• Sun. Aug 23rd, 2026

Chhatrapati Sambhajinagar Chandgude Family Death Pet Dog Sheru : कालपर्यंत ज्या घरात आई, वडील आणि कुणाल यांच्यासोबत त्याचा दिवस जायचा, तिथे आता तो एकटाच आहे. परिचित आवाजाची आणि माणसांची वाट पाहत आहे.

छत्रपती संभाजीनगर चांदगुडे कुटुंब पाळीव कुत्रा शेरु(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहरात घडलेल्या एका दुर्दैवी घटनेत एकाच कुटुंबातील आई, वडील आणि मुलाचा एकाचवेळी मृत्यू झाला. कुणाल मुरलीधर चांदगुडे, वडील मुरलीधर चांदगुडे आणि आई संगीता चांदगुडे अशी त्यांची नावे आहेत. या घटनेनंतर कुटुंबातील माणसं कायमची निघून गेली, मात्र त्यांच्या घरातला लाडका शेरू नावाचा पाळीव कुत्रा आजही त्याच घरात आहे. कालपर्यंत ज्या घरात आई, वडील आणि कुणाल यांच्यासोबत त्याचा दिवस जायचा, तिथे आता तो एकटाच बसलाय.

अचानक सगळेच निघून गेल्यानं शेरू अस्वस्थ

आपल्या माणसांच्या आवाजाची, त्यांच्या सहवासाची आणि रोजच्या सवयींची त्याला सवय झाली होती. अचानक सगळेच निघून गेल्यानं शेरू अस्वस्थ झाल्याचं शेजाऱ्यांच्या लक्षात आलं आहे. तो सतत भुंकत असून, खिडकीतून त्याला पाणी आणि खाणे देऊन शेजारी त्याची काळजी घेण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, घरात अडकून पडलेल्या या मुक्या जीवाला आता बाहेर काढून त्याची जबाबदारी घेणार कोण? हा प्रश्न निर्माण झाला आहे.

Maharashtra TimesKhavdya Dongar Case: खवड्या डोंगरप्रकरणी पोलिसांकडून तपासाला वेग, चांदगुडे कुटुंबाच्या घरी पथक दाखल, कोणकोणत्या अँगलने तपास सुरू?

घरातीलच एक सदस्य होता

शेरू हा चांदगुडे कुटुंबासाठी केवळ पाळीव कुत्रा नव्हता, तर घरातीलच एक सदस्य होता. कुणाल आणि त्याची आई संगीता यांच्यासोबत शेरू सर्वाधिक वेळ असायचा. कुणाल त्याची विशेष काळजी घेत असे. दररोज सकाळी शेरूला फिरायला घेऊन जाणं, त्याच्यासोबत वेळ घालवणं हा कुणालच्या रोजच्या आयुष्याचा भाग होता. त्यामुळे दोघांमध्ये विशेष जिव्हाळा निर्माण झाला होता.

लहान मुलाप्रमाणेच त्याचंही संगोपन

संगीता यांच्याशीही शेरूची चांगलीच जवळीक होती. घरात एखादं लहान मूल आलं, तर शेरू संगीता यांच्या आसपास राहायचा. कुटुंबातील लहान मुलाप्रमाणेच त्याचं संगोपन केलं जात असल्याचं शेजाऱ्यांनी सांगितलं. त्यामुळे चांदगुडे कुटुंबातील तिघांच्या जाण्यानंतर शेरू एकटाच पडल्याचं पाहून शेजाऱ्यांनाही वाईट वाटत आहे. कुटुंबातील तिघांच्या मृत्यूची घटना समजल्यानंतर शेजाऱ्यांनी त्यांच्या घराकडे धाव घेतली. मात्र, घराला कुलूप असल्यानं शेरूला बाहेर काढता येत नाही. घरात अडकलेल्या शेरूला शांत करण्यासाठी शेजाऱ्यांनी खिडकीतून त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. त्याला बिस्कीट आणि पाणीही देण्यात आलं.

Maharashtra TimesPrashant Kishor: पार्थ पवारांच्या घरी हाय व्होल्टेज बैठक, प्रशांत किशोर यांचे राष्ट्रवादीच्या नेत्यांना खडे बोल, दिग्गज नेत्यांमध्ये नाराजीचा सूर?

परिचित आवाजाची आणि माणसांची वाट पाहत आहे

मात्र, शेरू सतत भुंकत असल्याचं शेजाऱ्यांनी सांगितलं. आपल्या माणसांची चाहूल लागत नसल्यानं तो अस्वस्थ झाला असावा, असं शेजाऱ्यांचं म्हणणं आहे. घरात कुणी नसतानाही शेरू आपल्या परिचित आवाजाची आणि माणसांची वाट पाहत असल्याचं त्याच्या वर्तनातून जाणवत असल्याचं शेजाऱ्यांनी सांगितलं. संपूर्ण कुटुंब गमावल्यानंतर शेरू सध्या घरात एकटाच आहे. त्याला बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी नेण्याची गरज आहे. मात्र, घराचं कुलूप स्वतःहून उघडल्यास पुढे अडचण निर्माण होऊ शकते. त्यामुळे पोलिसांनी पंचनामा करून घर उघडावं आणि शेरूची तातडीनं सुटका करावी, अशी मागणी शेजाऱ्यांकडून करण्यात येत आहे.

मुका जीव आता कुणाच्या तरी प्रतिक्षेत

कुटुंबातील तिन्ही व्यक्तींच्या जाण्यानंतर त्यांच्या मागे राहिलेला हा मुका जीव आता कुणाच्या तरी आधाराच्या प्रतीक्षेत आहे. शेरूची योग्य पद्धतीने काळजी घेण्यासाठी श्वानप्रेमी व्यक्ती किंवा संस्थेने पुढे यावं, अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त होत आहे.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा