• Mon. Aug 24th, 2026

आळंदी शहरातील पूरपरिस्थितीत अडकलेल्या भाविकांची सुरक्षित सुटका; प्रशासनाचे बचावकार्य युद्धपातळीवर सुरू – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Jul 6, 2026
आळंदी शहरातील पूरपरिस्थितीत अडकलेल्या भाविकांची सुरक्षित सुटका; प्रशासनाचे बचावकार्य युद्धपातळीवर सुरू – महासंवाद


आळंदी, दि. ६ जुलै : इंद्रायणी नदीला आलेल्या पुरामुळे आळंदी शहरातील विविध ठिकाणी अडकलेल्या भाविकांची आळंदी नगरपरिषद, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा, पोलीस प्रशासन, अग्निशमन दल, तसेच (एनडीआरएफ) आणि संबंधित विभागांच्या समन्वयातून सुरक्षित सुटका करण्यात आली.

बचाव पथकांनी ज्ञानेश्वरी मंदिर परिसरातून २२०, इंद्रायणी नगरी येथून १००, ठाकूरबुवा मंडप येथून ६० आणि गोपाळपुरा येथून २८ अशा एकूण ४०८ भाविकांची सुरक्षित सुटका केली. तसेच विविध ठिकाणी वैयक्तिकरित्या अडकलेल्या भाविकांनाही सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. याशिवाय, बचाव पथकांनी पूरग्रस्त भागातील १५० गायींचीही सुरक्षित सुटका करून त्यांना सुरक्षित ठिकाणी हलविले आहे.

प्रशासनामार्फत बचाव व मदतकार्य युद्धपातळीवर सातत्याने सुरू असून परिस्थितीवर संबंधित विभागांकडून सतत लक्ष ठेवण्यात येत आहे. नागरिक व भाविकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या अधिकृत सूचनांचे पालन करावे, तसेच आवश्यक असल्यास प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

मूर्तीचा तोल जाताच संकेतने दोन हातांनी पेलण्याचा प्रयत्न केला, शेवटचा व्हिडिओ पाहताच नेवशे कुटुंब भावूक, भावाने सांगितलं अखेरच्या क्षणी काय घडलं
Chhatrapati Sambhajinagar : खवड्या डोंगर प्रकरण; कुणालच्या मावशीचा सासरच्या आरोपांवर पलटवार, 20 वर्षांपूर्वीच्या घटनेची आठवण दिली; कौटुंबिक वादाचे पदर आणखी गडद
Maharashtra Live News 24th August 2026 : महाराष्ट्रातील पावसाचे अपडेट्स आणि ताज्या घडामोडींच्या लाईव्ह बातम्या पाहा एकाच ठिकाणी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed