• Sun. Aug 23rd, 2026

Nashik Crime: लग्न जुळवण्यासाठी स्मशानात अघोरी पूजा; भोंदूविरुद्ध गुन्हा, महिलेची 77 हजारांची फसवणूक, प्रकरण काय?

म. टा. प्रतिनिधी, नाशिक: लग्नाचे आमिष दाखवून आणि अघोरी पूजा करून अडचणी दूर करण्याचे भासवून एका ३४ वर्षीय महिलेची भोंदूबाबाने ७७ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार जुने नाशिक येथील अमरधाम स्मशानभूमीत उघड झाला आहे.

गुजरात राज्यातील वलसाड येथील रहिवासी असलेल्या पीडितेने याबाबत फिर्याद दिली आहे. त्यानुसार तिचा नातलग जितू अण्णाराव पवार आणि भोंदू विशाल रामदास खंडागळे (रा. पंचवटी) अशी संशयितांची नावे आहेत. या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Prithviraj Chavan: ही सरकारच्या शेवटाची सुरुवात! ‘जेन झी’च्या आंदोलनाबाबत माजी मुख्यमंत्री चव्हाणांचा निशाणापीडितेची नातेवाईक जितू पवार याच्याशी ओळख होती. जितूने तिला लग्नाची विचारणा केली होती. जितू पवार हा फुलेनगर परिसरात विशाल खंडागळे याच्याकडे राहत होता. खंडागळेकडून पवार हा भोंदूगिरी शिकत होता. काही दिवसांपूर्वी जितूने पीडितेला मारहाण व दमदाटी केली. त्याबाबत महिलेने खंडागळेकडे तक्रार केली असता, ‘आपल्याला स्मशानभूमीत पूजा करावी लागेल. त्याकरिता खर्च येईल. म्हणजे जितू तुझ्याशी व्यवस्थित वागेल व लग्न करेल’, असा बनाव खंडागळेने रचल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या प्रकरणी माहिती मिळताच अंधश्रद्धा निर्मूलन समितीनेही पोलिसांत धाव घेत पीडितेला धीर देत कठोर कारवाईची मागणी केली आहे. याबाबत ‘अंनिस’चे राज्य सदस्य कृष्णा चांदगुडे पाठपुरावा करीत आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक राकेश चौधरी यांच्या सूचनेनुसार पथक पुढील तपास करीत आहे.

..असे झाले आर्थिक व्यवहार

२० फेब्रुवारी – १० हजार रुपये

६ मार्च – २० हजार रुपये

३० मार्च – ५ हजार रुपये

३ एप्रिल – १० हजार रुपये

१३ मे – १३ हजार रुपये

१४ मे – १ हजार ९०० आणि १७ हजार १०० रुपये

Maharashtra TimesNashik News : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीने भरलेला डंपर 10 ते 12 फूट खाली अडकलाअर्ध्या रात्री स्मशानभूमीत लिंबू-मंत्रोच्चार

पीडित महिला १२ जुलै रोजी वलसाड येथून नाशिकमध्ये आली. त्याच रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास अमरधाम स्मशानभूमीत, एका मंदिरासमोर तिला नेण्यात आले. तेथे मध्यरात्रीच्या सुमारास लोखंडी जाळीवर लिंबू, हळद-कुंकू व लाह्या ठेवून मंत्रोच्चार करण्यात आले. महिलेच्या अंगावरून लिंबू उतरवून नदीत सोडण्यात आले. तसेच पूजा पूर्ण झाल्याचा दावा करण्यात आला होता. दरम्यान, पूजेनंतरही पवारने महिलेशी लग्न करण्यास स्पष्ट नकार दिला. महिलेने विचारणा केली असता, ‘अजून पूजा करावी लागेल, जितूला हळद लावावी लागेल’, असे सांगून पुन्हा पैशांची मागणी केली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडित महिलेने पोलिसांत धाव घेतली.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा

Rahul Gandhi Pune: राहुल गांधींच्या कार्यक्रमाला गर्दी होऊ नये म्हणून मेट्रो थांबवली? प्रशांत जगतापांचा गंभीर आरोप, प्रशासनाने केला खुलासा
Mumbai Bhuleshwarcha Raja : पहिले गणपतीच्या गळ्यातील हार पडला, नंतर मूर्ती हलायला लागली, मुंबईत बाप्पाच्या आगमनावेळी दुर्घटना; मंडळाच्या अध्यक्षासह एकाचा मृत्यू
Tukaram Mundhe Pune: पुण्यात तुकाराम मुंढे कार्यक्रमाला येणार असल्याचा धसका; दुकाने बंद करून व्यावसायिक गायब, घटनेची सगळीकडे चर्चा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed