• Sun. Jul 12th, 2026
    FDA Action On Blood Bank: जे. जे. महानगर रक्तपेढीचा परवाना अखेर रद्द; समाधानकारक स्पष्टीकरण न दिल्याने ‘एफडीए’ची कारवाई

    Mumbai JJ Mahanagar Blood Bank: या निर्णयाविरोधात तीन महिन्यांच्या आत राज्य सरकारकडे अपील करण्याची मुभा रक्तपेढीला देण्यात आली आहे.

    रक्तपेढी(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    शर्मिला कलगुटकर, मुंबई : रक्तचोरीमुळे चर्चेच्या केंद्रस्थानी असलेल्या मुंबईतील जे. जे. महानगर रक्तपेढीचा परवाना अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) अखेर रद्द केला आहे. ‘महाराष्ट्र टाइम्स’ने ही रक्तचोरी उघडकीस आणल्यानंतर २२ ते २३ जूनदरम्यान ‘एफडीए’ने केलेल्या तपासणीमध्ये रक्तपेढीत अनेक गंभीर नियमभंग झाल्याचे निदर्शनास आले होते. याबाबत रक्तपेढीने समाधानकारक स्पष्टीकरण दिलेले नसल्याचे स्पष्ट करून ‘एफडीए’ने शनिवारी ही कारवाई केली.

    रक्तचोरीप्रकरणी ‘एफडीए’ने रक्तपेढीला कारणे दाखवा नोटीस बजावून स्पष्टीकरणासाठी १५ दिवसांची मुदत दिली होती. मात्र, रक्तपेढीने दिलेले स्पष्टीकरण समाधानकारक नसल्याचे नमूद करून ‘एफडीए’ने तिचा परवाना तत्काळ रद्द केला.

    Maharashtra TimesTukaram Mundhe: धाडींनंतर मंत्रीकार्यालयाचा तुमच्यावर दबाव? बदलीसाठी पैसे गोळा केले? तुकाराम मुंढेंची रोखठोक उत्तरे!
    तपासणी न झालेल्या ५० रक्तपिशव्या माया रक्तपेढीला पाठवल्याचे जे. जे. महानगर रक्तपेढीने स्पष्टीकरणामध्ये मान्य केले आहे. शिबिर आयोजकांच्या सूचनेनुसार असे केल्याचा दावा रक्तपेढीने केला आहे. मात्र, ‘या सरकारी रक्तपेढीची कायदेशीर जबाबदारी कमी होत नाही. रक्तसाठा, बॅचनिहाय नोंदी, ट्रेसिबिलिटी आणि दस्तावेजीकरणाबाबत नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. तपासणीनंतर केलेली ताळमेळ प्रक्रिया निरीक्षणावेळी आढलेल्या त्रुटींचे समाधानकारक स्पष्टीकरण ठरत नाही. त्यामुळे औषधे व सौंदर्यप्रसाधने नियम १९४५मधील नियम १२२ पी (१)(ब); तसेच अनुसूची एफ, भाग एक्सआयआय-बीमधील संबधित तरतुदींचा भंग झाल्याचे ‘एफडीए’ने स्पष्ट केले आहे.

    जानेवारी २०२६मध्ये झालेल्या विविध रक्तदान शिबिरांमध्ये कार्यरत असलेल्या चार वैद्यकीय सामाजिक कार्यकर्त्यांना परवाना प्राधिकरणाची पूर्वमान्यता नव्हती. ‘एफडीए’ने ही त्रुटी निदर्शनास आणून दिली. त्यावर त्या चार समुपदेशकांची नावे मंजुरीसाठी पाठवल्याचे रक्तपेढीने नमूद केले. मात्र, तपासणीनंतर मंजुरीसाठी नावे पाठवणे म्हणजे, तपासणीच्या वेळी पूर्वमान्यता होती, हे स्पष्टीकरण योग्य नाही, असे ‘एफडीए’ने म्हटले आहे.

    Maharashtra TimesVinayak Raut: पतीने संबंध ठेवण्यात टाळाटाळ केल्याचा आरोप, सुनेसोबत नेमकं काय घडलं? विनायक राऊतांची पहिली प्रतिक्रिया
    आरोग्य विभागाने केले हात वर
    ही रक्तपेढी इतरत्र नेणे, तसेच आता परवाना रद्द झाल्याने रक्तपेढीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसंदर्भात कोणता निर्णय घेण्यात येणार, याबाबत सुस्पष्टता नसल्याने त्यांनी आरोग्य विभागाकडे विचारणा केली. मात्र, त्याचे कोणतेही समाधानकारक उत्तर राज्य रक्त संक्रमण परिषदेचे (एसबीटीसी) सहायक संचालक डॉ. सुभाष मोहनाळकर तसेच संचालक डॉ. नितीन अंबावडेकर हे कर्मचाऱ्यांना देऊ शकलेले नाहीत. या क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांची उपलब्धता करण्याची रक्तपेढी कर्मचाऱ्यांची मागणीही डॉ. मोहनाळकर यांनी धुडकावून लावली. रक्तपेढी सील असली तरी सॉफ्टवेअरमधील माहिती उडवणे, कागदपत्रे नष्ट होण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी चर्चा आहे.

    Maharashtra TimesEknath Khadse: आधी तावडेंची भेट, नंतर थेट ठाकरेंसोबत फोटो; खडसेंच्या मनात चाललंय काय? भेटीगाठींबाबत स्वत:च केला खुलासा!
    पूर्णवेळ सहायक संचालक नाही
    जे. जे. महानगर रक्तपेढीमध्ये गैरप्रकार सुरू असताना आणि आता या संदर्भात ‘एफडीए’कडे स्पष्टीकरण देतानाही आरोग्य विभागाने बघ्याची भूमिका घेतली आहे. पूर्णवेळ सहायक संचालक देण्याचे आश्वासन राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी अधिवेशनामध्ये दिले होते. त्याचीही अद्याप पूर्तता झालेली नाही. या संदर्भात डॉ. अंबावडेकर आणि डॉ. मोहनाळकर यांच्याशी सातत्याने संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही प्रतिसाद मिळाला नाही.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा