Nashik Acb Raid: शहरातील एका हॉटेलसमोरील चहाच्या दुकानाजवळ सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी म्हसरूळ पोलिसांत संशयिताविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला.
गुजरातमधील सुतारपाडा या गावात तक्रारदार चिकनविक्रीचा व्यवसाय करतात. ते महाराष्ट्रातून कोंबड्यांची खरेदी करून कारने गुजरातला ने-आण करतात. जूनमध्ये कोंबड्या घेऊन जात असताना पेठ पोलिस ठाण्याचा अंमलदार संशयित मनोज गायकवाड याने त्यांना वांगणी परिसरात अडवले. ‘तू गुटख्याची अवैध तस्करी करतोस, तुझ्यावर गुन्हा दाखल करतो,’ अशी धमकी गायकवाड याने दिली.
Shivsena UBT: फुटीच्या चर्चेनंतर ठाकरे गट सावध; संपर्कप्रमुख मिर्लेकरांकडून नगरसेवक-पदाधिकाऱ्यांची बैठक
तक्रारदाराने व्यवसायाची सत्यता पटवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र, गायकवाडने काहीही न ऐकता गुन्हा दाखल न करण्यासाठी ६० हजार रुपये उकळले. त्यानंतर ५ जुलै २०२६ रोजी गायकवाडने पुन्हा तक्रारदाराला फोन केला. गाड्या सुरळीत पुढे जाऊ देण्यासाठी व कारवाई न करण्यासाठी बोलावून १ लाखाची लाच मागितली. तडजोडीअंती ९० हजार रुपये देण्याचे ठरले.
नाशिकमध्ये रचला सापळा
तक्रारदाराने नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे रीतसर तक्रार नोंदवली. त्यानुसार नाशिकमध्ये सापळा रचण्यात आला. तक्रारदाराकडून ९० हजारांची लाचेची रक्कम स्वीकारताना अंमलदाराला ताब्यात घेण्यात आले. ‘एसीबी’चे पोलिस अधीक्षक भारत तांगडे, अपर अधीक्षक प्रदीप मैराळे, कविता फडतरे यांच्या सूचनेनुसार उपअधीक्षक सुरेश शिरसाठ आणि पोलिस निरीक्षक नेहा सूर्यवंशी यांनी ही कारवाई केली.
Supriya Sule: ‘राष्ट्रवादी’ला मनसेतच पाठवायचे बाकी राहिलेय! खासदार सुप्रिया सुळे यांची मिश्किल टिप्पणी
‘शालार्थ’चा एजंट जाळ्यात
नाशिक विभागीय शिक्षण कार्यालयातून झालेल्या ‘शालार्थ’ घोटाळ्यात बनावट आदेश तयार करून त्यावर उपसंचालकांची स्वाक्षरी घेण्यासाठी मध्यस्थी करीत ठराविक टक्केवारी उकळणाऱ्या संशयित प्रशांत तुळशीराम वाडीले (रा. धुळे) याला नाशिक आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने धुळ्यात बेड्या ठोकल्या.
‘शालार्थ’ घोटाळ्यातील दुसऱ्या गुन्ह्यात अकराशे पानांचे दोषारोप पत्र विशेष तपास पथकाने (एसआयटी) नाशिकरोड न्यायालयात दाखल केल्यानंतर खटल्याला सुरुवात झाली आहे. या गुन्ह्यात तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयित वाडीले धुळ्यात असल्याचे समजताच सहाय्यक पोलिस आयुक्त संदीप मिटके यांच्या सूचनेनुसार आर्थिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक रामदास शेळके, सहाय्यक उपनिरीक्षक उमेश बोरसे, उपनिरीक्षक किरण शेवाळे, अंबड गुन्हे शोध पथकाचे मोतीलाल पाटील यांचे पथक धुळ्यात पोहोचले. त्यांनी वाडीले याला ताब्यात घेत शनिवारी (दि. ११) धुळे न्यायालयात हजर केले. त्याला ‘ट्रान्झिट रिमांड’ मंजूर झाला असून, आज नाशिकरोड न्यायालयात हजर करण्यात येईल.
