Chhatrapati Sambhajinagar Crime News : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
छत्रपती संभाजीनगर सायमा चौधरी हत्या प्रकरण(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर : एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याच्या हद्दीतून 1 एप्रिल 2026 रोजी बेपत्ता झालेल्या 26 वर्षीय सायमा सलमान चौधरी आणि तिच्या 14 महिन्यांच्या चिमुकल्याची अत्यंत निर्घृण आणि अमानुष हत्या करण्यात आल्याचं धक्कादायक वास्तव उघडकीस आलं आहे. पैशांच्या आर्थिक व्यवहारातून विवाहितेचा ओढणीने गळा आवळून खून करण्यात आला आणि त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी पोटच्या पोराला चालू नदी-नाल्यात फेकून देऊन त्यालाही ठार मारल्याचा गंभीर आरोप फिर्यादीने केला आहे. वाळूज पोलिसांनी या प्रकरणी दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास नाशिक पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
साजापूर येथील अब्दुल लतीफ युनुस चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांची मुलगी सायमा हिचा विवाह 2020 मध्ये सलमान अब्दुल सलमान चौधरी याच्याशी झाला होता. दोघेही पुण्यात राहत होते. पहिल्या मुलीचा अवघ्या 14 महिन्यांची असताना मृत्यू झाला. त्यानंतर सायमा दुसरा मुलगा साजीम याच्यासह आई-वडिलांकडे साजापुरात राहण्यासाठी आली होती. तिचा पती पुण्यात नोकरीसाठी होता. Maharashtra Politics : जयंत पाटलांच्या भेटीगाठी सुरुच, फडणवीसांनंतर शिंदेंसोबत खलबतं, विरोध मोडण्यासाठी ‘अर्थ’पूर्ण बैठकीची चर्चा
बेपत्ता असल्याची तक्रार ते विहिरीतील मृतदेह
1 एप्रिल 2026 रोजी सायमा मुलाला घेऊन घरातून पडली. ती पुण्याला पतीकडे गेली असावी, असा कुटुंबाचा समज होता. मात्र, दीड महिन्यानंतर ती पतीकडे पोहोचली नसल्याचं स्पष्ट झाल्यावर 19 मे रोजी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात ती बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली. वाळूज पोलिसांनी तपास सुरू केला असता, नाशिक जिल्ह्यातील वावी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कणकोरी शिवारातील एका विहिरीत 6 एप्रिल रोजी एका अज्ञात महिलेचा मृतदेह सापडला होता. 6 एप्रिल रोजी विहिरीत सापडलेला मृतदेह अत्यंत कुजलेल्या अवस्थेत होता. मात्र, फिर्यादी अब्दुल लतीफ यांनी सायमाच्या अंगावरील कपडे, ग्रे-वाईट रंगाचा ड्रेस, निळ्या फुलांच्या नक्षीचा दुपट्टा, नथ, घड्याळ आणि सोशल मीडियावरील तिच्या छायाचित्रांवरून हा मृतदेह सायमा चौधरी हिचाच असल्याची खात्री केली. या पुराव्यामुळे तपासाला निर्णयाक दिशा मिळाली. Chhatrapati Sambhajinagar News : खाकी वर्दीला काळीमा! हॉटेल अन् घरात शिक्षिकेवर जबरदस्ती अत्याचार, PSIचा कारनामा, कारमध्ये मारहाण करुन रस्त्यावर सोडलं
आर्थिक व्यवहार आणि हत्येचा अघोरी कट
पोलिसांनी सायमाच्या घरातून मिळालेल्या आर्थिक पुराव्यांच्या आधारे तपास केला. सायमाने संशयितांच्या बँक खात्यात तीन लाख रुपये जमा केले होते आणि 50 हजार रुपयांचे फोन-पे व्यवहार केले होते. तसेच संशयितांना पाच लाख रुपये दिल्याचा व्हिडीओही फिर्यादीकडे होता. या पैशांच्या देवाणघेवाणीतून सायमाला एमआयडीसी वाळूज परिसरात बोलवण्यात आले. तेथून कारमध्ये बसून प्रवासादरम्यान तिचा ओढणीने गळा आवळून खून करण्यात आला आणि मृतदेह विहिरीत टाकला. तर, चिमुकल्याला वाहत्या नदी-नाल्यात फेकून अमानुष विल्हेवाट लावली. या प्रकरणी नुरजमा अहमद चौधरी आणि सद्दाम उर्फ आमीर अहमद चौधरी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा