Washim Custodial Death Case: पोलिस कोठडीतील बेग्या पवार यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी नऊ पोलिसांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.
रिसोडचे तत्कालीन पोलिस निरीक्षक माधव धांडे, पोलीस कर्मचारी मदन पवार, शिवाजी खिल्लारी, पंजाब पाटकर, रमेश पवार, प्रकाश तारम, नागोराव खांडके, अशोक वैद्य, वसंत जाधव अशी शिक्षाप्राप्त पोलिसांची नावे आहेत. रिसोड पोलिसांनी ९ मे २०११ रोजी एका गुन्ह्याच्या तपासासाठी वाढोणा शेतशिवारातून बेग्या पवार राजू पवार यांना ताब्यात घेतले होते. पोलिस स्टेशनमध्ये आणल्यानंतर गुन्ह्याची उकल करण्यासाठी पोलिसांनी बेग्या पवार यांना मारहाण केली. यात त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाल्याने कारवाईची मागणी जोर धरू लागली.
छत्रपती संभाजीनगरमधील फेमस ‘आईच्या गावात’, ‘यल्ला यल्ला’ रेस्टॉरंटचे परवाने रद्द; FDAचा मोठा दणका, ग्राहकांची फसवणूक उघड!
वाशीम जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढला गेला. सर्वच स्तरावरून दबाव वाढत असल्याने राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस उपअधीक्षक अन्वर शेख व चव्हाण यांच्याकडे या प्रकरणाचा तपास सोपविण्यात आला. त्यांच्या पथकाने तपास करून प्रकरण न्यायालयात दाखल केले. दीड दशकानंतर अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश जे. पी. झपाटे यांनी या प्रकरणाचा निकाल देत नऊ पोलिसांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
Palghar Rain: दुर्दैवी! घरात साचलेलं पाणी बाहेर काढताना अचानक भिंत कोसळली, 47 वर्षीय महिलेचा करुण अंत
‘न्यायालयाने आम्हाला न्याय दिला‘
माझ्या मुलावर कोणत्याही स्वरुपाचा गुन्हा नव्हता. केवळ आम्ही पारधी असल्यामुळे त्याला अडकवण्यात आले आणि त्याचा जीव घेतला. तब्बल १५ वर्षे आम्ही आमच्या मुलाला न्याय मिळेल या आशेवर जिवंत होतो. आज न्यायालयाने आम्हाला न्याय दिला, अशी प्रतिक्रिया बेग्या पवार यांच्या आईवडिलांनी ‘मटा’शी बोलताना दिली .
