• Fri. Jul 3rd, 2026

    Mumbai Local News: मुंबई लोकलमध्ये गुन्हेगारांना चाप लावण्यासाठी सरकारकडून महत्त्वाच्या उपाययोजना; महिला डब्यासाठी कोणता निर्णय घेतला?

    Mumbai Local News: मुंबई लोकलमध्ये गुन्हेगारांना चाप लावण्यासाठी सरकारकडून महत्त्वाच्या उपाययोजना; महिला डब्यासाठी कोणता निर्णय घेतला?

    मुंबई: लाखो मुंबईकरांची लाइफलाइन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये मागील काही दिवसांत घडलेल्या गुन्हेगारीच्या घटनांनी प्रवाशांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. किरकोळ कारणांतून होणाऱ्या जीवघेण्या हल्ल्यांमुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या पार्श्वभूमीवर विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान सभागृहात आमदार रवींद्र फाटक यांनी मुंबई शहर आणि उपनगरातील रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेच्या संदर्भात लक्षवेधी सूचना मांडली. यावर उत्तर देताना राज्याचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी सरकारकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजनांबाबत माहिती दिली आहे.

    योगेश कदम म्हणाले की, “मुंबईसह राज्यातील रेल्वे स्थानके आणि रेल्वे परिसरातील प्रवाशांच्या सुरक्षिततेस सर्वोच्च प्राधान्य देत संवेदनशील ठिकाणांसाठी विशेष कृती आराखडा तयार करण्यात येणार आहे. रेल्वे पोलीस, स्थानिक पोलीस आणि रेल्वे प्रशासनाच्या संयुक्त कारवाईद्वारे गुन्हेगारी प्रवृत्तीवर कठोर कारवाई केली जाईल. रेल्वे अपघात आणि गुन्हेगारी रोखण्यासाठी संवेदनशील झोन निश्चित करण्यात आले असून प्रत्येक झोनसाठी संयुक्त पोलीस आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे अधिकारी प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक उपाययोजनांचा अहवाल शासनाला सादर करतील. त्यानुसार तातडीने आवश्यक निर्णय घेतले जातील. रेल्वेतील वाढत्या प्रवासी संख्येच्या पार्श्वभूमीवर लोकल रेल्वेच्या फेऱ्या आणि डब्यांची संख्या वाढविण्याची मागणी केंद्र सरकारकडे राज्य शासनामार्फत पाठपुराव्याने मांडली जाईल,” अशी माहिती कदम यांनी दिली.

    महिला डब्यासाठी महत्त्वाचा निर्णय

    मुंबई लोकलमध्ये महिलांच्या विनयभंगाच्या घटनाही सातत्याने समोर येत आहेत. याबाबत काही सदस्यांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर महिला डब्यात असलेल्या सुरक्षेच्या वेळेत वाढ करण्यात येईल, अशी घोषणा योगेश कदम यांनी केली आहे. “महिलांच्या सुरक्षिततेसाठी रात्री ९ ते सकाळी ६ या कालावधीत उपलब्ध असलेली विशेष सुरक्षा सुविधा सकाळी ८ वाजेपर्यंत वाढवण्याबाबत आलेल्या सूचनेचा सकारात्मक विचार करून आवश्यक कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल,” असं त्यांनी स्पष्ट केलं.

    दरम्यान, “रेल्वे स्थानके आणि प्लॅटफॉर्मवर गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्ती मुक्तपणे वावरत असल्याची वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. या पार्श्वभूमीवर रेल्वे पोलीस आणि रेल्वे प्रशासनाच्या संयुक्त पथकांमार्फत सर्व प्रमुख स्थानकांवर विशेष मोहीम राबवून अशा व्यक्तींवर कठोर कारवाई केली जाईल. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अधिक प्रभावी वापर करण्यात येणार असून रेल्वे स्थानकांवर फेस रेकग्निशन तंत्रज्ञानयुक्त सीसीटीव्ही कॅमे-यांची संख्या वाढविण्यात येईल. तसेच रेल्वे डब्यांमधील सुरक्षाव्यवस्थेचाही आढावा घेऊन आवश्यक त्या सुधारणा करण्यासाठी केंद्र सरकारशी समन्वय साधला जाईल,” असंही गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सांगितलं आहे.

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

    पत्रकारितेतील अनुभव
    अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

    मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

    शैक्षणिक पात्रता
    अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed