• Sat. Aug 29th, 2026

Ganeshotsav 2026: गणेश मंडळांपुढे पोलिसांची शरणागती? चार बेस, चार टॉपला परवानगीची तयारी; 80 टक्के मंडळे पर्यायास अनुकूल

म. टा. प्रतिनिधी, पुणे: गणेशोत्सवातील मिरवणुकीत ध्वनियंत्रणेसाठी दोन बेस आणि दोन टॉपऐवजी चार बेस आणि चार टॉप वापरण्यास परवानगी देण्याची तयारी पोलिसांनी दर्शविल्याची माहिती सूत्रांनी दिली. डीजेच्या वापरासाठी आग्रही असलेल्या गणेश मंडळांपुढे पोलिसांनी पडती भूमिका घेतली आहे का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. सुमारे ८० टक्के मंडळांनी या पर्यायाला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

गणेशोत्सव आणि दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर ध्वनियंत्रणेच्या वापराबाबत पोलिस आणि मंडळांच्या प्रतिनिधींमध्ये चर्चा सुरू आहे. मतभेद चर्चेतून सोडविण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याचाच भाग म्हणून ध्वनियंत्रणेची क्षमता आणि वापराबाबत विविध पर्यायांवर विचार केला जात आहे.

BSNL Duct Accident: निगडीत डक्टमध्ये गुदमरुन 2 कामगारांचा करुण अंत; एकाच ठिकाणी वर्षभराने दुसरी घटना‘अतितीव्र आवाजाला बंदीच’

नागरिकांना होणारा त्रास आणि ध्वनिप्रदूषण यामुळे अतितीव्र आवाजाच्या उपकरणांना मोकळीक दिली जाणार नाही. प्लाझ्मा आणि प्रेशर मीड यांसारख्या उपकरणांच्या वापरावर बंदी कायम ठेवण्यात येणार आहे. त्याबाबत तडजोड केली जाणार नसल्याचे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी स्पष्ट केले.

गणेशोत्सवात मंडळांत दुजाभाव नको

पुण्यातील ऐतिहासिक गणेशोत्सव काही प्रमुख मंडळांपुरताच मर्यादित होत असल्याची खंत व्यक्त करून सर्व गणेश मंडळांना समान नियम लागू करावेत, अशी मागणी पुणे शहर गणेशोत्सव समितीच्या बैठकीत करण्यात आली. खडक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (२७ ऑगस्ट) हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व्यंगचित्रकार कलादालन येथे बैठक झाली. मिरवणूक वेळेत पूर्ण करण्यासाठी पोलिसांनी दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी प्रत्यक्षात होत नसल्याचा आरोप करण्यात आला.

Maharashtra TimesShilpa Gaware Case : रक्षाबंधनच्या आधीच बहिणीचा मृत्यू; इस्त्रीने चटके देत मारहाण केल्याचा आरोप, 17 वर्षे छळ सोसला, शिल्पाचा संशयास्पद मृत्यू, भावाचा दावा‘डीजे’विरोधात पुणेकर रस्त्यावर

पुण्याचा ऐतिहासिक गणेशोत्सव डीजेमुक्त वातावरणात साजरा करावा आणि पारंपरिक वाद्यांच्या माध्यमातून उत्सवाची परंपरा जपावी, या मागणीसाठी सकल हिंदू समाजाच्या वतीनेही रविवारी (३० ऑगस्ट) पायी मोर्चा काढण्यात येणार आहे. सकाळी साडेदहा वाजता पुरम चौक (अभिनव महाविद्यालय चौक) येथून मोर्चाला सुरुवात होऊन तो शनिवारवाडा पटांगण येथे पोहोचणार आहे. गणेशोत्सवातील ध्वनीयंत्रणेच्या वापराबाबत पोलिस प्रशासन आणि गणेश मंडळांमध्ये चर्चा सुरू असतानाच डीजेविरोधात नागरिकांचे हे दोन्ही उपक्रम होत आहेत. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर डीजे आणि ध्वनिप्रदूषणाचा मुद्दा अधिक चर्चेत येण्याची शक्यता आहे.

ईद-ए-मिलादच्या मिरवणुकीत कारवाई

ईद-ए-मिलादच्या मिरवणुकीत पोलिसांनी ध्वनी यंत्रणेत चार टॉप आणि चार बेसपेक्षा अधिक साउंड लावलेल्यांवर कारवाई केली. प्लाझ्मा आणि प्रेशरमीडचा वापर केलेल्या सहा साउंड सिस्टीम जप्त करण्यात आल्या आहेत. आवाज मर्यादेचे उल्लंघन केल्याप्रकरणी ११०पेक्षा अधिक प्रकरणांत पोलिसांनी खटले भरले आहेत, अशी माहिती पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed