• Mon. Aug 17th, 2026

CAG report on Water Mumbai Railway Stations : रेल्वे बोर्डाने स्थानकांवर प्रवासी सुविधा पुरवण्याबाबत विविध मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती. प्रवासी सुविधा आणि स्वच्छता सुनिश्चित करण्याच्या भारतीय रेल्वेच्या प्रयत्नांतून अपेक्षित लाभ मिळाले आहेत की नाही, याचे मूल्यांकन करण्यासाठी हे लेखापरीक्षण करण्यात आले, असे कॅगकडून सांगण्यात आले.

कॅग अहवाल ऑन मुंबई रेल्वे स्टेशन पाणी(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
वृत्तसंस्था, नवी दिल्ली : खाद्यपदार्थांमधील भेसळ, निकृष्ट दर्जा समोर येत असताना रेल्वे स्थानकांवरील पाण्याच्या शुद्धतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अनेक रेल्वे स्थानकांवरील ‘वॉटर कूलर’मधून घेतलेल्या पिण्याच्या पाण्याच्या नमुन्यांमध्ये ‘ई-कोलाय’ जीवाणू आढळले. यामध्ये मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, भिवंडी रोड, कल्याण आणि लोणावळा या स्थानकांचा समावेश आहे. भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षक (कॅग) यांच्या अहवालातून यासह अनेक गंभीर बाबी समोर आल्या.

कूलरमधील पाण्याच्या नमुन्यांत ई-कोलाय

दक्षिण रेल्वेच्या कोइम्बतूर आणि पलक्कड जंक्शन, दक्षिण मध्य रेल्वेच्या हैदराबाद, पूर्व रेल्वेच्या माधवपूर या स्थानकांवरील कूलरमधील पाण्याच्या नमुन्यांत ई-कोलाय आढळला. सर्व क्षेत्रांमधील ५१२ बिगर उपनगरीय श्रेणीतील स्थानकांवरील प्रवासी सुविधांचा आढावा घेण्यात आला. यावेळी रेल्वेच्या प्रसाधनगृहांमध्येही अस्वच्छता आढळून आली. अहवालात २०१९-२० ते २०२३-२०२४ या कालावधीतील प्रकरणांचा, तसेच यापूर्वी नोंद न झालेल्या जुन्या प्रकरणांचा आणि आवश्यक तिथे २०२३-२०२४नंतरच्या प्रकरणांचाही समावेश करण्यात आला आहे. अहवालानुसार, बिगर उपनगरीय गटात ५,९०८ रेल्वे स्थानकांचा समावेश होतो. भारतीय रेल्वेने या श्रेणीत २०२३-२४मध्ये दररोज ७,४२४हून अधिक प्रवासी रेल्वेगाड्या चालवल्या आणि २९२.४ कोटी प्रवाशांची वाहतूक केली, असे अहवालात नमूद केले आहे.

Maharashtra Timesयंदाचा जुलै सर्वाधिक उष्ण, चढ्या तापमानासह अतिवृष्टी, पूर, वणव्यांचा तडाखा; कारण काय?

अहवालात काय म्हटलं आहे?

रेल्वे बोर्डाने स्थानकांवर प्रवासी सुविधा पुरवण्याबाबत विविध मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती. प्रवासी सुविधा आणि स्वच्छता सुनिश्चित करण्याच्या भारतीय रेल्वेच्या प्रयत्नांतून अपेक्षित लाभ मिळाले आहेत की नाही, याचे मूल्यांकन करण्यासाठी हे लेखापरीक्षण करण्यात आले, असे कॅगकडून सांगण्यात आले. निवडलेल्या ५१२ स्थानकांपैकी ४५८ स्थानकांवर किमान आवश्यक सुविधा पुरवण्यात त्रुटी होत्या. अशा स्थानकांचे प्रमाण ८९ टक्क्यांहून अधिक आहे. ‘एप्रिल २०१८ मध्ये, रेल्वे बोर्डाने एनएसजी-१ ते एनएसजी-६ या श्रेणींमधील स्थानकांसाठी ‘किमान आवश्यक सुविधा’, ‘शिफारस केलेल्या सुविधा’ आणि ‘अपेक्षित सुविधा’ निश्चित करणाऱ्या सर्वसमावेशक सूचना जारी केल्या होत्या. रेल्वे बोर्डाने ३१ ऑगस्ट २०१८पर्यंत सर्व स्थानकांवर किमान आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे अनिवार्य केले होते,’ असे अहवालात अधोरेखित करण्यात आले.

सुविधांची कमतरता आढळली

रेल्वे बोर्डाच्या एप्रिल २०१८च्या सूचनांनुसार, स्थानकाच्या श्रेणीचा विचार न करता सर्व स्थानकांवर सर्वप्रथम किमान आवश्यक सुविधा पुरवणे बंधनकारक करण्यात आले होते. यामध्ये पिण्याचे पाणी, प्रतीक्षा कक्ष, आसनव्यवस्था, फलाटांवरील छत, शौचालये, प्रसाधनगृहे, उंच फलाट, पंखे, पादचारी पूल, कचराकुंड्या, घड्याळे आणि सार्वजनिक उद्घोषणा प्रणाली यांचा समावेश आहे. एनएसजी-१ श्रेणीत येणाऱ्या सीएसएमटी, हावडा, सियालदह, नवी दिल्ली आणि मुंबई सेंट्रल यांसारख्या प्रमुख स्थानकांवरही बसण्याची व्यवस्था, स्वच्छता सुविधा, कचराकुंड्या आणि ‘इलेक्ट्रॉनिक ट्रेन इंडिकेटर बोर्ड’ यांसारख्या सुविधांची कमतरता असल्याचे आढळून आले.

Maharashtra TimesSujay Vikhe Patil : डोनाल्ड वेडा माणूस, ट्रम्पमुळे महामार्गाचे काम रखडले, लोकं दारू जास्त प्यायला लागले, सुजय विखेंचा अजब दावा

अहवालातील ठळक मुद्दे

सन २०२२-२३मध्ये आठ क्षेत्रांमधील ४९ स्थानकांवरील आणि २०२३-२४मध्ये नऊ क्षेत्रांमधील ५६ स्थानकांच्या फलाटांवरील पिण्याच्या पाण्याचे नमुने गोळा केले.

त्यामध्ये ई-कोलायसह आरोग्यास घातक जिवाणू आढळले.

२०२२-२३मध्ये चार क्षेत्रांमधील आठ स्थानकांवर आणि २०२३-२४मध्ये पाच क्षेत्रांमधील ११ स्थानकांवरील इतर जिवाणूविषयक चाचण्यांचे निष्कर्षही असमाधानकारक

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा