Maharashtra Sugar Stock Limit: साखर विक्रेते आणि वितरकांना कोणत्याही वेळी चार हजार क्विंटलपेक्षा अधिक साखरेचा साठा करता येणार नाही; तसेच खरेदी केल्यानंतर ३० दिवसांपेक्षा अधिक काळ साखर साठवून ठेवण्यासही मनाई करण्यात आली आहे.
केंद्र सरकारने २८ जुलै २०२६ रोजी प्रसृत केलेल्या अधिसूचनेनुसार हे निर्बंध एक ऑगस्ट ते ३० नोव्हेंबर या कालावधीत लागू राहणार आहेत. त्यानंतर १९ ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात आलेल्या स्वतंत्र अधिसूचनेद्वारे दरमहा उत्पादन, वापर किंवा कच्चा माल म्हणून १० टनांपेक्षा अधिक साखर वापरणाऱ्या मोठ्या ग्राहकांनाही साठा मर्यादा लागू करण्यात आली आहे. अशा ग्राहकांना साखर प्राप्त झाल्यापासून १५ दिवसांपेक्षा अधिक काळ तिचा साठा करता येणार नाही.
Tukaram Mundhe : पाच मित्र रेस्टॉरंटमध्ये बसले, वेटरला एकच प्रश्न विचारला, तोच तुकाराम मुंढेंचं दर्शन घडलं, व्हिडिओला नेटिझन्सची पसंतीसाखर विक्रेते, वितरक आणि संबंधित मोठ्या ग्राहकांना अन्नसाठा देखरेख पोर्टलवर नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यावर सध्याच्या साखर साठ्याची माहिती भरावी लागणार असून, त्यानंतर दर शुक्रवारी साठ्याची स्थिती अद्ययावत करावी लागणार आहे. साखरेच्या साठ्याची पडताळणी करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात विशेष तपासणी पथके स्थापन करण्यात आली आहेत. जिल्हा पुरवठा अधिकारी या पथकाचे अध्यक्ष असतील. जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था; साखर आयुक्त कार्यालयाचा संबंधित जिल्ह्यातील प्रतिनिधी; वैधमापनशास्त्र निरीक्षक आणि पोलिस अधीक्षक किंवा पोलिस निरीक्षक दर्जाचा अधिकारी हे पथकाचे सदस्य असतील. मुंबई आणि ठाणे परिमंडळासाठी नियंत्रक, शिधावाटप; तसेच संचालक, नागरी पुरवठा, मुंबई यांच्या स्तरावर स्वतंत्र विशेष पथके स्थापन केली जाणार आहेत. याशिवाय राज्यस्तरीय दक्षता पथकांकडूनही साखरेच्या साठ्यांची तपासणी केली जाणार आहे.
तपासणी पथके व्यापारी आणि वितरकांच्या गोदामांना प्रत्यक्ष भेट देऊन साखरेच्या पोत्यांची मोजणी करणार आहेत. या वेळी प्रत्यक्ष उपलब्ध साठ्याची साठा नोंदवही, खरेदी-विक्रीच्या नोंदी, खरेदी पावत्या, गेट पास, वाहतूक व पाठवणीची कागदपत्रे तसेच अन्नसाठा देखरेख पोर्टलवर जाहीर केलेल्या साठ्याशी पडताळणी केली जाणार आहे. साखर कारखान्यांकडून मोठ्या ग्राहकांना थेट किंवा पुरवठादारांमार्फत करण्यात आलेल्या मासिक साखर विक्रीचीही तपासणी केली जाणार आहे.
Samay Raina : सर, मी एक बिस्किट घेऊ का? फडणवीसांकडून सन्मान घेतानाही समय रैनाचा मिश्कीलपणा; म्हणाला महाराष्ट्र सायबर सेल ग्रेट, कुठूनही शोधून काढतीलतफावत आढळल्यास कारवाई
पोर्टलवर जाहीर केलेला साठा आणि गोदामातील प्रत्यक्ष साठा यामध्ये तफावत आढळल्यास त्याची नोंद तपासणी अहवालात केली जाणार आहे. यासाठी साठ्याची छायाचित्रे, साठा नोंदवही आणि संबंधित कागदपत्रांसह आवश्यक पुरावे संकलित केले जातील. साठा निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. ही तपासणी व कारवाई ३० नोव्हेंबरपर्यंत किंवा त्यापूर्वी संबंधित परिपत्रकानुसार लागू राहणार आहे.
