Crime News: एकीकडे अत्याचार प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षेची मागणी होत असताना असे प्रकार थांबण्याचं नाव घेत नसल्याचं चित्र असून नांदेडमधील हादरवणारी घटना समोर आली आहे.
काका-पुतणीच्या नात्याला काळिमा! चॉकलेटचे आमिष दाखवून २ वर्षांच्या चिमुकलीवर काकाचा अत्याचार(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
नांदेड: काका आणि पुतणीचे नाते हे बाप-लेकीसारखे मानले जाते, जिथे मुलीचा प्रत्येक हक्क अन् हट्ट पूर्ण केला जातो. मात्र नांदेड जिल्ह्यात या पवित्र नात्याला काळिमा फासणारी अत्यंत संतापजनक घटना घडली आहे. चॉकलेटचे आमिष दाखवून एका ३५ वर्षीय नराधम काकाने आपल्याच दोन वर्षांच्या पुतणीवर दुष्कर्म केले. ही धक्कादायक घटना जिल्ह्यातील सोनखेड येथील आहे. विशेष म्हणजे पीडित चिमुरडी ही आरोपीला बाबा म्हणून हाक मारायची. या प्रकरणी सोनखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक नीलाभ रोहन यांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आणि तिचे आई वडील हे लोहा तालुक्यातील सोनखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी आहेत. सोमवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास चिमुकली ही घराबाहेर अंगणात खेळत होती, याच वेळी घराशेजारी राहत असलेला चुलत काकाने तिला चॉकलेटचे आमिष दाखवले आणि तो तिला घेऊन गेला. अर्धा तासानंतर परत तीला घरी सोडून निघून गेला. घरी आल्यानंतर चिमुरडीने रडायला सुरुवात केली. आईने विचारना केली असता मुलीसोबत गैरकृत झाल्याचे समजले. तात्काळ आई वडिलांनी मुलीला शासकीय रुग्णालयात दाखल केले.
चुलत काकानेच पुतणीवर दुष्कर्म केल्याने संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्परता दाखवत नराधम काकाला अटक केली. पीडित मुलीच्या आईच्या तक्रारी वरून सोनखेड पोलिसांनी आरोपी विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. चिमुकलीची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा