• Tue. Jul 7th, 2026
    Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांनी दिल्लीतून आणली गोड बातमी, महाराष्ट्राला पाणी देण्यास गुजरात तयार

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुत्सेद्देगिरी अखेर कामी आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्राच्या वाटेचं पाणी आता महाराष्ट्राला मिळणार आहे. गुजरात सरकारने हे मान्य केलं आहे. दिल्लीत पार पडलेल्या हाय व्होल्टेज बैठकीत याबाबत निर्णय झाला आहे. स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत माहिती दिली आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    नवी दिल्ली/मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर आहेत. दिल्लीत आज अतिशय महत्त्वाची बैठक पार पडली आहे. या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी महाराष्ट्रासाठी खूप मोठी आणि मोलाची माहिती दिली. दिल्लीतल्या बैठकीत नेमका काय निर्णय झाला? याबाबत त्यांनी सविस्तर सांगितलं आहे. महाराष्ट्राच्या वाटेचं 10 टीएमसी पाणी देण्यास गुजरातने मान्य केलं आहे. त्यामुळे महाराष्ट्राला या 10 टीएमसी पाण्याचा मोठा फायदा होणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

    “नर्मदा परियोजनेच्या संदर्भातील बैठक होती. ज्यामध्ये महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान आणि मध्य प्रदेश या चारही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना बोलावलं होतं. नर्मदा प्रकल्पाच्या संदर्भात ज्या काही अडचणी होत्या, लिगसी इशू होते, त्या संदर्भात बऱ्याच दिवसांपासून वाद सुरु होते. त्यामध्ये कुणी किती पैसे द्यायचे या संदर्भात वाद होता. गुजरातने जे पैसे खर्च केले आहेत, त्यात इतर राज्यांना काही पैसे द्यायचे आहेत त्या संदर्भात काही वाद होते”, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.

    आता महाराष्ट्र केवळ 27 कोटी देणार

    “महाराष्टाचं मत होतं की, नर्मदा प्रकल्प पूर्ण झाला. महाराष्ट्राला त्यातून वीज तर मिळाली. पण जे 10 टीएमसी पाणी महाराष्ट्राला कबूल केलं होतं, ते मिळालेलं नाही. ते पाणी महाराष्ट्राला मिळालं पाहिजे. त्यादृष्टीने आज फार चांगले निर्णय झाले. जवळपास सर्व वाद मिटले आहेत. महाराष्ट्राला केवळ 27 कोटी रुपये देणं आहे. बाकी आपलं सर्व देणं रद्द झालेलं आहे”, अशी महत्त्वाची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

    महाराष्ट्राला 10 टीएमसी पाणी देण्यास मान्यता

    “जे 10 टीएमसी पाणी महाराष्ट्राला द्यायचं होतं त्यामध्ये नर्मदा-तापी डायव्हर्जन यामधून 5 टीएमसी आणि 5 टीएमसीची मागणी आम्ही उकाईमधून केली होती. उकाईमधून ज्या काळात पाऊस असतं त्या काळात तीन ते चार महिने पाणी उचलायची परवानगी आम्ही महाराष्ट्राला देऊ, असं गुजरातने मान्य केलं आहे. गृहमंत्री अमित शाह आणि केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांनी मान्यता दिली”, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

    ‘आजच्या बैठकीने महाराष्ट्राला मोठा फायदा’

    “अनेक वर्षापासून नर्मदा प्रकल्पातून महाराष्ट्राला पाणी मिळत नव्हतं. पण आजच्या बैठकीमुळे महाराष्ट्राच्या वाट्याचं 10 टीएमसी पाणी हे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. त्यातून नंदूरबार, जळगाव जिल्हा आणि नाशिकच्या काही भागाला मोठा फायदा होईल. या बैठकीने महाराष्ट्राला मोठा फायदा झाला आहे. त्यामुळे मी गुजरातचे मुख्यमंत्री, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि केंद्रीय मंत्री सीआर पाटील यांचे आभार मानले”, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

    ‘महाराष्ट्राने जमीन दिली, पण पाणी मिळालं नाही’

    “नर्मदा प्रकल्पासाठी महाराष्ट्राने जमीन दिली. पण महाराष्ट्राला पाणी मिळालेलं नाही. ते आज देण्याचं त्यांनी कबूल केलं आहे. या 10 टीएमसी पाण्यामुळे महाराष्ट्राला निश्चित फायदा होईल. जवळपास 10 ते 15 वर्षांपासून सुरु असलेला वाद आज समाप्त झाला आहे”, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.

    महाराष्ट्राला सर्वाधिक निधी मिळाल्याचा दावा

    “मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे बैठक झाली. केंद्र सरकारने कुसूमच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी दिला आहे. केंद्र सरकारने एकूण 51 टक्के निधी या योजनेतून दिला. आता नवीन सुधारित कुसूम योजना येत आहे. याही योजनेत महाराष्ट्राला सर्वाधिक लाभ मिळावा, अशी विनंती केली आहे. केंद्र सरकारने सर्वात जास्त निधी महाराष्ट्राला दिला आहे”, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला.

    10 टीएमसी पाण्याचा काय फायदा होणार?

    “10 टीएमसी पाण्याने खूप मोठ्या प्रमाणात फायदा होईल. विशेषत: नंदूरबार जिल्ह्याला फायदा होईल. उत्तर महाराष्ट्रात सर्वाधिक फायदा होणार आहे. उकाई हा योजनेचा भाग नव्हता. आपण त्यांच्या लक्षात आणू दिलं की, आम्ही येथून पाणी नेऊ शकत नाही. त्यामुळे आम्हाला उकाईतून 5 टीएमसीचे पाणी द्या, अशी विनंती केली. ते त्यांनी मान्य केलं आहे. त्यामुळे आता याबाबतचा प्रोजेक्ट तयार करु आणि डिटेल माहिती देऊ”, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

    इतरही नदीजोड प्रकल्पांना गती

    “नदीजोड प्रकल्प हा आपल्याला फायदेशीर आहे. आपण कोल्हापूर आणि सांगलीचा फ्लड डाव्हर्जन प्रोजेक्ट तयार केला आहे. या प्रोजेक्टमधून आपण मराठवाड्यात 30 ते 40 टीएमसी पाणी घेऊन जाऊ शकतो. दुसरी वैनगंगा आणि नळगंगा ही जी लिंक आहे, ज्यामध्ये 62 टीएमसी पाणी मिळणार आहे, ती केंद्रीय मंत्रालयाकडे CWZ च्या मान्यतेला गेली आहे. ती मान्य झाली की, आपण त्याचं टेंडर काढू. ती मान्यतेच्या अंतिम टप्प्यात आहे. त्यामध्ये अजून 25 टीएमसी पाणी आपल्याला मिळू शकतो. इतर लिंकही डीपीआरच्या टप्प्यात आहेत”, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

    डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

    चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

    चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

    महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

    चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा