• Mon. Jul 20th, 2026

    नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची वस्त्रोद्योग प्रदर्शनाला भेट – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Jul 19, 2026
    नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची वस्त्रोद्योग प्रदर्शनाला भेट – महासंवाद

    नवी दिल्ली, दि. १९ : महाराष्ट्राच्या समृद्ध वस्त्रोद्योगाचा आणि पारंपरिक हस्तकलेचा वारसा दिल्लीकरांपर्यंत पोहोचवण्यासाठी येथील नवीन महाराष्ट्र सदन येथे आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय वस्त्रोद्योग प्रदर्शन व विक्री केंद्राला राज्याच्या नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी आज  भेट दिली. याप्रसंगी त्यांनी प्रदर्शनातील विविध दालनांना भेट दिली.

    नवी दिल्लीतील कस्तुरबा गांधी मार्गावरील नवीन महाराष्ट्र सदन येथे 18 ते 20 जुलै 2026 या कालावधीत या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘भारत टेक्स 2026’ च्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ (महाटेक्स) आणि महाराष्ट्र सदन यांच्या संयुक्त विद्यमाने हे प्रदर्शन भरविण्यात आले आहे.

    प्रदर्शनाची पाहणी करताना नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी राज्यातील विणकर आणि कारागिरांच्या कौशल्याचे कौतुक केले. या भेटीदरम्यान श्रीमती मिसाळ यांनी प्रदर्शनात मांडण्यात आलेल्या अस्सल पैठणी, सोलापूरच्या प्रसिद्ध चादरी, बांबू व टेरी टॉवेल्स आणि जीआयटॅग प्राप्त कोल्हापुरी चपला यांसह विविध हातमाग व रेशीम उत्पादनांची माहिती घेतली आणि कारागिरांचा उत्साह वाढवला. महाटेक्सचे उपसंचालक डॉ. महेंद्र ढवळे यांनी त्यांचे स्वागत केले यावेळी रेशीम विकास अधिकारी संदीप आगवणे, अशोक वडवले, महाटेक्सचे गणेश ठाकूर, रूपेश खापेकर आदी  उपस्थित होते.

    या प्रदर्शनाला दिल्लीतील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून विणकरांच्या उत्पादनांची चांगली विक्रीही झाली आहे.

    0000

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed