Mulund BEST Bus Accident 2018 : हेमंत जोशी यांचा १५ मे २०१८ रोजी मुलुंडमध्ये अपघाती मृत्यू झाला होता. काळजीपूर्वक कारच्या दिशेने परत येत असताना भरधाव ‘बेस्ट’ बसने दिलेल्या धडकेत ते गंभीर जखमी झाले होते.
आठ वर्षांपूर्वी बेस्टच्या धडकेत मृत्यू
‘हेमंत जोशी ॲण्ड असोसिएट्स’चे मालक असलेले हेमंत जोशी यांचा १५ मे २०१८ रोजी दुपारी अपघाती मृत्यू झाला होता. त्यानंतर त्यांच्या आई शकुंतला, पत्नी भाग्यश्री, मुलगा यशोधन व मुलगी ईशा यांनी ‘मॅक्ट’समोर दावा दाखल केला.
दोन महिन्यात रक्कम देण्याचे आदेश
प्रकरण प्रलंबित असताना शकुंतला यांचे निधन झाले. त्यामुळे न्यायाधिकरणाने व्याजासह भरपाईच्या रकमेपैकी ६० टक्के रक्कम भाग्यश्री यांना आणि मुलगा व मुलीला प्रत्येकी २० टक्के रक्कम दोन महिन्यांत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा आदेश महापालिकेला दिला.
Antara Banerjee : ट्रेनमध्ये TC-RPF कर्मचाऱ्यावर हल्ला, ठाण्यात 31 वर्षीय मॉडेलवर गुन्हा, रिझर्व्ह सीटवरुन उठण्यास नकार देत धिंगाणा
काळजीपूर्वक रस्ता ओलांडत होते, अर्जदारांचा दावा
‘हेमंत जोशी हे लोअर परळ येथील उर्मी इस्टेटमधील व्हीएफएस ग्लोबल येथे चालक सुभाष गाडेकर व सहायक सचिन चव्हाण यांच्यासोबत गेले होते. काम आटोपल्यानंतर तिघेही जोशी यांच्या कारने ठाण्याच्या दिशेने निघाले. दुपारी २.३० वाजताच्या सुमारास कार मुलुंड येथील पूर्व द्रुतगती मार्गाच्या सर्व्हिस रोडवर आली असताना जोशी यांनी लघुशंकेसाठी कार थांबवली. त्यानंतर ते काळजीपूर्वक कारच्या दिशेने परतत असताना भरधाव बसने त्यांना धडक दिली. त्यात ते गंभीर जखमी झाले. गाडेकर व चव्हाण यांनी त्यांना तातडीने फोर्टिस रुग्णालयात नेले. मात्र, उपचारांदरम्यान दोन दिवसांनी म्हणजेच १७ मे २०१८ रोजी त्यांचा मृत्यू झाला’, असे म्हणणे अर्जदारांतर्फे मांडण्यात आले. त्यांच्या वकिलांनी या म्हणण्याच्या समर्थनार्थ जोशी यांचे सहायक चव्हाण यांच्या साक्षीचा व अन्य पुराव्यांचा आधार घेतला.
फोनवर बोलत निष्काळजी, ‘बेस्ट’तर्फे महापालिकेचा युक्तिवाद
जोशी यांच्या निष्काळजीमुळेच त्यांचा अपघात झाल्याचा दावा महापालिकेने केला. ‘ती बस मुलुंड बस आगारातून प्रबोधनकार ठाकरे उद्यानाच्या दिशेने जात होती. बस चालकाने भांडुप पीव्हीएम बस थांब्यावर बस थांबवल्यानंतर पुढे नेली असता, जोशी अचानक बससमोर आले. ते रस्ता ओलांडताना मोबाइलवर बोलत होते. त्यामुळे त्यांचे बसकडे आणि बसचा लकाने वाजवलेल्या हॉर्नकडेही लक्ष गेले नाही. त्यामुळे चालकाची चूक नव्हती’, अशा स्वरूपाचा युक्तिवाद ‘बेस्ट’च्या वतीने महापालिकेने मांडला.
Tukaram Mundhe : अजय, शाहरुख, टायगरला तुकाराम मुंढेंचा दणका, ‘विमल इलायची’च्या जाहिरातीबाबत कारणे दाखवा नोटीस
पोलीस तपासात चालकाचा बेदरकारपणा उघड
मात्र, ‘पोलिसांनी केलेला तपास, आरोपपत्र, तसेच घटनेचे प्रत्यक्षदर्शी असलेले चव्हाण यांची साक्ष यावरून चालकाने बेदरकार व निष्काळजीने बस चालवल्याचे सिद्ध होते’, असा निष्कर्ष नोंदवत न्यायाधिकरणाने महापालिकेचा युक्तिवाद फेटाळला.
साकीनाक्यात चिमुकल्यास कारने चिरडले
दुसरीकडे, साकीनाका येथील दोस्ती प्लाझा इमारतीच्या प्रवेशद्वारावर कारने दीड वर्षाच्या मुलास चिरडल्याची घटना घडली. शनिवारी सायंकाळी सहाच्या सुमारास दीड वर्षाचा मुलगा आपल्या पाच वर्षांच्या भावासोबत खेळत असताना हा अपघात घडला. या प्रकरणी साकीनाका पोलिस ठाण्यात कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Tukaram Mundhe : हे मुंढे कोण आहेत? रिझर्व्हेशन लिस्टमध्ये नाव पाहताच रेस्टॉरंट चालक चपापले, मित्राचा फोन, तुकाराम मुंढेंच्या मुलाचा भन्नाट किस्सादोस्ती प्लाझा इमारतीत अस्लम पटेल हे कुटुंबासह वास्तव्यास आहेत. शनिवारी सायंकाळी त्यांचा पाच वर्षांचा मुलगा अब्दुल हादी आणि दीड वर्षांचा मुलगा अब्दुल समद हे दोघे इमारतीखाली खेळत होते. प्रवेशद्वारावर असताना एक कार अचानक आतमध्ये शिरली. त्यावेळी अब्दुल समद कारखाली चिरडला गेला. अपघात झाल्याचे समजताच कुटुंबीय खाली आले. कार चालकाच्या मदतीने आधी खासगी आणि नंतर सेव्हन हिल्स रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारादरम्यान अब्दुल समद याचा मृत्यू झाला. निष्काळजीने मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी साकीनाका पोलिसांनी चालकाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
