• Wed. Aug 12th, 2026

    स्वावलंबनासाठी अनाथ बालकांना अठरा वर्षांनंतर आर्थिक मदत – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Aug 12, 2026

    • २१ वर्षे पूर्ण झालेल्या चार बालकांना शासनाच्या मुदत ठेवीचा लाभ

    मुंबई, दि. १२ : मुंबई शहर जिल्ह्यातील विविध बालगृहांमधील दोन्ही पालक किंवा एका पालकाला गमावलेल्या २५ बालकांना रिक्ता फाउंडेशनच्या वतीने प्रत्येकी २० हजार रुपयांची आर्थिक मदत एफडीच्या माध्यमातून देण्यात आली. या बालकांच्या नावाने पोस्टामध्ये उघडण्यात आलेल्या नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटचे पासबुकही यावेळी वितरित करण्यात आले. महिला व बालविकास विभागाच्या विविध कल्याणकारी योजना व उपक्रमांच्या माध्यमातून महिला आणि बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून मुंबई शहर जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांच्या संकल्पनेतून व निर्देशानुसार संस्थांमध्ये राहणाऱ्या बालकांना अठरा वर्षांनंतर स्वावलंबी होण्यासाठी आर्थिक आधार देण्याचा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आला.

    मुंबई शहर, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, जिल्हा बाल संरक्षण कक्ष आणि रिक्ता फाउंडेशन, दिल्ली यांच्या समन्वयाने आज श्री मानव सेवा संघ येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमास जिल्हा महिला व बालविकास अधिकारी शोभा शेलार, बालकल्याण समिती मुंबई शहरचे अध्यक्ष महादेव सावंत, रिक्ता फाउंडेशन दिल्लीचे फाउंडर के. पोर्थो, विश्वस्त अरुणा चक्रवर्ती, तसेच जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे अधिकारी-कर्मचारी, श्री मानव सेवा संघ, श्रद्धानंद, आशा सदन, सेंट जोसेफ या संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

    मुंबई शहर जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, अंतर्गत एकूण १९ अनाथ बालके या आर्थिक मदतीस पात्र ठरली आहेत. त्यापैकी वयाची २१ वर्षे पूर्ण झालेल्या चार बालकांना पाच लाख रुपयांच्या मुदत ठेवीचा लाभ वितरित करण्यात आला. या उपक्रमामुळे संस्थांमधून बाहेर पडणाऱ्या बालकांना भविष्यात शिक्षण, रोजगार, व्यवसाय किंवा इतर गरजांसाठी आर्थिक आधार मिळणार असून, त्यांना स्वावलंबी जीवन जगण्यास मदत होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाल संरक्षण अधिकारी कोमल रुपेकर यांनी केले, तर आभार प्रभारी जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अमोल जाधव यांनी मानले.

    0000

    श्रद्धा मेश्राम/विसंअ

     

     

     

     

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed