी होण्याची अपेक्षा आहे. सानपाडा सेक्टर १४ आणि १५ मधील गोरबंध सोसायटी ते कोयना सोसायटीदरम्यान नादुरुस्त ड्रेनेजच्या ठिकाणी हेवी ड्युटी एसडब्ल्यू ड्रेन बांधण्यात येणार आहे.
