“आम्ही सर्व भारतीय आहोत. पहिल्यांदा जेन-झी आणि जेन-अल्फा यांच्या हिंमतीला पूर्ण पाहिलं आहे. तुम्ही घाबरत नाहीत. आम्हाला आधी वाटायचं की, तुम्ही आम्हाला नवीन भाषा शिकवत आहात. पण तुम्ही आम्हाला हिंमत शिकवली. तुम्हाला सलाम करतो”, असं आदित्य ठाकरे शिवाजी पार्कच्या मैदानावर भर मंचावर म्हणाले. शिवाजी पार्कात आज राष्ट्रगीत गायनासाठी सर्व आंदोलक एकत्र आले होते. यानंतर आता 26 जुलैला ठाकरे बंधूंचा शिवाजी पार्क ते सिद्धीविनायक मंदिर चौकपर्यंत मोर्चा निघणार आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : कॉक्रोच जनता पार्टीच्या समर्थनार्थ मुंबईच्या दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे विद्यार्थ्यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात एकत्र येत आंदोलन केलं. या आंदोलनात अभिनेता अतुल कुलकर्णी सहभागी झाला आहे. विशेष म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे, मनसे नेते अमित ठाकरे हे देखील या आंदोलनात सहभागी झाले. यावेळी आंदोलनस्थळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील दाखल झाले. त्यामुळे या आंदोलनाला जास्त महत्त्व प्राप्त झालं. उद्धव ठाकरे मंचावर दाखल झाल्यानंतर त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना 26 मार्चच्या मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन विद्यार्थ्यांना केलं. यानंतर सर्वांनी राष्ट्रगीत म्हटलं आणि उद्धव ठाकरे आंदोलनस्थळावरुन निघून गेले.
आदित्य ठाकरे काय म्हणाले?
“मी सर्वांना वचन दिलं होतं की, हे संपूर्ण देशाचं आंदोलन असणार आहे. इथे सर्वांच्या हातात तिरंगा आहे. आपण सर्व अभिजीत दिपके, सोनम वांगचुक आणि सर्व विद्यार्थ्यांसाठी एकत्र आलो आहोत. इथे राजकीय भाषणं होणार नाहीत, असं मी वचन दिलं होतं. आम्ही इथे एकाच कारणाने इथे उभे आहोत. आपण इथे आंदोलनाला आले आहात. आपल्याला कुणीही हात लावू नये यासाठी आम्ही दोघेजण इथे उभे आहोत. हा देश आमचा आहे आणि आमचाच असणार आहे. कुणीही लाठी चालवणार नाही”, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
‘आवाज दिल्लीपर्यत जायला हवा’
“आपण सर्वांनी सोनम वांगचुक यांचे आभार मानले पाहिजेत. त्यांनी 25 दिवस उपोषण केलं. उपोषण संपलं आहे. पण आंदोलन संपलेलं नाही. अभिजीत दिपके आणि अनेक तरुण आजही दिल्लीत जंतरमंतर मैदानावर बसले आहेत. आपला आवाज तिकडे दिल्लीपर्यंत पोहोचायला हवा”, असं आवाहन आदित्य ठाकरे यांनी केलं.
तुम्ही त्यांचे मित्र बनू शकता का? आदित्य ठाकरेंचा सवाल
“केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झालाच पाहिजे. तोपर्यंत शांत बसायचं नाही. तिसरी गोष्ट म्हणजे किती लोकांनी काल रात्री इन्स्टाग्रावर पंतप्रधान मोदींचा व्हिडीओ पाहिला? लाठी खालल्यानंतर आपण त्यांचे मित्र बनू शकता का? अश्रूधुरांच्या नळकांड्या फोडल्यानंतर तुम्ही त्यांचे मित्र बनू शकता का? पेपर लीक झाल्यानंतर तुम्ही त्यांचे मित्र बनू शकता का?”, असे सवाल आदित्य ठाकरे यांनी केले.
“संविधानाचा अपमान करणाऱ्यांचे तुम्ही मित्र बनू शकता का? ते जेव्हा घाबरतात तेव्हा हिंदू-मुस्लीम करतात, त्यांचे मित्र तुम्ही बनू शकता का? जेव्हा ते घाबरतात तेव्हा जातीधर्माची, भाषेची बात करतात, आपण त्यांचे मित्र बनू शकतात का? जे आपत्तीच्या वेळी आपल्यात नाही तर परदेशात जातात, त्यांचे मित्र तुम्ही बनू शकतात का? धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा देईपर्यंत तुम्ही शांत बसू शकतात का?”, असे देखील सवाल आदित्य ठाकरे यांनी केले.
‘ही शिवरायांची भूमी’
“इथे मी आहे, अमित ठाकरे आहेत, संजय राऊत आहेत, पण आमच्या सर्वांपेक्षा मोठा आवाज तुम्ही आहात. हा मंच आमचा नाही, हे आंदोलन आमचं नाही. कदाचित तुमच्यातील अनेक जण आम्हाला मतदान करत नसतील आणि त्यात काही चुकीचं नाही. तो तुमचा अधिकार आहे. मी नेहमीच आपल्या अधिकारांचा आदर करतो. ही भूमी छत्रपती शिवाजी महाराज, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची भूमी आहे. प्रेमाने बोलणार असाल तर प्रेम मिळेल आणि घाबरवण्यासाठी याल तर वेदना मिळतील”, असं आदित्य ठाकरे आपल्या भाषणात म्हणाले.
राष्ट्रगीत गायनानंतर हे आंदोलन संपलं आहे. सर्व नेतेमंडळींकडून आंदोलकांना सावकाश घरी जाण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. पण आंदोलक अजून मैदान सोडायला तयार झालेले नाहीत.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा