Pune MH 61 Series : ‘एमएच-१२’ची मालिका कायम ठेवण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी प्रयत्न केले होते. मात्र, नव्या क्रमांक रचनेत तांत्रिक अडचणी येत असल्याने त्यावर अंतिम निर्णय होऊ शकला नाही.
पुणे आरटीओ वाहन पासिंग नंबर(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
म. टा. प्रतिनिधी, पुणे : पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (आरटीओ) वाहनांना देण्यात येणाऱ्या ‘एमएच-१२’ नोंदणी क्रमांकांची दोन अक्षरी मालिका संपत आल्याने पुण्यासाठी ‘एमएच-६१’ ही नवीन नोंदणी मालिका देण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. सध्याची ‘एमएच-१२’ मालिका अवघ्या दोन दिवसांत संपण्याची शक्यता आहे. त्यामुळे नवीन वाहनांची नोंदणी खोळंबू नये यासाठी ‘एमएच-६१’ ही मालिका उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आली आहे.
‘एमएच-१२-झेडझेड’ मालिका सुरू
‘एमएच-१२’ची मालिका कायम ठेवण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी प्रयत्न केले होते. मात्र, नव्या क्रमांक रचनेत तांत्रिक अडचणी येत असल्याने त्यावर अंतिम निर्णय होऊ शकला नाही. त्यामुळे पुण्यासाठी स्वतंत्र ‘एमएच-६१’ मालिका देण्यात येणार आहे. पुणे आरटीओकडून सध्या दुचाकींसाठी ‘एमएच-१२-झेडझेड’ मालिका सुरू आहे. दोन अक्षरी मालिकेतील उपलब्ध पर्याय संपले असून, या क्रमांकाची नोंदणी काही दिवसांमध्ये संपण्याची शक्यता आहे.
Prithviraj Chavan: ही सरकारच्या शेवटाची सुरुवात! ‘जेन झी’च्या आंदोलनाबाबत माजी मुख्यमंत्री चव्हाणांचा निशाणा
दोन अक्षरांऐवजी तीन इंग्रजी अक्षरांची मालिका
पुण्याची वाहन नोंदणी मालिका संपत आल्यामुळेपुणे आरटीओने वेगवेगळे पर्याय असलेले प्रस्ताव दिले होते. त्यामध्ये दोन अक्षरांऐवजी तीन इंग्रजी अक्षरांची मालिका सुरू करण्याचा प्रस्ताव दिला होता. ‘एमएच-१२-एएए-१२३४’ अशा स्वरूपाचा क्रमांक देण्याचा विचार होता. मात्र, क्रमांकाची लांबी वाढल्यास सीसीटीव्ही आणि स्वयंचलित नंबरप्लेट ओळख प्रणालींना तो स्पष्टपणे टिपण्यात अडचणी येण्याची शक्यता होती. त्यामुळे हा प्रस्ताव मागे पडला.
सध्या काही तांत्रिक अडचणी
त्यानंतर ‘एमएच १२ १ ए’ प्रस्ताव दिला होता. हा क्रमांक मिळेल, असे सर्वांना वाटत होते; पण त्यामध्ये सध्या काही तांत्रिक अडचणी येत असल्याचे समजते. त्या सोडविण्यासाठी वेळ नसल्यामुळे तातडीने पुण्याला ‘एमएच ६१’ ही नवीन मालिका देण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे गाड्यांची नोंदणी थांबवणार नाही. पुणे आरटीओकडे जुलै २०२६पर्यंत ४४ लाख ७१ हजारांहून अधिक वाहनांची नोंद आहे. वाहनसंख्या सातत्याने वाढत असल्याने नोंदणी क्रमांकांची मालिका वेगाने संपत आहे. त्यामुळे ‘एमएच-६१’ मालिका उपलब्ध झाल्याने नवीन वाहनांच्या नोंदणीतील संभाव्य अडथळा दूर होणार आहे.
Rahul Gandhi Pune: राहुल गांधींचा आज पुण्यात ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रम; पोलिसांकडून कडेकोट सुरक्षा व्यवस्था
‘एमएच १२ वन ए’च्या पर्यायावर विचार करु
पुणे आरटीओकडून ‘एम एच १२ वन ए’ या वाहन मालिकेचा पर्याय असलेला प्रस्ताव मंत्रालयाकडे देण्यात आलेला आहे. वाहन क्रमांकाची ही मालिका देण्यासाठी काही तांत्रिक बदल करावे लागणार आहेत. त्यासाठी पर्यायदेखील खुला ठेवला आहे; पण अगोदर पुण्यासाठी ‘एमएच ६१’ दिल्यानंतरही ‘एमएच १२ वन ए’ ही मालिका काही महिन्यांनी मिळू शकते. वाहनचालकांना कोणत्या क्रमांकाची वाहन नोंदणी मालिका घ्यायची हा पर्याय त्यांना निवडावा लागेल; तसेच काही तांत्रिक अडचणी आल्यास तो मिळणारदेखील नाही.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा