• Wed. Aug 19th, 2026

Pune Junnar Pimpalwandi Girl Assault and Killed : पुण्यातील जुन्नर तालुक्यात एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन चिमुकलीवर अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आली आहे.

पिंपळवंडी अल्पवयीन मुलगी अत्याचार आणि हत्या(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
अभिजित दराडे, पुणे : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात नसरापूर अत्याचार घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. चौथीत शिकणाऱ्या एका चिमुरडीवर तिच्याच शेजारी राहणाऱ्या नराधमानं अत्याचार करून तिची हत्या केल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. आरोपी हा 25 वर्षीय असून तो जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडीचा रहिवासी आहे.

सायकलवर बसवून उसाच्या शेताकडे

चौथीत शिकणारी चिमुकली ही आजारीअसल्यानं काल मंगळवारी शाळेत गेली नव्हती. ती घरीच थांबलेली होती. दुपारच्या सुमारास चिमुरडीचे पालक बाहेर गेले होते ती एकटीच घरात होती. ती घरात टीव्ही पाहत खेळत होती. हाच डाव साधत अत्याचारी नराधमानं तिला बाहेर बोलावलं आणि सायकलवरून गावाबाहेरच्या उसाच्या शेताकडे घेऊन गेला. तिथेच त्याने चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून तिचा गळा दाबून खून केला.

Maharashtra TimesCrime News: आश्रमशाळेत शिपायाने केला विद्यार्थ्यांवर अत्याचार, जबाबात धक्कादायक माहिती उघड, ४४ वर्षीय राजेशला अटक

ओढ्याकाठी झाडाजवळ निष्पाप चिमुरडीचा मृतदेह

पालक परत आल्यानंतर आपली मुलगी घरात दिसत नसल्यानं तिचे पालक अस्वस्थ झाले होते. त्यांनी सगळीकडे तिची शोधाशोध सुरु केली. मात्र, मुलगी सापडत नसल्यानं अखेर पालकांनी आळेफाटा पोलीसांत मिसिंगची तक्रार नोंदवली. पोलिसांनी तत्परता दाखवत लगेच गावात धाव घेतली. सगळीकडे शोधाशोध सुरु झाली. या सगळ्यादरम्यान सर्वात धक्कादायक बाब म्हणजे अत्याचारी नराधम देखील तिथे पोहचला आणि पोलिसांना शोधकार्यात मदत करण्याचं नाटक करू लागला. तो देखील चिमुरडीला शोधत आहे असं भासवत होता. मात्र, पोलिसांना आरोपीच्या हालचालीवर संशय आला. त्याच्या संशयास्पद हालचाली लक्षात आल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. पुढे पोलिसीखाक्या दाखवताच आरोपीने गुन्हाची कबुली दिली. आरोपीने दाखवलेल्या’लेंडे स्थळ’ परिसरातील एका ओढ्याकाठी झाडाजवळ निष्पाप चिमुरडीचा मृतदेह आढळून आला.

फॉरन्सिक टीमने घटनास्थळाचा पंचनामा केला

त्यानंतर लगेचच पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरु केला आहे. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप गिल, उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील आणि पोलीस निरीक्षक विश्वास जाधव यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन पाहणी केली. फॉरन्सिक टीमने घटनास्थळाचा पंचनामा केला असून चिमुरडीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

Maharashtra TimesNagpur Crime : गळ्यात मंगळसूत्र, बेडवर गुलाबाच्या पाकळ्या अन् फुगे, नागपूरच्या हॉटेलमध्ये रात्री किंचाळण्याचा आवाज, रुम नंबर 302 मध्ये काय घडलं?

दोषींवर कठोर कारवाई करून, खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवणार – सुनेत्रा पवार

या घटनेसंदर्भात पुण्याच्या पालकमंत्री आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री यांनी पुणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधून तपासाचा आढावा घेतला आहे. या प्रकरणाची पारदर्शक व सखोल चौकशी करून नराधम आरोपीवर कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश पोलीस प्रशासनाला देण्यात आले आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिली आहे.

खटला फास्टट्रॅक कोर्टात

हे कृत्य अत्यंत निंदनीय आणि माणुसकीला काळीमा फासणारे आहे असून पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत संशयित तरुणाला ताब्यात घेतलं आहे, आणि पुढील तपास वेगाने सुरू आहे. या प्रकरणातील आरोपीला लवकरात लवकर कठोर शिक्षा व्हावी, यासाठी हा खटला जलदगती न्यायालयात चालवला जावा, अशी विशेष विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचंही सुनेत्रा पवार यांनी स्पष्ट केलं आहे.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा