Weather Alert: संपूर्ण आठवडा राज्यात मान्सूनचा जोर वाढणार आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रावर पावसाचे ढग दिसू लागले आहेत. २० जुलै रोजी कोणत्या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे?
जुलैच्या पहिल्या आठवड्यात मुसळधार पाऊस झाल्यानंतर पावसाने काही काळासाठी विश्रांती घेतली होती. परंतु, गेल्या काही दिवसांपासून राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. राजस्थानच्या श्री गंगानगरपासून रोहतक, हरदोई, वाराणसी, रांची, सागार बेटे ते वायव्य बंगालच्या उपसागरापर्यंत १.५ किलोमीटर उंच कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं आहे. शिवाय मध्य प्रदेशात समुद्राच्या सपाटीपासून ३.१ किलोमीटर उंचीवर, उत्तर आंध्र प्रदेशची किनारपट्टी आणि दक्षिण छत्तीसगडमध्ये ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे सक्रिय झाले आहेत. या सर्व प्रणालींमुळे महाराष्ट्रात मोसमी वाऱ्यांने पुन्हा वेग पकडला आहे.
Weather Update: महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय होणार, कोकणात ४८ तासांत पाऊसधारा; १६ जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’
मुंबई-पुण्यातील हवामान
मुंबई, ठाणे जिल्ह्यांमध्ये सोमवारी मुसळधार पावसाची शक्यता आहेत. हवामान विभागाने सकाळी सात वाजता सतर्कतेचा इशारा दिला आहे. त्यासह पुणे जिल्ह्यातही घाटमाथ्यावर आज जोरदार पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
कोकणातील हवामान कसं असेल?
पावसाचा जोर ओसरला होत तेव्हाही कोकण किनारपट्टीवर तुरळक ठिकाणी पाऊस सुरू होता. २० जुलै रोजी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात हलक्या सरींची शक्यता आहे. दरम्यान रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
उत्तर महाराष्ट्र आणि खान्देशातील हवामान कसं असेल?
उत्तर महाराष्ट्रात धुळे, नंदुरबार आणि अहिल्यानगर जिल्ह्यांमध्ये सोमवारी हलक्या पावसाची शक्यता आहे. नाशिक जिल्ह्यातही पावसाचा जोर कमीच राहील पण घाटमाथ्यावर मध्य वादळी वाऱ्यांसह मध्यम पावसाची नोंद होण्याची शक्यता आहे. जळगाव जिल्ह्यातही पावसाचा जोर कमीच राहील
पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पाऊस
पश्चिम महाराष्ट्रात आज पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. मेघगर्जनेसह कोसळणार आहे. कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. साताऱ्यात घाटमाथा परिसरात मुसळधार पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
मराठवाड्याती हवामान जाणून घ्या
मराठवाड्यातही या आठवड्यात मोसमी वाऱ्यांचा वेग वाढला आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना आणि परभणी जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा अंदाज आहे. दरम्यान, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्येही हलका पाऊस होण्याची शक्यता आहे.
Pune News: पुण्यात नव्या बोगद्याने सिंहगड-सातारा रस्ता जोडणार, प्रवासाचा वेळ ५० मिनिटांवरून १० मिनिटांवर येणार
विदर्भातील हवामान कसं राहील ?
संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून सक्रिय झाला असला तरी विदर्भातील वातावरण अजून कोरडचं आहे. रविवारी काही ठिकाणी हलका पाऊस झाला असला तरी सोमवारी पावसाची शक्यता फार कमी आहे. अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांत वातावरण शांत असेल. हवामान विभागाकडून कोणताही अलर्ट देण्यात आलेला नाही.
तुमच्या जिल्ह्यांत सोमवारी हवामान कसं आहे? पावसाने काही दिवस दडी मारल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सरकारने कोणत्या योजना सुरू केल्या पाहिजेत? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा!
