• Wed. Aug 26th, 2026

म. टा. वृत्तसेवा, निफाड: देशातील मेट्रो सिटीमध्ये कांद्याच्या वाढलेल्या दरांतून ग्राहकांना दिलासा मिळावा, यासाठी नाशिक जिल्ह्यातून रेल्वेद्वारे कांदा पाठविण्यात येणार आहे. दिल्लीतील आदर्शनगर मंडीमध्ये पाठविण्यासाठी मंगळवारी सायंकाळी पाच वाजेनंतर लासलगाव रेल्वे स्टेशनवर कांदा एक्स्प्रेसमध्ये कांदा लोडिंग करण्यात आला.

महानगरांमध्ये कांद्याचे दर वाढल्यानंतर ग्राहकांना दिलासा देण्यासाठी सरकारकडून बफर स्टॉक मधील कांदा बाजारात आणणे हा धोरणात्मक निर्णय आहे. त्यासाठी नाफेडकडून २ लाख मेट्रिक टन कांदा खरेदीचे उद्दिष्ट होते. आता खरेदी केलेल्या या कांद्यातून दिल्ली येथे लासलगाव येथून एकूण २१ रेल्वे वॅगनमधून सुमारे ८४० टन कांदा दिल्लीला पाठविण्यात येणार येणार आहे. त्यासाठी बुधवारी कांदा लोडिंग होणार होता. परंतु, कांद्याची प्रतवारी न झाल्याने लोडिंगची प्रक्रिया रखडली होती. अखेर सायंकाळी ५ वाजता लासलगाव रेल्वे स्टेशन येथून कांदा लोडिंग प्रक्रिया सुरू झाली.

Nashik Crime : गर्लफ्रेण्ड रुसली, 27 वर्षांच्या आदित्यने थेट चौकातच ‘सॉरी’चा बॅनर लावला, लोकांमध्ये चर्चा, पोलिसांकडून ‘पंचनामा’एका ट्रकमधून आलेल्या ५० गोण्या रेल्वे वॅगनमध्ये लोड करण्यात आल्या. रात्री उशिरापर्यंत ही लोडिंगची प्रक्रिया पूर्ण होईल असे सांगण्यात आले. यामुळे हा कांदा दिल्लीकडे जाण्यास नियोजित वेळेपेक्षा उशीर लागणार आहे. निफाड रेल्वे स्टेशन येथून ८५० क्विंटल कांदा गुवाहाटीला पाठविण्यात येणार होता. मात्र, ही ‘कांदा एक्स्प्रेस’ रद्द झाल्याची माहिती आहे. ती रद्द का झाली, याचे कारण समोर आले नाही.

दरांवर परिणाम होण्याची शक्यता

‘एनसीसीएफ’चा कांदा देशातील प्रमुख शहरांतील बाजारांत गेल्यानंतर बाजार समित्यांमधील दरांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

Maharashtra TimesNashik News: नाशिकमध्ये आता काविळीचा प्रकोप; एकाच इमारतीत सहा संशयित रुग्ण, महापालिकेकडून 1276 घरांचे सर्वेक्षणकांद्याचा दर ७० रुपयांवर

साठवणुकीतील जुना कांदा संपत आला असून, पावसामुळे नवीन कांद्याची आवक लांबल्याने किरकोळ बाजारात कांद्याचा दर सोमवारी ७० रुपये प्रतिकिलोवर पोहोचला. किरकोळ बाजारात सध्या प्रतवारीनुसार ६० ते ७० रुपये किलो दराने कांद्याची विक्री होत आहे. दोन आठवड्यात कांद्याच्या दरात वाढ झाली आहे. नवीन कांदा बाजारात येण्यास आणखी वेळ लागणार असल्याने आगामी काळात दर वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली.

मागणीच्या तुलनेत आवक कमी असून, जुन्या कांद्याचा साठाही संपत आला आहे. त्यामुळे उपलब्ध कांद्याला चांगला दर मिळत आहे. यंदा जूनमध्ये अपेक्षित पाऊस झाला नाही. त्यानंतर जुलैमध्ये सलग पाऊस झाल्याने कांद्याची पेरणी लांबली. काही भागांत पेरणी झालेला कांदाही पावसामुळे खराब झाला. त्यामुळे नवीन कांद्याची आवक नेहमीपेक्षा उशिरा होणार आहे. दर वर्षी साधारण ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यापासून नवीन कांद्याची आवक सुरू होते. मात्र, यंदा पेरणी लांबल्याने ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा नोव्हेंबरमध्ये नवीन कांद्याची आवक होण्याची शक्यता आहे.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed