Mumbai Crime : मुंबईत नौदल जवानासह कुटुंबीय मृतावस्थेत, पत्नी-दोन मुलांचा जीव घेऊन स्वत:ला संपवलं, वडिलांना शेवटचा भावूक मेसेज
कुलाबा येथील नेव्ही नगर परिसरात नौदलातील एका जवानासह त्याची पत्नी आणि दोन मुलांचे मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. पुरणलाल मेहरा (वय ३०) हे शनिवारी मध्यरात्री राहत्या घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले. त्यांची पत्नी ओमा, तीन वर्षांचा मुलगा यश आणि दोन महिन्यांचे बाळही मृतावस्थेत आढळले. घटनास्थळी कोणतीही चिठ्ठी आढळलेली नाही. त्यामुळे पुरणलाल यांनी हे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र,’आमचे मृतदेह घेऊ जा’, संदेश त्यांनी वडिलांना पाठवल्याची माहिती समोर आली आहे. या संदेशाचीही पोलिस तपासात सर्वतोपरी सहकार्य केले जात आहे, असे नौदलाने म्हटले आहे.