• Mon. Aug 24th, 2026

Nagpur News: ३० दिवसांत १ हजार कोटींचे वसुलीलक्ष्य ;उत्कृष्ट कामगिरी तर होणार गौरव,कामात हलगर्जीपणा तर होणार कारवाई, कर्मचाऱ्यांना दिला अलर्ट

Nagpur News: मालमत्ता कराबाबत नागपूर महापालिका आक्रमक झाली आहे. शहर विकासासाठी मालमत्ता कराची वसुली महत्त्वाची आहे.त्यामुळे थकीत कर न भरणाऱ्या मालमत्ताधारकांविरुध्द कारवाई करण्यात येणार आहे.२० ऑगस्ट ते ३० स्पटेंबरदरम्यान विशेष अभियान राबवण्यात येणार आहे.यासाठी संग्रकांची कार्यशाळा घेण्यात आली.

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म.टा.प्रतिनिधी,नागपूर:शहर विकासासाठी मालमत्ता कराची वसुली महत्त्वाची आहे. त्यामुळे थकीत कर न भरणाऱ्या मालमत्ताधारकांविरुद्ध चल-अचल संपत्ती जप्त करण्याची कारवाई करा, असे निर्देश महापालिका आयुक्त डॉ. विपीन यांनी कर संग्रहकांना दिले. शहरातील २ हजार २५० कोटी रुपयांच्या थकीत मालमत्ता करापैकी पुढील ३० दिवसांत १ हजार कोटी रुपये वसूल करण्याचे लक्ष्य त्यांनी निश्चित केले आहे.

२० ऑगस्ट ते ३० सप्टेंबरदरम्यान विशेष अभियान

नागपूर महापालिकेतर्फे थकीत मालमत्ता कर वसुलीसाठी २० ऑगस्ट ते ३० सप्टेंबरदरम्यान विशेष अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या नियोजनासाठी शुक्रवारी नियोजन भवनात कर संग्रहकांची कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी मनपा आयुक्त डॉ. विपीन यांनी सर्वाधिक थकबाकी असलेल्या मालमत्ताधारकांची स्वतंत्र यादी तयार करण्याचे निर्देश दिले. अशा थकबाकीदारांकडून वसुलीसाठी प्रभावी पाठपुरावा करावा, असेही त्यांनी सांगितले.

थकीत रक्कम भरण्यास टाळाटाळ तर होणार कठोर कारवाई

थकीत रक्कम भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या मालमत्ताधारकांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. आवश्यक असल्यास पाणीपुरवठा खंडित करण्याची कारवाई करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले. व्यावसायिक मालमत्तांच्या बाबतीत थकीत कर न भरल्यास तेथील चल संपत्ती जप्त करावी. या कारवाईची छायाचित्रे आणि व्हिडीओ प्रसिद्ध करून इतर थकबाकीदारांमध्येही वचक निर्माण करावा, असे निर्देश त्यांनी दिले.

जप्तीची कारवाई आणि नोटीस बजावण्याच्या प्रक्रियेबाबत मार्गदर्शन

अतिरिक्त आयुक्त मुरुगानंथम एम. यांनी सादरीकरणाद्वारे अभियानाची माहिती दिली. जप्तीची कारवाई आणि नोटीस बजावण्याच्या प्रक्रियेबाबत त्यांनी कर संग्रहकांना मार्गदर्शन केले. अतिरिक्त आयुक्त मिलिंद मेश्राम यांनी न्यायालयीन वादातील मालमत्ता वगळता इतर व्यावसायिक मालमत्तांकडून थकीत कर वसुलीला प्राधान्य देण्याच्या सूचना केल्या.

संबंधित विभागप्रमुखांवरही कारवाई केली जाईल

मालमत्ता कर विभागाच्या आस्थापनेवरील, मात्र सध्या इतर विभागांत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना संबंधित विभागप्रमुखांनी कार्यमुक्त करावे. अन्यथा संबंधित विभागप्रमुखांवरही कारवाई केली जाईल, असा इशारा बैठकीत देण्यात आला.

Maharashtra TimesMumbai Crime : प्रेयसीचा नको तो हट्ट, तरुणाने साखरपुडा मोडला, भडकलेल्या तरुणीची मुंबई पोलिसांना खोटी टिप, सोहमच्या घरी छापा टाकताच मोठा उलगडा

‘दबावाला बळी पडू नका’

करवसुलीची कारवाई करताना कोणत्याही दबावाला बळी पडू नका, असे मनपा आयुक्तांनी कर संग्रहकांना बजावले. संवेदनशील ठिकाणी कारवाई करताना आवश्यकतेनुसार एनडीएसचे पथक किंवा पोलिसांची मदत घ्यावी. कर संग्रहकांनी मागणी केल्यास पोलिस पथक उपलब्ध करून दिले जाईल, असेही त्यांनी सांगितले.

Maharashtra TimesMumbai News : बाप्पा सुखरुप सर्व पार पडू दे! भुलेश्वर दुर्घटनेमुळे लालबाग-परळमध्ये कठोर उपाययोजना, आगमनाच्या उत्साहाला सावधगिरीची किनार

कामात हलगर्जीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई

या अभियानात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर संग्रहकांचा गौरव करण्यात येणार असल्याची घोषणा आयुक्तांनी केली. मात्र, कर वसुलीच्या कामात सहभागी न होणाऱ्या किंवा हलगर्जीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. कर संग्रहकांचे प्रमुख काम कर वसुलीचे असल्याने त्यांनी नियमितपणे क्षेत्रात राहून वसुलीवर भर द्यावा, असे आयुक्तांनी स्पष्ट केले.

कांचन परुळेकर

लेखकाबद्दलकांचन परुळेकरकांचन परुळेकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कन्सलटंट पदावर कार्यरत आहेत. कांचन स्थानिक बातम्या, पायाभूत सुविधा, बांधकाम आणि विकास प्रकल्प यासाठी लिखाण करतात. त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात ही महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमधून झाली. मार्च २०२६ मध्ये महाराष्ट्र टाइम्सच्या व्हिडिओ विभागात त्यांनी इंटर्न म्हणून काम केले. सुरुवातीला त्यांनी युट्यूब, फेसबुक आणि इन्स्टाग्रामसाठी कन्टेंट तयार करताना व्हिडिओ आणि लेख लिहिले आहेत. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, स्थानिक बातम्या आणि क्राइमसह स्पोर्ट्सवर इत्यादी विषयांचे वाचन आणि लेखन करण्याची त्यांना विशेष आवड आहे.

कांचन यांचे संपूर्ण शिक्षण मराठी माध्यमातून झाले असून पत्रकारितेची आवड असल्याने त्यांनी कोकण ते मुंबई असा शैक्षणिक प्रवास केला. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण गावी पूर्ण केले. इकोनॉमिक्स या विषयातून पद्वी घेतली. लिखाणाची आवड, संवाद साधण्याचे कौशल्य आणि पत्रकारितेची आवड समजून घेऊन साठ्ये कॉलेज विलेपार्ले येथे वृत्तपत्रविद्या आणि संवाद या विषयात त्यांनी पद्व्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेतला.

महाविद्यालयीन काळात कला आणि नाटक विषयात विशेष आवड असल्याने त्यांनी अभिनयदेखील केले आहे. काही नाटक त्यांनी लिहिले आहेत. मुंबई विद्यापीठाच्या युथ फेस्टिवलमध्ये त्यांना अभिनयासाठी ब्रॉन्झ आणि सिल्व्हर मेडल देण्यात आले आहेत. कविता आणि लेख लिहिण्याची आवड असल्याने शाळा ,कॉलेज मासिक अंकात त्यांचे लेख देखील प्रसिध्द झाले आहेत.

२०२६ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन सोबत जोडल्या गेल्यानंतर त्यांची पत्रकारितेची आवड अगदी स्पष्ट झाली. बोलण्यातला स्पष्टपणा लिखाणातली पारदर्शकता अधिक नव्याने समजत गेली. तीन महिन्यांच्या इंटर्नशिप नंतर त्या आता कन्सलटंट पदावर म.टा. समुहात सहभागी झाल्या आहेत. पारदर्शकता आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहचवण्याचं काम त्या करत आहेत.… आणखी वाचा