• Sat. Aug 22nd, 2026

Nashik crime: बिष्णोई टोळीचा ‘कॉल;नाशिकच्या व्यावसायिकाला खंडणीसाठी धमकी ,शुभम लोणकरविरुध्द गुन्हा नोंदविण्यात आला.

Nashik crime: नाशिकमध्ये एका व्यावसायिक कुटुंबातील भावंडांना बिष्णोई टोळीने कॉल केला जीवे मारण्याची धमकी देत केली दोन कोटी रुपयांची मागणी.

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
नाशिक : शहरातील व्यावसायिक कुटुंबातील भावंडांना कुख्यात ‘लॉरेन्स बिष्णोई’ टोळीच्या नावाने जीवे मारण्याची धमकी देत तब्बल दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

शुभम लोणकर विरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला

व्यावसायिकाच्या फिर्यादीवरून सरकारवाडा पोलिस ठाण्यात संशयित शुभम लोणकर याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. लोणकर हा राज्यातील इतर दोन गंभीर गुन्ह्यांत ‘वॉन्टेड’ असल्याचे शहर पोलिसांसह गुन्हे शाखेच्या सर्व पथकांनी कसून तपास सुरू केला आहे.

अशी धमकी देण्यात आली

व्यावसायिक कुटुंबातील सदस्यांना सलग दोन दिवस व्हॉट्सअॅप कॉल आणि मेसेजद्वारे ‘तुमच्यावर आणि घराभेवती शूटर्सची नजर आहे. नाशिकमधील हा पहिला कॉल असून ,पैसे न दिल्यास पहिली हत्या नाशिकमध्ये आणि तुमच्या घरात होईल ‘अशी धमकी देण्यात आली.ही धमकी शुभम लोणकर अर्थात, ‘शुभ्बू’च्या नावाने आलेल्या फिर्यादीत नमूद आहे .

लोणकर हा बिष्णोई टोळीतील संशयित

संशयित लोणकर हा बिष्णोई टोळीतील संशयित असून , माजी मंत्री बाबा सिद्दकी हत्या प्रकरण आणि दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या घराबाहेरील गोळीबार प्रकरणात तो अद्यापही ‘वॉन्टेड’ आहे. लोणकरवर जानेवारी २०२४ मध्ये अकोल्यातील अकोट पोलिस ठाण्यात शस्त्रपुरवठा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. त्या गुन्ह्यात जामीन झाल्यानंतर सिद्दकी यांच्या हत्येनंतर तो पुन्हा पसार झाला.

वरिष्ठ पातळीवरून दाखल

तपास यंत्रणांच्या मते लोणकर भारताबाहेर पळून गेला असून, तिथूनच टोळीत सक्रिय आहे. त्यामुळे नाशिकमधील गुन्ह्याची दखल राज्य पोलिस महासंचालक कार्यालयानेही घेतली आहे.स्थानिक पोलिस, सायबर पोलिसांसह गुन्हे शाखा तांत्रिक विश्लेषण करीत आहेत. विश्लेषणानंतर हे ‘कॉल फेक’आहेत की खरोखरच टोळीने धमकावले आहे ,हे स्पष्ट होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Maharashtra TimesChhatrapati Sambhajinagar: पाण्याची नासाडी करणाऱ्या पैठण गेट परिसरातील नागरिकाकडून दहा हजारांचा दंड वसूल;पाण्याचा अपव्यय करणार्‍यांसाठी महापालिकेचे कठोर पाऊल

कठोर कारवाईचा विश्वास

फिर्यादी कुटूंबाच्या सुरक्षेबाबत पोलिस दक्षता घेत असून, खंडणीखोर आणि गुन्हेगारी टोळ्यांविरुद्ध कठोर कारवाईचा विश्वास आयुक्तालयाने व्यक्त केला आहे. दोन दिवसांपूर्वी टोळीच्या नावाने नागपुरातील निवृत्त प्राध्यापकासह त्यांच्या मुलीला दहा धमकीचा ई-मेल प्राप्त झाला होता. आता नाशिकमध्ये धमकीचे कॉल आल्याने यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.

अडीच वर्षापूर्वी अपहरण !

सन २०२३ मध्ये नाशिकमधील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाचे घराबाहेरून पिस्तुलाचा धाक दाखवून अपहरण झाले होते. तेव्हाही ‘लॉरेन्स बिष्णोई’ टोळीच्या नावाने दोन कोटी रुपयांची खंडणी उकळली गेली होती.वाडीवऱ्हेतील ढाब्यावर दारूच्या नशेत शिजलेल्या कटातून अल्पावधीत श्रीमंत होण्यासाठी संशयितांनी टोळीच्या नावाचा वापर करून हा गुन्हा केला होता.

Maharashtra TimesGaneshotsav 2026: नाशिकच्या गणेशमूर्तींना सातासमुद्रापार पसंती; बावीसवर देशांत विराजमान होणार नाशिकमधील बाप्पा

एक कोटी ३३ लाख रुपयांची रोकड आणि पिस्तूल जप्त

नाशिक गुन्हे शाखा युनिट एकने राजस्थानमधील भारत – पाकिस्तान सीमेवरील लोहावत येथे वेशांतर करून मुख्य सूत्रधार संशयित महेंद्र बिश्नोई, पिंटू राजपूत, रामचंद्र बिश्नोई आणि नाशिकचा अनिल खराटे या चौघांना अटक केली होती.त्यांच्याकडून एक कोटी ३३ लाख रुपयांची रोकड आणि पिस्तूल जप्त करण्यात आले होते.

कांचन परुळेकर

लेखकाबद्दलकांचन परुळेकरकांचन परुळेकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कन्सलटंट पदावर कार्यरत आहेत. कांचन स्थानिक बातम्या, पायाभूत सुविधा, बांधकाम आणि विकास प्रकल्प यासाठी लिखाण करतात. त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात ही महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमधून झाली. मार्च २०२६ मध्ये महाराष्ट्र टाइम्सच्या व्हिडिओ विभागात त्यांनी इंटर्न म्हणून काम केले. सुरुवातीला त्यांनी युट्यूब, फेसबुक आणि इन्स्टाग्रामसाठी कन्टेंट तयार करताना व्हिडिओ आणि लेख लिहिले आहेत. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, स्थानिक बातम्या आणि क्राइमसह स्पोर्ट्सवर इत्यादी विषयांचे वाचन आणि लेखन करण्याची त्यांना विशेष आवड आहे.

कांचन यांचे संपूर्ण शिक्षण मराठी माध्यमातून झाले असून पत्रकारितेची आवड असल्याने त्यांनी कोकण ते मुंबई असा शैक्षणिक प्रवास केला. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण गावी पूर्ण केले. इकोनॉमिक्स या विषयातून पद्वी घेतली. लिखाणाची आवड, संवाद साधण्याचे कौशल्य आणि पत्रकारितेची आवड समजून घेऊन साठ्ये कॉलेज विलेपार्ले येथे वृत्तपत्रविद्या आणि संवाद या विषयात त्यांनी पद्व्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेतला.

महाविद्यालयीन काळात कला आणि नाटक विषयात विशेष आवड असल्याने त्यांनी अभिनयदेखील केले आहे. काही नाटक त्यांनी लिहिले आहेत. मुंबई विद्यापीठाच्या युथ फेस्टिवलमध्ये त्यांना अभिनयासाठी ब्रॉन्झ आणि सिल्व्हर मेडल देण्यात आले आहेत. कविता आणि लेख लिहिण्याची आवड असल्याने शाळा ,कॉलेज मासिक अंकात त्यांचे लेख देखील प्रसिध्द झाले आहेत.

२०२६ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन सोबत जोडल्या गेल्यानंतर त्यांची पत्रकारितेची आवड अगदी स्पष्ट झाली. बोलण्यातला स्पष्टपणा लिखाणातली पारदर्शकता अधिक नव्याने समजत गेली. तीन महिन्यांच्या इंटर्नशिप नंतर त्या आता कन्सलटंट पदावर म.टा. समुहात सहभागी झाल्या आहेत. पारदर्शकता आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहचवण्याचं काम त्या करत आहेत.… आणखी वाचा