• Mon. Jul 13th, 2026

    Goregaon-Mulund Link Road: पश्चिम द्रुतगती महामार्गासाठी पर्यायी मार्ग, गोरेगाव-मुलुंड लिंक रोडचा पहिला टप्पा पूर्ण; उड्डाणपूल लवकरच सेवेत

    Goregaon-Mulund Link Road: पश्चिम द्रुतगती महामार्गासाठी पर्यायी मार्ग, गोरेगाव-मुलुंड लिंक रोडचा पहिला टप्पा पूर्ण; उड्डाणपूल लवकरच सेवेत

    गोरेगाव मुलुंड लिंक रोड २०२८ पर्यंत प्रवाशांसाठी खुला होणार आहे. या मार्गातील पहिल्या टप्प्याचं काम आता पूर्ण झालं असून सप्टेंबरपर्यंत या मार्गावर वाहतूक सुरू होणार आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई: शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी मुंबई महापालिकेने गोरेगाव-मुलुंड लिंक रोड हा प्रकल्पा हाती घेतला आहे. या प्रकल्पाचं काम मुख्य चार टप्प्यात केलं जात आहे. यामध्ये उड्डाणपुलांसह संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणाऱ्या जुळ्या भुयारी बोगद्यांचाही समावेश आहे. या प्रकल्पातील पहिल्या टप्प्याचं काम आता अंतिम टप्प्यात आहे. दिंडोशी कोर्टापासून ते गोरेगाव फिल्मसिटी पर्यंत जोडणाऱ्या उड्डाणपुलाचं काम पूर्ण करून तो सप्टेंबरमध्ये प्रवाशांसाठी खुला करण्यात येणार आहे.

    कुठून-कसा असेल मार्ग?

    मुंबईतील पश्चिम द्रुतगती महामार्गावरील कोंडी फोडण्यास मदत होणार आहे. पश्चिम उपनगरातील दिंडोशी कोर्टापासून ते गोरेगावमधील फिल्मसिटीपर्यंत असलेला हा पूल १. २ किमी लाबं आहे. गोरेगाव मुलुंड लिंक रोडचा हा पहिला टप्पा आहे. पश्चिम द्रुतगती महामार्गाला लागून असलेल्या दिंडोशी कोर्टापासून हा उड्डाणपूल सुरू होईल आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानापर्यंत जाऊन संपेल. प्रकल्पातील उर्वरित काम सध्या पूर्ण झालेलं नाही. त्यामुळे तिथून वाहन चालक इतर मार्गांच्या सहाय्याने पूर्व उपनगरात प्रवास करू शकतील. हा उड्डाणपूल सुरू झाल्यावर वाहनचालकांना पश्चिम द्रुतगती मार्गासाठी एक नवीन पर्याय मिळणार आहे.

    Maharashtra TimesMumbai AC Local: गर्दीच्या वेळी ‘एसी लोकल’मधील एसी पडला बंद , १५ मिनिटं मुलुंड स्थानकावर ठप्प; प्रवासी गुदमरून बेशुद्ध
    पुढील टप्प्यात या उड्डाणपुलावरून गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या जुळ्या बोगद्यांपर्यंत पोहोचता येणार आहे. या बोगद्यांचं काम २०२७पर्यंत पूर्ण होईल अशी शक्यता आहे. हे दोन्ही मार्ग कार्यन्वित होताच शहरातील पूर्व आणि पश्चिम उपनगरांमधील वाहतूक कोंडी फुटणार आहे. या पूर्व हा उड्डाणपूल मे महिन्यापर्यंत खुला करण्याचं उद्दिष्ट होतं. पावसाळ्यापूर्वी मार्ग सुरू करून पावसाळ्यात होणारी वाहतूक कोंडी फुटेल अशी आशा होती. पण काही कामांना विलंब झाल्यामुळे ही तारीख पुढे ढकलण्यात आली होती. आता सप्टेंबरमध्ये मार्ग प्रवाशांसाठी खुला होईल अशी आशा आहे.

    गोरेगाव-मुलुंड लिंक रोड

    गोरेगाव-मुलुंड लिंक रोड १२. २ किमी लांब कॉरिडोर आहे. या मार्गावर भुयारी बोगदे, पूल आणि इंटरचेंजचा समावेश आहे. हा मार्ग पूर्ण होताच पश्चिम उपनगरांमधील गोरेगावला पूर्व उपनगरांधील मुलुंडशी जोडण्यात येणार आहे. सध्या मुंबईमध्ये थेट पूर्व-पश्चिम जोडणारा कोणताही मार्ग नाही. पहिल्या टप्प्यातील उड्डाणपूल सहा पदरी असेल. त्यावर एका उन्नत फलाटावर वर्तुळाकर इंटरसेक्शन असतील. याशिवाय पादचाऱ्यांसाठी पुलाच्या दोन्ही बाजूंना पदपथे बांधली जातील.

    मुंबई महापालिकेने संपूर्ण गोरेगाव-मुलुंड लिंक रोडसाठी २०२८ची डेडलाइन दिली आहे. या संपूर्ण प्रकल्पासाठी १४,००० रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यापैकी उड्डाणपुलासाठी ३०० कोटी रुपये वापरण्यात आले आहेत. या उड्डाणपुलाचं बांधकाम पूर्ण झालं असून डांबरीकरण, सिग्नल उभारणी, दिशादर्शक फलकं आणि इतर किरकोळ कामं शिल्लक आहेत.

    Maharashtra TimesKonkan Railway: कोकणवासियांची ‘कन्फर्म’साठी आराधना सुरू, गणपतीसाठी आरक्षण खुले; रेल्वे आणि एसटीचं वेळापत्रक जाहीर

    मुंबईतील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महापालिका अनेक प्रकल्प राबवत आहे. गोरेगाव-मुलुंड लिंक रोडचं काम पूर्ण झाल्यावर नागरिकांना कसा फायदा होऊ शकतो? वाहतूक कोंडी कमी होईल का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

    पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

    यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

    २०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

    लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा