Pune Crime : दोन्ही आरोपींनी सांकेतिक भाषा व टोपणनावांचा वापर करून एकमेकांशी संवाद साधल्याचे निदर्शनास आले आहे. त्याचा अर्थ व गुन्ह्याच्या कटाशी असलेला संबंध स्पष्ट करण्यासाठी दोन्ही आरोपींची समोरासमोर चौकशी करणे आवश्यक आहे
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
पुणे : केतन अग्रवाल खून प्रकरणात मुख्य आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी मोबाइलवर संवाद साधण्यासाठी सांकेतिक भाषा (कोड लँग्वेज) व टोपणनावाचा (निकनेम) वापर करीत असल्याचे उघड झाले. दोघांच्या मोबाइलमधील डिलिट केलेला डेटा पोलिसांनी रिकव्हर केला असून, सांकेतिक संभाषणाची पडताळणी करण्यासाठी दोघांची समोरासमोर चौकशी करण्याकरिता तीन दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी पोलिसांनी शुक्रवारी न्यायालयाकडे केली. मात्र, न्यायालयाने ही मागणी फेटाळून दोन्ही आरोपींना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.
केतन अग्रवालचा १८ जून रोजी लोहगड किल्ल्यावरून दरीत ढकलून खून केल्याच्या आरोपावरून त्याची नियोजित वधू सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांना पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्याने दुपारी वडगाव मावळ येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. एम. विभुते यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. तपास अधिकारी मनोज पवार यांनी तपासातील प्रगती न्यायालयासमोर मांडली.
सरकारी वकील काय म्हणाले?
दोन्ही आरोपींचे प्रत्येकी एक मोबाइल जप्त करण्यात आले असून, सियाचा दुसरा मोबाइलही हस्तगत करण्यात आला आहे. या मोबाइलमधून डिलीट केलेला डेटा रिकव्हर करण्यात आला आहे. त्यामध्ये दोन्ही आरोपींनी सांकेतिक भाषा व टोपणनावांचा वापर करून एकमेकांशी संवाद साधल्याचे निदर्शनास आले आहे. त्याचा अर्थ व गुन्ह्याच्या कटाशी असलेला संबंध स्पष्ट करण्यासाठी दोन्ही आरोपींची समोरासमोर चौकशी करणे आवश्यक आहे, असे पोलिसांनी व सरकारी वकील राजश्री वीरकुड यांनी न्यायालयाला सांगितले. तांत्रिक तपासासाठी आरोपींच्या पोलिस कोठडीची आवश्यकता नसल्याचा युक्तिवाद बचाव पक्षाचे वकील विपुल दुशिंग यांनी केला. Helen of Sparta : मद्यधुंद अवस्थेत ड्रायव्हिंग, पोलिसांकडून 17 किमी पाठलाग, 10 लाख फॉलोअर्स असलेल्या प्रसिद्ध इन्फ्लूएन्सरवर गुन्हा
कटाची माहिती चेतनच्या मित्रालाही?
दरम्यान, या प्रकरणाच्या तपासात आणखी महत्त्वाची माहिती समोर येत असून, आरोपी चेतन चौधरी आणि सिया गोयल यांच्या संपर्कातील काही तरुणांचे जबाब पुणे ग्रामीण पोलिसांकडून नोंदवले जात आहेत. तपासादरम्यान चेतन आणि सिया यांनी सांकेतिक भाषेत केलेल्या चॅटची पडताळणी सुरु असतानाच या दोघांच्या संपर्कातील व्यक्तींकडून महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
Amol Kolhe | शरद पवारांची साथ सोडणार? कोल्हे एका वाक्यात बोलले
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, केतन अग्रवालच्या हत्येच्या कटाची माहिती चेतन चौधरीच्या एका वर्गमित्रालाही होती. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून तो चेतनच्या संपर्कात होता. संबंधित तरुण बीडचा रहिवासी असल्याचे समजते. विशेष म्हणजे केतनचा जीव घेण्यासारखे टोकाचे पाऊल उचलू नये, यासाठी त्या मित्राने चेतन आणि सिया या दोघांनाही समजावून परावृत्त करण्याचाही प्रयत्न केला होता, अशी माहिती समोर येत आहे. Venezuela Earthquake : मी जिवंत आहे, माझ्या बायकोला सांगू नका; बोगदा खणून 8 दिवसांनी वाचवलं, त्याचेच शब्द ऐकून बचाव पथक बुचकळ्यात, कारण समजताच गलबलले
संमतीविना नार्को चाचणीला परवानगी नाही
दोन्ही आरोपींची नार्को चाचणी करण्याचा मुद्दा उपस्थित झाला. त्यासाठी आरोपींची संमती आवश्यक असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. त्यानंतर सरकारी वकिलांनीही या टप्प्यावर नार्को चाचणीची आवश्यकता नसल्याचे सांगितले. त्यामुळे नार्को चाचणीचा विषय सध्या तरी निकाली निघाला.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा