• Sat. Aug 22nd, 2026

Palghar News: सकाळी शाळेत पोहोचण्यासाठी व्यवस्था असली, तरी परतीच्या प्रवासाची सोय नसल्याने शिक्षणाचा हा मार्ग त्यांच्या सुरक्षेच्या प्रश्नाशी जोडला गेला आहे.

म. टा. वृत्तसेवा, जव्हार: स्वातंत्र्याला ७९ वर्षे पूर्ण झाली, तरी पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील अतिदुर्गम ऐना-खिडसा गावातील १२ आदिवासी विद्यार्थिनींसाठी शिक्षणाचा मार्ग अजूनही खडतर आहे. साकुर येथील आदिवासी कन्या आश्रमशाळेत शिकणाऱ्या या मुलींना वसतिगृहात जागा न मिळाल्याने दररोज ये-जा करून शिक्षण घ्यावे लागत आहे. शाळा सुटल्यानंतर बसअभावी वांगणपाडा फाट्यापासून घनदाट जंगलातून सुमारे पाच किमी पायी चालत त्यांना घरी जावे लागते. अंधारात सुरू होणारा हा प्रवास रात्री आठच्या सुमारास संपतो.

या विद्यार्थिनींना सकाळी ऐना-खिडसा परिसरातून साकुरच्या आश्रमशाळेत जाण्यासाठी एसटी बसची सोय होते. मात्र, सायंकाळी पाच वाजता शाळा सुटल्यानंतर गावाकडे जाणारी बस उपलब्ध नसल्याने त्यांना वांगणपाडा फाट्यावर उतरावे लागते. तेथून पुढे सुमारे पाच किमीचा प्रवास त्यांना पायी करावा लागतो. वांगणपाडा फाटा ते ऐना-खिडसा हा मार्ग घनदाट जंगलातून जातो. परिसरात वन्यप्राणी आणि सर्पांचा वावर असल्याचे ग्रामस्थ सांगतात. सायंकाळनंतर रस्ता अंधारात बुडत असल्याने विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. रोज अंधारातून मुली घरी परतत असल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

Maharashtra TimesVishakha Raut : महापौर आणि आमदार राहिलेल्या विशाखा राऊत यांचं नगरसेवक पद रद्द, मुंबईत ठाकरेंना मोठा धक्कानियमांमुळे अन्याय ?
आश्रमशाळांमध्ये एका वर्गात ५० विद्याथ्यांच्या प्रवेशाची मर्यादा असल्याने त्यानंतरच्या विद्याथ्यांना ‘डिस्कॉलर’ म्हणून प्रवेश दिला जातो. मात्र, अतिदुर्गम भागातील वाहतूक आणि रस्त्यांची स्थिती लक्षात न घेता हा नियम लागू केल्यास त्याचा फटका स्थानिक विद्यार्थ्यांना बसत असल्याचे पालकांचे म्हणणे आहे. ये-जा करून शिक्षण घेणे शक्य नसल्याने काही विद्यार्थी शिक्षण अर्धवट सोडण्याची भीतीही ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

पालकांचा संताप
‘शिक्षण हा मूलभूत अधिकार असताना तो मिळवण्यासाठी आमच्या मुलींना रोज जीव धोक्यात घालून जंगलातून चालावे लागते. मुलींच्या सुरक्षिततेची जबाबदारी कोण घेणार?’ असा संतप्त सवाल पालक आणि ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.

Maharashtra TimesRickshaw-Taxi Fare Hike: मुंबईकरांच्या खिशाला कात्री! 1 सप्टेंबरपासून रिक्षा-टॅक्सी प्रवास महागणार, किमान भाडे किती वाढले?वसतिगृहात जागा नाही
साकुर येथील आदिवासी कन्या आश्रमशाळेत प्रवेश मिळूनही यंदा जागेअभावी या १२ विद्यार्थिनींना निवासी प्रवेश मिळू शकला नाही. त्यामुळे त्यांना ‘डिस्कॉलर’ म्हणजेच, ये-जा करून शिक्षण घ्यावे लागत आहे.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा