• Thu. Jul 23rd, 2026
    Navi Mumbai : सोनम डोंगरे मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट; चुकीच्या इंजेक्शनमुळे बळी गेल्याचा आरोप, समितीच्या अहवालात वेगळंच कारण समोर

    Navi Mumbai Airoli Sonam Dongre Death Case : नवी मुंबईतील ऐरोलीमध्ये झालेल्या सोनम डोंगरे मृत्यू प्रकरण मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणात डॉक्टरांना क्लीनचिट देण्यात आली आहे.

    ऐरोली सोनम डोंगरे मृत्यू प्रकरण समिती अहवाल डॉक्टरांना क्लिनचीट(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    अमुलकुमार जैन, नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका हद्दीतील ऐरोली येथील महानगरपालिकेच्या राजमाता जिजाऊ रुग्णालयात घडलेल्या गर्भवती सोनम डोंगरे यांच्या मृत्यू प्रकरणात चौकशी समितीने संबंधित डॉक्टरांना क्लीनचिट दिली आहे. उपचार प्रक्रियेदरम्यान डॉक्टरांकडून कोणताही निष्काळजीपणा झाल्याचं आढळून आलं नसल्याचं समितीने आपल्या अहवालात स्पष्ट केलं आहे. हा अहवाल सोमवारी महापालिकेच्या महासभेत सादर करण्यात आला.

    दुर्मीळ स्वरूपाची औषध प्रक्रिया

    समितीच्या अहवालानुसार, सोनम डोंगरे यांना उपचारादरम्यान देण्यात आलेल्या एका इंजेक्शनमुळे अत्यंत दुर्मीळ स्वरूपाची औषध प्रक्रिया (अॅलर्जी) झाली. त्यानंतर झालेल्या उलटीतील अन्न व द्रव फुफ्फुसात गेल्यानं (अॅस्पिरेशन) त्यांचा तसेच गर्भातील बाळाचाही दुर्दैवी मृत्यू झाला. अशा प्रकारची तीव्र औषध प्रक्रिया लाखो रुग्णांपैकी एखाद्यालाच होण्याची शक्यता असते. त्यामुळे हा प्रकार डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे घडलेला नसून दुर्मीळ वैद्यकीय गुंतागुंतीचा परिणाम असल्याचं समितीने नमूद केलं आहे.
    अहवालात उपचार वैद्यकीय प्रोटोकॉलनुसार करण्यात आल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे.
    Maharashtra TimesCrime News : छळाला कंटाळून महिलेनं स्वत:ला संपवलं, चिमुकले आईच्या शोधात, तीन लेकरं मायेच्या छत्रछायेला पारखी; उपस्थितांचे डोळे पाणावले
    या प्रकरणात वैद्यकीय कागदपत्रे, औषधोपचार, तपासणी अहवाल आणि उपचार पद्धतीची सखोल छाननी करण्यात आली. याच कालावधीत रुग्णालयात उपचार घेत असलेल्या आणखी दोन महिलांनाही संबंधित औषध देण्यात आलं होतं. त्यापैकी एका महिलेला सौम्य तर दुसऱ्या महिलेला मध्यम स्वरूपाची औषध प्रक्रिया झाली होती. मात्र, दोघींवर तातडीने उपचार करून त्यांना सुरक्षित वाचविण्यात यश आलं.

    प्रकरणाचा पुर्नतपास होण्याची मागणी

    दरम्यान, हा अहवाल सादर झाल्यानंतर नवी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकृत सूत्रांनी समितीच्या निष्कर्षांची माहिती दिली. मात्र, या प्रकरणातील अन्न व औषध प्रशासनाचा (एफडीए) तपास अहवाल आणि अंतिम शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच मृत्यूबाबतचा अंतिम निष्कर्ष अधिक स्पष्ट होणार असल्याचंही प्रशासनानं नमूद केलं आहे.
    Maharashtra TimesPune News: पुण्यात रेल्वे फाटके हद्दपार! नऊ ठिकाणी रेल्वे पूल आणि भुयारी मार्ग बांधणार; कुठे-कसे असतील मार्ग?
    दुसरीकडे, सोनम डोंगरे यांचे पती करण डोंगरे यांनी समितीच्या अहवालावर आक्षेप घेत चौकशी एकतर्फी झाल्याचा आरोप केला आहे.
    समितीने डॉक्टरांचे जबाब नोंदवले. मात्र, कुटुंबीयांची बाजू ऐकून घेतली नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. मनसेनेही या प्रकरणात निष्पक्ष आणि स्वतंत्र चौकशीची मागणी कायम ठेवत रुग्णालयातील उपचारपद्धती, वैद्यकीय सुविधा आणि संपूर्ण घटनेचा पुर्नतपास करण्याची भूमिका कायम ठेवली आहे. त्यामुळे समितीच्या अहवालानंतरही या प्रकरणावरील वाद आणि प्रश्न अद्याप कायम आहेत.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

    प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

    ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा