कोल्हापूर: कोल्हापुरात गोकुळ शिरगाव येथील नामांकित युनिटी मोटर्स कंपनीची तब्बल 2 कोटी 36 लाख रुपयांची ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या आंतरराज्य सायबर टोळीचा कोल्हापूर सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. गुजरातमधील अहमदाबाद येथून पाच आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्यात एका ऑटोमोबाईल इंजिनिअरचाही समावेश आहे. तांत्रिक कौशल्याचा वापर करून अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने हा ‘बॉस स्कॅम’ रचण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी पत्रकार परिषदेत दिली.
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपींनी ‘बॉस स्कॅम’ किंवा ‘व्हेल फिशिंग’ पद्धतीचा अवलंब करत कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या मोबाईल आणि संगणकांवर संशयास्पद APK आणि ZIP फाईल्स पाठवल्या. त्यातून वेब सेशन आणि संवाद व्यवस्थेची माहिती मिळवून कंपनीतील आर्थिक व्यवहारांची पद्धत समजून घेतली. त्यानंतर कंपनीच्या मालकाचा फोटो वापरून बनावट व्हॉट्सॲप प्रोफाइल तयार करण्यात आले. त्या प्रोफाइलवरून अकाउंट विभागाला नवीन व्यावसायिक करारासाठी तातडीने निधी पाठविण्याचे निर्देश देण्यात आले. वरिष्ठांचा आदेश समजून अकाउंटंटने दोन दिवसांत चार व्यवहारांतून 2.36 कोटी रुपये आरोपींनी दिलेल्या खात्यांमध्ये जमा केले.
इंजिनियरसह 5 जणांना अटक
तांत्रिक पुरावे, मोबाईल डेटा आणि बँक व्यवहारांचा मागोवा घेत कोल्हापूर पोलिसांनी अहमदाबाद येथे कारवाई करत राजेश उर्फ डी. के. गिरधारीलाल गुरनानी (वय 53), देव परेशभाई त्रिवेदी (वय 24), भावीन खांडेरा (वय 23), जतीन पाल (वय 20) आणि अर्पित पांडे (वय 23) यांना अटक केली. देव त्रिवेदी हा ऑटोमोबाईल इंजिनिअर असल्याचे तपासात स्पष्ट झाले.
दरम्यान, विविध बँकांशी समन्वय साधून पोलिसांनी 82 लाख रुपये गोठविण्यात यश मिळवले असून न्यायालयीन प्रक्रियेनंतर ही रक्कम कंपनीला परत मिळणार आहे. उर्वरित रकमेचा शोध सुरू आहे. आर्थिक व्यवहारांपूर्वी व्हॉट्सॲप किंवा ई-मेलवरील सूचनांची प्रत्यक्ष पडताळणी करावी, संशयास्पद फाईल्स डाउनलोड करू नयेत आणि फसवणूक झाल्यास तातडीने 1930 हेल्पलाईन किंवा कोल्हापूर सायबर पोलिसांशी 8412841100 या नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा