• Tue. Jul 7th, 2026
    धबधबे-समुद्रावर पावसाळी पिकनिक विसरा, वसई-विरारमध्ये पर्यटनबंदी, पोलिसांकडून 21 स्थळांची यादी जाहीर

    Vasai Virar Monsoon Picnic Spots Banned : पावसाळा सुरू होताच वसईसह परिसरातील समुद्रकिनारे, धबधबे, धरणे आणि अन्य पर्यटनस्थळांवर पर्यटकांची गर्दी वाढत असल्याने निर्बंध लावण्यात आले आहेत

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म. टा. वृत्तसेवा, वसई विरार : पावसाळ्यात पर्यटकांची सुरक्षितता आणि संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलिस आयुक्तालयाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. वसई परिमंडळ-२ अंतर्गत येणाऱ्या प्रमुख समुद्रकिनारे, धबधबे आणि खदानी परिसरात २ ते १५ जुलै, तर विरार परिमंडळ-३ अंतर्गत धबधबे, तलाव, धरणे आणि समुद्रकिनाऱ्यांवर ५ ते १४ जुलै या कालावधीत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत.

    पावसात वाढत्या दुर्घटना

    पावसाळा सुरू होताच वसईसह परिसरातील समुद्रकिनारे, धबधबे, धरणे आणि अन्य पर्यटनस्थळांवर पर्यटकांची गर्दी वाढते. मुसळधार पावसामुळे पाण्याचा प्रवाह वेगवान होत असल्याने दरवर्षी बुडण्याच्या आणि अन्य दुर्घटनांच्या घटना घडत असतात. या पार्श्वभूमीवर पोलिस उपायुक्त, परिमंडळ-२ आणि परिमंडळ-३ यांनी स्वतंत्र परिपत्रके जारी करून पर्यटनस्थळांवर निर्बंध लागू केले आहेत.

    १०० मीटर परिसरात निर्बंध

    परिमंडळ-२ अंतर्गत संबंधित पर्यटनस्थळांच्या १०० मीटर परिसरात निर्बंध लागू राहणार आहेत. तर परिमंडळ-३ अंतर्गत विरार, पेल्हार, मांडवी, नालासोपारा आणि अर्नाळा पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील सर्व धबधबे, तलाव, धरणे आणि समुद्रकिनाऱ्यांच्या एक किलोमीटर परिसरात बंदी लागू करण्यात आली आहे.

    या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. पावसाचा आनंद घेताना स्वतःच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

    बंदी लागू असलेली प्रमुख पर्यटनस्थळे

    सुरुची बीच, रानगाव बीच, ब्रह्मपाडा बीच, भुईगाव बीच, मर्सिन्स बेनापट्टी बीच, वसई किल्ला जेटी, पाचू बंदर जेटी, चिंचोटी धबधबा, कामण देवकुंडी, राजीवली खदान, खैरपाडा धुमाळ नगर खदान, तसेच विरार परिसरातील फुलपाडा धरण, कुंभारपाडा तलाव, तुंगारेश्वर धबधबा, जेटी परिसर, तानसा नदी, पेल्हार धरण आणि अर्नाळा, कळंब, नवापूर व राजोडी समुद्रकिनारा.

    महत्त्वाचे निर्बंध

    पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई.
    खोल किंवा वेगाने वाहणाऱ्या पाण्यात उतरणे व पोहण्यास बंदी.
    धबधब्यांच्या प्रवाहाखाली बसण्यास मनाई.
    धोकादायक ठिकाणी ‘सेल्फी’ काढणे किंवा चित्रीकरण करण्यास बंदी.
    मद्यपान करणे, मद्य बाळगणे किंवा मद्यधुंद अवस्थेत फिरण्यास मनाई.
    मोठ्या आवाजात संगीत किंवा डीजे वाजवून ध्वनिप्रदूषण करण्यास बंदी.

    VIDEO | खासदार शाहू छत्रपतींनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट

    वाट चुकलेल्या सहा ट्रेकर्सची सुखरूप सुटका

    पालघर तालुक्यातील सफाळे पूर्व येथील शिवकालीन तांदुळवाडी किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या सहा पर्यटकांना मुसळधार पाऊस आणि दाट धुक्यामुळे परतीच्या मार्गावर वाट चुकली. मात्र, सफाळे पोलिस आणि तांदुळवाडी ग्रामस्थांच्या तत्परतेमुळे शोधमोहीम राबवून सर्व पर्यटकांना सुखरूप गडाच्या पायथ्याशी आणण्यात यश आले.

    पालघर जिल्ह्यातील डहाणू, नालासोपारा आणि वसई येथील हे सहा पर्यटक नुकतेच तांदुळवाडी किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेले होते. संध्याकाळी परतताना पावसाचा जोर वाढला आणि दाट धुके पसरल्याने त्यांना योग्य मार्ग सापडेनासा झाला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनी तातडीने ११२ या आपत्कालीन क्रमांकाशी संपर्क साधला.
    Maharashtra TimesSiya Goyal : सिया-चेतनचा चार महिन्यापूर्वी गुपचूप विवाह? केतन अग्रवाल केसमध्ये सर्वात मोठा गौप्यस्फोट, व्हॉट्सॲप चॅटमधून लग्नाची गोष्ट समोर
    माहिती मिळताच सफाळे पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी दत्ता शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक खादे, पोलिस हवालदार हरी चौधरी, रमेश चौधरी आणि पोलिस नाईक लक्ष्मण भोये यांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक पोलिस पाटील सुजित पाटील यांच्याशी संपर्क साधून तातडीने शोधमोहीम सुरू करण्यात आली.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

    पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

    अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

    शैक्षणिक पात्रता
    अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा