Nagpur Thai Mangur Fish: सावनेर तालुक्यातील दोहडघाट परिसरात मत्स्यव्यवसाय विभागाने कारवाई करून थाई मांगूर मासे नष्ट केले.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
म.टा.प्रतिनिधी, नागपूर: सावनेर तालुक्यातील दोहडघाट परिसरात मत्स्यव्यवसाय विभागाने दोन दिवसांची विशेष मोहीम राबवून प्रतिबंधित ‘थाई मांगूर’ माशांच्या अवैध पालनावर कारवाई केली. २१ आणि २२ ऑगस्ट रोजी झालेल्या या कारवाईत शेततळ्यांमधून सुमारे ७४ टन जिवंत मांगूर मासे जप्त करून त्यांची वैज्ञानिक पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली. या बेकायदेशीर मत्स्यपालनाबाबत संशयित बाडू शेख याच्यावर पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
मत्स्यव्यवसाय सहाय्यक आयुक्त कार्यालयामार्फत गेल्या तीन महिन्यांपासून जिल्ह्यात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत आतापर्यंत १५० टनांहून अधिक मांगूर माशांचा साठा नष्ट करण्यात आला असून, नागपूर परिसरातील अवैध नेटवर्क मोडून काढण्यात आल्याची माहिती विभागाने दिली. ही कारवाई प्रादेशिक उपआयुक्त सुनील जांभुळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहाय्यक आयुक्त शुभम कोमरेवार यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
Maharashtra FDA: हे गुरेही खात नाहीत! अंगणवाडी आहाराची तपासणी करण्याची ‘एफडीए’कडे मागणीमोहिमेत मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी प्रशांत वैद्य, सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी निखिल नारद, अंकित वैद्य, जितेश केशवे, शिवानंद पाटील, सतीश क्षीरसागर आणि अविनाश सदावर्ती यांनी सहभाग घेतला.
थाई मांगूर हा मांसाहारी आणि आक्रमक प्रवृत्तीचा मासा असून, त्याचा स्थानिक माशांच्या प्रजाती आणि नैसर्गिक परिसंस्थेला मोठा धोका असतो. दूषित पाण्यात वाढणाऱ्या आणि निकृष्ट खाद्य खाणाऱ्या या माशांच्या सेवनामुळे नागरिकांच्या आरोग्यावरही गंभीर परिणाम होऊ शकतात. या कारवाईमुळे पर्यावरण संतुलनास मदत होईल, असे प्रादेशिक उपआयुक्त सुनील जांभुळे यांनी सांगितले. या कारवाईमुळे प्रामाणिक मत्स्यपालकांना योग्य बाजारपेठ आणि न्याय मिळण्याचा मार्ग मोकळा होईल. पर्यावरण व मानवी आरोग्यास घातक असलेल्या थाई मांगूरचे पालन किंवा विक्री करणाऱ्यांवर कठोर फौजदारी कारवाई सुरूच राहील, असा इशारा मत्स्यव्यवसाय विभागाने दिला आहे.
लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर
किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.
शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा