Nashik Weather Forecast: नाशिकच्या घाटमाथ्यावर अजूनही मुसळधार पाऊस सुरू असला तरी एकूण परिस्थिती सध्या तरी नियंत्रणात असल्याचं दिसत आहे.
धोकादायक भोवऱ्याने मार्ग बदलला, नाशिककडे न जाता आता महाराष्ट्रातील दुसऱ्या जिल्ह्यात सरकला(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
नाशिक: नाशिक शहरासह त्र्यंबकेश्वर परिसरात आज ढगफुटीसदृश पावसाचा इशारा हवामान खात्याकडून काल देण्यात आला होता. हवामान खात्याच्या या इशाऱ्यानंतर नाशिक महापालिकेसह जिल्हा प्रशासनाने नागरिकांना पुरेशी खबरदारी घेण्याचा सल्ला देत विविध उपाययोजना केल्या. शहरातील सर्व शाळा, महाविद्यालयांना आज सुट्टीही जाहीर करण्यात आली होती. मात्र ज्या भोवऱ्यामुळे नाशिक जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता तो भोवरा आता दुसऱ्या जिल्ह्याकडे सरकल्याने नाशिकवरील अतिवृष्टीचे संकट टळले असल्याचे जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पालघरमध्ये काल सुमारे ४५० मिमी पाऊस पाडणारा भोवरा त्र्यंबकेश्वर–नाशिक मार्गे जाण्याची शक्यता होती. मात्र हा भोवरा (Vortex) आता उत्तर दिशेला सुरतकडे व दक्षिण दिशेला अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले परिसराकडे सरकल्याचं दिसत आहे. त्यामुळे आता नाशिक नव्हे तर अहिल्यानगर जिल्ह्यातील काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता निर्माण झाली आहे.
मध्यरात्री शहराला पावसाने झोडपले!
नाशिक शहरात रात्री साडेअकरा ते मध्यरात्री अडीच वाजताच्या दरम्यान 21 मिमी पाऊस झाला. सोमवारी सकाळी साडेआठ ते मंगळवारी पहाटे साडेपाच या कालावधीत 61.8 मिमी पावसाची नोंद झाली असून मुसळधार पावसाच्या हजेरीमुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
नाशिकमध्ये यापूर्वी झालेला सर्वाधिक पाऊस…
१० जुलै २०१६ ते ११ जुलै २०१६ या २४ तासांत १६० मिमी पावसाची नोंद जुलै २०१६ रोजीचा पाऊस ठरला दहा वर्षांतील २४ तासांमधील सर्वाधिक १ डिसेंबर २०२१ रोजी ६३.८ मिलिमीटर पावसाची झाली होती नोंद वंजारवाडी (ता. नाशिक) येथे ३१ ऑगस्ट २०२२ रोजी ढगफुटीसदृश पाऊस मुसळधार पावसाने वंजारवाडी भागात दोनशे हेक्टर शेती गेली होती वाहून ८ आणि ९ सप्टेंबर २०२२ रोजी सिन्नर गावात अतिवृष्टीची नोंद
जिल्ह्यातील पावसाळी वन पर्यटन बंद
नाशिक जिल्ह्यातील काही भागात आज ढगफुटीसदृश पावसाच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक वनवृत्तातील पावसाळी वन पर्यटन पूर्णतः बंद करण्यात आले आहे.अंजनेरी, हरिहरगड, सांधण दरी, हरिश्चंद्रगड यासह इतर ठिकाणच्या प्रवेशबंदीबाबत वन विभागाने आदेश जारी केले आहेत. यासह पहिने, भंडारदऱ्यासह वन परिक्षेत्रातील हद्दीत पर्यटनासाठी बंदी घालण्यात आली आहे. वाढत्या पावसामुळे गेल्या आठवड्यापासून त्र्यंबकेश्वर वन परिक्षेत्रातील हरिहरगडावर पूर्वपरवानगीनुसार पर्यटकांना प्रवेश देण्यात येत होता. यासह पहिने आणि त्र्यंबकेश्वर परिसरात ठराविक ठिकाणीच पर्यटकांना परवानगी होती. परंतु, पावसाचा जोर आणखी वाढल्याने पर्यटकांच्या सुरक्षेसाठी आणि वन हद्दीतील अपघात टाळण्यासाठी आता पुढील आदेशापर्यंत सर्व ठिकाणी प्रवेशास मनाई करण्यात आली आहे. त्यानुसार त्र्यंबकेश्वर वन परिक्षेत्रातील ब्रह्मगिरी, हरिहरगड, दुगारवाडी धबधबा आणि पहिने येथील नेकलेस फॉल ही सर्व पर्यटनस्थळे बंद राहणार असल्याबाबतचे आदेश त्र्यंबकेश्वरचे वन परिक्षेत्र अधिकारी शेखर देवकर यांनी जारी केले आहेत. यासह पूर्वपरवानगीनुसारही कोणालाही प्रवेश नसेल. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. स्थानिक सुरक्षारक्षक, गाइडशी हुज्जत घालणाऱ्यांवरही गुन्हा दाखल करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा