• Fri. Sep 4th, 2026

आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांची चिखलदरा कन्या आश्रमशाळा तसेच मुलींच्या वसतिगृहास भेट – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Jul 19, 2026
आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांची चिखलदरा कन्या आश्रमशाळा तसेच मुलींच्या वसतिगृहास भेट – महासंवाद

अमरावती, दि. १९ (जिमाका):चिखलदरा येथे आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांनी नुकतीच भेट दिली. या भेटीदरम्यान  त्यांनी चिखलदरा दौऱ्यादरम्यान शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या आश्रमशाळा तसेच टेंब्रूसोंडा मुलींच्या वसतिगृहास  येथे भेट दिली.

यावेळी भेटीदरम्यान  त्यांनी उपस्थित विद्यार्थिनींशी संवाद साधत  महाविद्यालय व वसतिगृहाची प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच शिक्षणाचा दर्जा, वसतिगृहातील सुविधा आणि विद्यार्थिनींना अधिक चांगल्या सोयी-सुविधा उपलब्ध व्हाव्यात याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.

याप्रसंगी आमदार केवलराम काळे, अपर आयुक्त संदीप गोलाइत, प्रकल्प अधिकारी सिद्धार्थ शुक्ला,  मुख्याध्यापक श्री. पुंडकर,  शिक्षकवृंद तसेच कर्मचारी उपस्थित होते.

0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed