• Tue. Aug 18th, 2026

नाशिकच्या खड्ड्यांवरून संजय राऊत आक्रमक; भाजप आमदारांच्या घरासमोर आंदोलन करणार

Authored by: मानसी देवकर|Maharashtra Times

नाशिकच्या खड्ड्यांवरून उद्धव ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली आहे. ठाकरेसेनेकडून खड्ड्यांविरोधात महापालिकेवर मोर्चा काढण्यात येतोय. नाशिक दौऱ्यावर आलेल्या खासदार संजय राऊत यांनी प्रशासन आणि भाजपवर धारदार शब्दांत टीका केली आहे. नाशिकच्या आयुक्त यांची तातडीने बदली करा, अशी मागणी राऊतांनी केली. ज्या भागात खड्डे आहेत, तिथं असलेले आमदार आणि नगरसेवक आहेत तिथं आंदोलन केले जाईल, असा इशारा राऊत यांनी दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed