• Mon. Aug 24th, 2026

Solapur Boyfriend Murder : विवाहित महिला अरविंदच्या घरी आली आणि दोन दिवस मुक्कामी राहिली. त्यानंतर काही दिवसांनी ती पुन्हा अरविंदकडे आली आणि लग्नाचा आग्रह करू लागली. दीड महिन्यांपूर्वी ती पुन्हा आली, ती सासरी परत गेलीच नाही.

मयत अरविंद मस्के(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील तरटगाव येथील ट्रॅक्टर चालक अरविंद बाळू मस्के (वय २७) या तरुणाची माळुंब्रा (ता. तुळजापूर) येथील ४२ वर्षीय महिलेसोबत इन्स्टाग्रामवर ओळख झाली. मात्र महिलेचा पती, मुलगा व इतरांनी अरविंदला १५ ऑगस्ट रोजी बेदम मारहाण केली. या मारहाणीत जखमी झालेल्या अरविंदचा शनिवारी (ता. २२) उपचारादरम्यान मृत्यू झाला.

या प्रकरणी मृताच्या आईने तामलवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. संशयितांच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दोघांना अटक केली असून, न्यायालयाने त्यांना २७ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी ठोठावली आहे.

इन्स्टाग्रामवर ओळख अन् प्रेम

काही महिन्यांपूर्वी अरविंदची ओळख इन्स्टाग्रामवरून एका विवाहित महिलेशी झाली होती. ती महिला तुळजापूर तालुक्यातील माळुंब्रा येथे वास्तव्यास होती. विवाहित महिलेसोबत अरविंद तीन महिन्यांपासून फोनवर बोलत होता.

Maharashtra TimesMumbai Crime : प्रेयसीचा नको तो हट्ट, तरुणाने साखरपुडा मोडला, भडकलेल्या तरुणीची मुंबई पोलिसांना खोटी टिप, सोहमच्या घरी छापा टाकताच मोठा उलगडा

दोन दिवस मुक्कामी, लग्नाचा आग्रह

एप्रिलमध्ये ती महिला अरविंदच्या घरी आली आणि दोन दिवस मुक्कामी राहिली. त्यानंतर काही दिवसांनी ती पुन्हा अरविंदकडे आली आणि लग्नासाठी आग्रह करू लागली. दीड महिन्यांपूर्वी ती पुन्हा आली आणि सासरी गेलीच नाही. महिलेचा पती तिला न्यायला आल्यावर तिने जाण्यास नकार देत जिवाचे बरे वाईट करण्याची धमकी दिली होती.

अरविंद महिलेला भेटायला महिलेच्या घरी

काही दिवसांनी महिला परत पतीच्या घरी गेली. पती, मुलगा व अन्य काही जण तरटगावला आले, पण तेव्हा महिला घरी नव्हती. १३ ऑगस्टला अरविंद घरी आला महिलेने भेटायला बोलावल्याचे त्याने आईला सांगितले. १५ ऑगस्टला अरविंद महिलेला भेटायला म्हणून घराबाहेर पडला. महिलेचा पती, मुलगा व त्यांच्या अन्य साथीदारांनी मिळून अरविंदला बेदम मारहाण केली. यात तो गंभीर जखमी झाला आणि महिलेचा पती, मुलगा त्याला घेऊन तामलवाडी पोलिस ठाण्यात गेले.

Maharashtra TimesSanket Nevshe : मूर्तीचा तोल जाताच संकेतने दोन हातांनी पेलण्याचा प्रयत्न केला, शेवटचा व्हिडिओ पाहताच नेवशे कुटुंब भावूक, भावाने सांगितलं अखेरच्या क्षणी काय घडलंपोलिसांनी त्याला उपचाराची गरज असल्याने अरविंदला उपचारासाठी सोलापुरातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. २२ ऑगस्टला उपचारादरम्यान अरविंदचा मृत्यू झाला. त्याच्या आईच्या फिर्यादीवरून तामलवाडी पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून, गुन्ह्याचा तपास पोलिस उपअधीक्षक मनोहर पाटील करीत आहेत.

अनिश बेंद्रे

लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा