Bhuleshwar Char Raja Ganesh Idol Accident : संकेतने अखेरच्या क्षणीही गणपती बाप्पाची मूर्ती वाचवण्याचा प्रयत्न केला होता. त्याने त्या भव्य मूर्तीला दोन्ही हातांनी सावरण्याचा प्रयत्न केल्याचा व्हिडिओ पाहून नेवशे कुटुंबीयही भावूक झालं.
शेवटचा व्हिडिओ समोर
शनिवारी रात्री ‘भुलेश्वरचा राजा’ गणेश मूर्ती कोसळली तेव्हा संकेत तिच्या खाली दबला गेला. घटनास्थळावरील व्हिडिओ नंतर पाहिल्यावर त्याच्या कुटुंबीयांना समजलं की, शेवटच्या क्षणी संकेतने नेमके काय केले होते. त्याने त्या भव्य मूर्तीला दोन्ही हातांनी सावरण्याचा प्रयत्न केला होता. हा व्हिडिओ पाहून नेवशे कुटुंबीयही भावूक झालं.
“ती गोष्ट समजल्यावर मला आश्चर्य वाटले. ती मूर्ती इतकी सुंदर, अन् भव्य होती की आपण तिला एक इंचही हलवू शकत नाही, हे ध्यानात येतं. संकेतने मात्र पुढे जाऊन ती दोन्ही हातांनी धरण्याचा प्रयत्न केला. आमचा संकेत असाच होता. ऊर्जेने भरलेला आणि कोणालाही आधार द्यायला पुढे सरसावणारा” असे संकेतचा भाऊ सिद्धेश नेवशे याने ‘मुंबई मिरर’ला सांगितले.
Amravati Fire : अमरावतीत NICU मध्ये आग, तीन नवजात अर्भकांचा होरपळून मृत्यू; स्वतःचा विचार न करता बाळांना वाचवलं, धाडसी नर्समुळे मोठा हाहाःकार टळला
पहिल्यांदाच गणेशमूर्तीची उंची वाढवली
संकेतसाठी या वर्षीची मूर्ती विशेष जिव्हाळ्याची होती. मंडळातर्फे परंपरेने साधारण १६ फूट उंचीच्या मूर्ती आणल्या जात असत. शिल्पकार अनिकेत देसाई यांच्याशी सुरुवातीला १८ फूट उंचीच्या मूर्तीबाबत चर्चा झाली होती, परंतु संकेतने त्यापेक्षा मोठी मूर्ती असावी असा आग्रह धरला. अखेरीस ती मूर्ती साधारण २२-२३ फूट उंचीची बनली.
सिद्धेशने आठवण सांगितली की, मूर्ती मोठी करण्याचा निर्णय घेताना काहीशी साशंकता होती. त्यांनी संकेतला सांगितले होते की, आपण जे करत आहोत, त्याची कदाचित पुनरावृत्ती कधीच होणार नाही. तरीही ती भव्य मूर्ती मंडळात आणण्याच्या प्रक्रियेत संकेतचा सक्रिय सहभाग राहिला.
शिल्पकाराचा कुठलाही दोष नाही
ज्या कलाकाराने ती मूर्ती घडवली, त्याला या दुर्दैवी घटनेसाठी दोष द्यावा, असे सिद्धेशला वाटत नाही. वाहतुकीसाठी आवश्यक ती खबरदारी घेतल्यानंतर, शिल्पकार अनिकेत देसाई आणि त्यांच्या टीमचे सदस्य मूर्तीसोबतच्या प्रवासात सहभागी झाले होते. सिद्धेशने सांगितले की, आधार देणारे खांब आणि रॉड्स कुठे लावले आहेत, याची माहिती त्यांनी दिली होती आणि प्रवासाचा बराचसा टप्पा पूर्ण होईपर्यंत ते स्वतः तिथे उपस्थित होते.
“या घटनेसाठी मला कोणालाही दोष द्यायचा नाही. याचा शिल्पकार किंवा इतर कोणत्याही व्यक्तीशी काहीही संबंध नाही” असे सिद्धेश म्हणाला. “कोणी आणि का त्यांचे नाव घेऊन त्यांना दोष द्यायला सुरुवात केली, हे मला समजत नाही. उलट त्यांनी मदतच केली होती. यात त्यांची काहीही चूक नाही.” ही दुर्घटना नेमकी कशामुळे घडली, याचा पोलीस तपास करत आहेत.
पोलीस तपास सुरु
प्राथमिक निरीक्षणांनुसार, मूर्तीला आधार देणाऱ्या एका रॉडचे वेल्डिंग तुटलेले आढळले आहे आणि रचनेच्या आत ओलावाही दिसून आला आहे; तरीही, तपास अद्याप सुरु असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
Mumbai Crime : प्रेयसीचा नको तो हट्ट, तरुणाने साखरपुडा मोडला, भडकलेल्या तरुणीची मुंबई पोलिसांना खोटी टिप, सोहमच्या घरी छापा टाकताच मोठा उलगडा
सहजस्फूर्ती पेलायला गेला
“संकेतच सर्व काही पाहत होता—देखभाल आणि आर्थिक व्यवस्था अशा दोन्ही आघाड्यांवर त्याने मोलाचा आधार दिला होता,” असे सिद्धेश म्हणाला. “आणि कदाचित, मूर्ती कोसळताना निर्माण झालेल्या त्या गोंधळाच्या परिस्थितीतही संकेत तसाच राहिला. त्याने काहीतरी अयोग्य घडताना पाहिले आणि बाप्पाची मूर्ती पेलण्यापलिकडे प्रचंड मोठी असूनही, केवळ सहजस्फूर्तीने त्याने मदतीचा प्रयत्न केला.” असे सिद्धेश म्हणाला.
