• Sun. Aug 23rd, 2026

Mumbai Bhuleshwarcha Raja Two People Death : मुंबईतल्या भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत दोघांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे मुंबईत एकच खळबळ उडाली आहे.

भुलेश्वरचा राजा अध्यक्ष संकेत नेवशे मृत्यू(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : मुंबईतल्या भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत दोघांचा मृत्यू झाला. मूर्तीचा तोल गेल्यानं त्याखाली दबून दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर 5 जण जखमी झाले असून दोघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. सदर घटना काल शनिवारी रोजी सायंकाळी घडली.

मंडळाच्या अध्यक्षाचा मृत्यू

भुलेश्वरच्या राजाची ही मिरवणूक भायखळ्याहून भुलेश्वरच्या दिशेनं निघाली होती. अखिल भुलेश्वर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा मंडप अवघ्या 50-60 मीटर अंतरावर बाप्पाची मूर्ती आली होती. याचदरम्यान 22 फूट मूर्तीचा तोल गेला. त्याखाली मंडळातील काही कार्यकर्ते दबले गेले. या घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला असून 5 जण जखमी झाले आहेत. मृत व्यक्तींची नावे संकेत नेवशे (वय 33) आणि ब्रिजेश हेमंत जोशी (वय 30) अशी आहेत. या दोघांना रुग्णालयात आणलं असता त्यांना मृत घोषित करण्यात आलं. जखमी झालेल्या पाच जणांमध्ये 5 आणि 7 वर्षे वयाच्या दोन मुलींचा समावेश होता. जखमींवर जीटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हृदयद्रावक बाब म्हणजे, या दुर्घटनेत मंडळाचे अध्यक्ष संकेत नेवसे यांचा मृत्यू झाला आहे.

Maharashtra TimesChhatrapati Sambhajinagar : लेकरासह आई-वडिलांचीही एक्झिट, पण चांदगुडेंच्या घरातून ‘तो’ एक आवाज सतत सुरु; ऐकून शेजारच्यांचा ठोका चुकला

नेमकं काय घडलं?, अपघाताचं कारण काय?

गणपतीचं मोठं उत्साहात आगमन सुरु होतं. गणपती बाप्पा भुलेश्वर परिसरात आला होता. पहिले गणपतीच्या गळ्यातील हार पडला. त्यानंतर मूर्ती हलायला लागली. ‘खड्ड्यांमुळे सगळं झालं’, अशी प्रतिक्रिया तिथल्या नागरिकांनी दिली. ‘खड्ड्यात ट्रॉलिचं चाक अडकलं, त्यानंतर झटका बसला’, अशी माहितीही नागरिकांनी दिली.

लालबागच्या उड्डाणपुलावर ‘ग्रीन कव्हर’ची खबरदारी

गणेशोत्सवाला १४ सप्टेंबरपासून सुरुवात होत असून, दर शनिवार-रविवारी मोठ्या सार्वजनिक मंडळांच्या गणेशमूर्तींच्या आगमन सोहळ्यावेळी लालबाग-परळ परिसरात मोठी गर्दी होत आहे. उत्सवाच्या दहा दिवसांत आणि विसर्जनावेळी ही गर्दी टिपेला पोहोचणार आहे. या पार्श्वभूमीवर, अपघात टाळण्यासह गर्दीला शिस्त लावण्यासाठी मुंबई महापालिका, पोलिस आणि वाहतूक पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली आहे. लालबाग उड्डाणपुलावर एका बाजूला बॅरिकेड लावून त्यावर उंच हिरवे पडदे, म्हणजेच ‘ग्रीन कव्हर’ बसवण्यात आले आहे. त्यामुळे पुलावर उभे राहून किंवा वाकून पाहणाऱ्यांना आळा बसेल. परळ वर्कशॉपसमोरील रस्तेदुभाजकांवरही अशाच पद्धतीने बॅरिकेड आणि हिरवे पडदे बसवले आहेत.

Maharashtra TimesPrashant Kishor: पार्थ पवारांच्या घरी हाय व्होल्टेज बैठक, प्रशांत किशोर यांचे राष्ट्रवादीच्या नेत्यांना खडे बोल, दिग्गज नेत्यांमध्ये नाराजीचा सूर?

धक्काबुक्कीची किंवा तोल जाऊन अपघात होण्याची शक्यता

मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गणरायाच्या आगमनाची गेल्या काही दिवसांपासून तयारी सुरू केली आहे. गणेशमूर्ती नेण्यासाठी लालबाग-परळ भागातील मोठ्या मूर्तिशाळांबाहेर शनिवार-रविवारी मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि भाविकांची मोठी गर्दी होत आहे. लालबाग-परळ वर्कशॉप, आयटीसी हॉटेल परिसर, भारतमाता, चिंचपोकळी आदी भागांतून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेशमूर्ती आगमनासाठी रवाना होतात. आगमन सोहळा पाहण्यासाठी उत्साही गणेशभक्तही मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. त्यामुळे या परिसरातील रस्ते गर्दीने फुलून जातात.

विसर्जनावेळी तर हीच गर्दी लाखांवर जाते. त्यामुळे गर्दीवेळी लालबाग उड्डाणपुलावरून आगमन-विसर्जन सोहळा पाहण्यासाठी अनेक जण थांबतात. काही जण पुलावरून वाकून पाहण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे धक्काबुक्कीची किंवा तोल जाऊन अपघात होण्याची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर पुलावर बॅरिकेड आणि हिरवे पडदे बसवण्यात आले आहेत. त्यामुळे पुलावरून उभे राहून सोहळा पाहण्यावर मर्यादा येणार असून, अपघाताचा धोका कमी होणार आहे.

Maharashtra TimesKhavdya Dongar : कुणालची आई युट्युबर, व्हिडिओतून दिली महत्त्वाची माहिती; खवड्या डोंगर प्रकरणात कौटुंबिक वादाचा नवा अँगल

अतिउत्साही गर्दीला शिस्त लागण्यास मदत

परळ वर्कशॉप ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गापर्यंतच्या रस्तेदुभाजकांवरही बॅरिकेड आणि उंच हिरवे पडदे बसवण्यात आले आहेत. त्यामुळे दुभाजकांवर कोणीही उभे राहू शकणार नाही. तसेच गर्दीवेळी धोकादायक पद्धतीने रस्ता ओलांडण्यालाही आळा बसेल. या उपाययोजनांमुळे अतिउत्साही गर्दीला शिस्त लागण्यास मदत होईल.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा