Jalgaon Bhalgaon Zilla Parishad School : आपली शाळा स्वच्छ, सुंदर आणि विद्यार्थ्यांसाठी आरोग्यदायी बनविण्यासाठी प्रत्येकाने आपला सक्रिय सहभाग द्यावा’, असंही त्यात सांगण्यात आलं होतं.
मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी काय आवाहन केलं?
शाळा हे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे केंद्र असून स्वच्छ, सुंदर व आरोग्यदायी शालेय परिसर विद्यार्थ्यांच्या निरोगी आणि सकारात्मक वातावरणासाठी अत्यंत आवश्यक आहे. याच अनुषंगाने दिनांक 29 ऑगस्ट 2026, शनिवार रोजी जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये विशेष स्वच्छता अभियान प्रभावीपणे राबविण्यात यावे’, असं आवाहन करण्यात आलं होतं.
Nagpur News: नोंदणी पासून डॉक्टरांपर्यंत जाण्यासाठी तासंतास प्रतिक्षा;नोंदणीतच अडकले उपचार
या अभियानामध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी, अधिकारी-कर्मचारी, शिक्षक, विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ, युवा मंडळे तसेच स्वयंसेवी संस्था यांनी सक्रिय सहभाग नोंदवून शाळा परिसराची स्वच्छता, कचरा निर्मूलन, शाळेचा परिसर सुशोभीकरण, संरक्षक भिंती व परिसराची स्वच्छता इत्यादी कामे लोकसहभागातून पूर्ण करावीत. आपली शाळा स्वच्छ, सुंदर आणि विद्यार्थ्यांसाठी आरोग्यदायी बनविण्यासाठी प्रत्येकाने आपला सक्रिय सहभाग द्यावा’, असंही त्यात सांगण्यात आलं होतं.
कार्यवाही करण्याचेही आदेश
तसेच, शाळेच्या संरक्षक भिंतीपासून 50 मीटर अंतराच्या परिसरात HFSS (High Fat, Salt and Sugar) खाद्यपदार्थांची विक्री होत असल्याचं आढळून आल्यास, संबंधित प्रशासनानं आवश्यक ती दक्षता घेऊन अशा खाद्यपदार्थांची विक्री होणार नाही याची खात्री करावी. यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था, शिक्षण विभाग, ग्रामपंचायत प्रशासन व संबंधित अधिकारी यांनी समन्वयाने कार्यवाही करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.
अर्ध्या तासात प्रश्न वाचले, नंतर वॉशरुमला गेले, अवघ्या 30 मिनिटांत 90 प्रश्न अचूक, उमेदवारांचा डेटा पाहून अधिकारी शॉक; पुणे PMCच्या परीक्षेत हायटेक कॉपी
सदर अभियान केवळ एका दिवसापुरते मर्यादित न ठेवता शाळा व परिसरातील स्वच्छता. आरोग्य आणि सुरक्षिततेची नियमितपणे काळजी घेण्याची सवय निर्माण होईल. यासाठी सर्व संबंधितांनी प्रयत्न करावेत. या अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सर्व गट विकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी. केंद्रप्रमुख, ग्रामसेवक, सरपंच, जिल्हा परिषद अधिकारी-कर्मचारी व युवा मंडळांनी पुढाकार घेऊन आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व शाळांमध्ये व्यापक लोकसहभाग सुनिश्चित करावा. ‘स्वच्छ शाळा-सुंदर शाळा-निरोगी विद्यार्थी’, या संकल्पनेने आपण सर्वांनी एकत्रितपणे कार्य करून जिल्ह्यातील प्रत्येक शाळा स्वच्छ व सुंदर करण्यासाठी योगदान द्यावे. आपल्या सर्वांच्या सक्रिय सहभागातून हे अभियान निश्चितच यशस्वी होईल’, असा विश्वास करिष्मा नायर यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
स्वच्छता अभियानाला उस्फुर्त प्रतिसाद
दरम्यान, याप्रसंगी सरपंच गोविंदा मराठे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दीपक पारधी, केंद्रप्रमुख हिम्मत मोरे, ग्रामपंचायत शिपाई प्रदीप सांगळे, नरेंद्र मराठे, निलेश मराठे, कल्पेश महाजन हेमंत मराठे, राकेश भोई, समाधान मोरे, किशोर सांगळे, धीरज मराठे, यश मराठे, कैलास शिंदे, दिनेश शिंदे, गणेश मराठे ग्रामपंचायत सदस्य व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य सर्व पदाधिकारी ग्रामस्थ व पालक आणि मुख्याध्यापक संजय पाटील, पदवीधर शिक्षिका जयश्री चौधरी, उपशिक्षक संदीप पाटील, मंगला सोनवणे, जयश्री पाटील. सगळ्यांनी शालेय पोषण आहार वर्गखोली तसेच आवार सफाई वर्ग, सफाई शौचालय सफाई स्वच्छता अभियानांतर्गत साफसफाई केली.
